पावसामुळे भारत न्यूझीलंड सामना रद्द झाला तर काय होईल? वाचा

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup मध्ये आजपासून सेमीफायनलच्या थराराला सुरुवात झाली. सेमीफायनलचा पहिला सामना आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये खेळला जात आहे. या सामन्यावर अगोदरच पावसाचे सावट होते. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजाना भारतीय गोलंदाजाच्या घातक माऱ्याचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडला परेशान करून सोडले. न्यूझीलंडला पहिला चौकार मारण्यासाठी 8 व्या ओव्हरपर्यंत वाट बघावी लागली.

न्यूझीलंडने 46.1 ओव्हरमध्ये 5 बाद 211 धावा केल्या आहेत. पण या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस पडला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

उपांत्य फेरीत जर पाऊस पडला आणि पूर्ण दिवस सामना होऊ शकला नाही किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर आज सामना झाला नाही तर उद्या हा सामना पुन्हा खेळवण्यात येऊ शकतो. पण राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही, तर आता जी सामन्याची स्थिती आहे त्यानुसारच राखीव दिवशी सामना सुरु होणार.

पावसामुळे सामना रद्दच झाला तर काय होईल?

यंदाच्या विश्वचषकात पावसाचा मोठा अडथळा बघायला मिळाला. पावसामुळे आतापर्यंत सर्वाधिक सामने यावेळी रद्द झाले. पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांचा फटका श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात बसला. एकप्रकारे त्यांचे सेमीफायनलचे तिकीट पावसामुळे हुकल्याचे दिसते. सेमीफायनलच्या सामन्यांवर देखील आता पावसाचे सावट आहे.

पावसामुळे आज खेळ नाही झाला तर आजच्या स्थितीपासून पुढे उद्या खेळ सुरु होईल. जर उद्या पण पावसामुळे खेळ न झाल्यास सामना रद्द होईल. सामना रद्दच झाला तर गुणतालिकेत जो संघ पुढे आहे त्या संघाला फायनलचे तिकीट मिळेल.

गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत भारताचे १५ गुण आहेत तर न्यूझीलंडचे ११ गुण आहेत. सामना रद्द झाल्यास जास्त गुण असणाऱ्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर भारताला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *