Mg id top
Loading...

वृद्धीमान साहाने घेतलेल्या या ३ कॅच बघून धोनीची आठवण येईल, बघा व्हिडीओ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघादरम्यान पुण्यातील गहुंजे मैदानावर मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. फलंदाजांनी उभारलेल्या धावांच्या डोंगरानंतर गोलंदाजांनी आफ्रिकेचा पहिला डाव लवकर गुंडाळला. त्यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजी करताना आफ्रिकेच्या ५ विकेट १०० च्या आत घेत एका डावाने विजयाकडे वाटचाल केली आहे.

विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली. कोहलीने नाबाद २५४ धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभारता आला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी सर्वबाद २७५ अशी मजल मारली.

Loading...

चौथ्या दिवशी आज खेळ चालू झाल्यानंतर भारताने लवकरच आफ्रिकेला मोठे धक्के दिले. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विन २, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पहिल्या सत्रात भारताचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहानं दोन अफलातून झेल घेतले. त्याच्या या अफलातून झेलनंतर चाहत्यांना धोनीची नक्कीच आठवण आली असेल.

बघा व्हिडीओ-

साहाने हे २ झेल घेतल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या यष्टिरक्षकांमध्ये सर्वोत्तम ठरला आहे.

तसेच २०१७ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यशस्वी झेल टीपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये साहानं आघाडी घेतली आहे. त्याची झेल पकडण्याची अचुकता ही ९६.९% इतकी आहे. म्हणजेच अन्य यष्टिरक्षकांपेक्षा अधिक. त्यानंतर श्रीलंकेचा निरोशन डिकवेला ( ९५.५%), इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( ९५.२%), ऑस्ट्रेलियाचा टीम पेन ( ९३.३%) यांचा क्रमांक येतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *