Mg id top
Loading...

मॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय असते, नेमकं कुणाला म्हणायचं मॅच्युर ?

मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता ! समाजात माणसाच्या वागण्याबोलण्यावरुन एखादा माणूस मॅच्युर आहे का नाही ठरवले जाते. माणसामाणसातील नात्यांच्या संबंधाने मॅच्युरिटी हा शब्द अनेकदा आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतो. पण मॅच्युरिटी या शब्दाचा नेमका अर्थ कसा लावायचा हे अनेकदा स्पष्ट होत नाही.

प्रौढ होणे म्हणजे मॅच्युर होणे असा गैरसमज आपल्याकडे आढळतो. परंतु वास्तवात मॅच्युरिटी किंवा परिपक्वता ही गोष्ट माणसाच्या वयावरुन नाही तर त्याच्या सामाजिक व्यवहारावरुन ठरवली जाते. त्यासाठी माणसाच्या वागण्याबोलण्यात काही गोष्टी असाव्या लागतात.

कशी येते मॅच्युरिटी ?

१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. २) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.

५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.

७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.

९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. १०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.

१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *