हा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…

मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण केली असे अनेक प्रकरण आपण बघितले असतील. अनेक वेळेस लोक मनसेच्या भूमिकेस विरोध दर्शवितात परंतु काही एवढे किळसवाणे सत्य समोर आल्यावर लोक घेतलेल्या भूमिकेचा परत विचार करतील. असाच एक विडीओ सध्या सोशल मिडीयावर गाजत आहे. आज खासरेवर बघूया कुठला आहे हा विडीओ आणि काय आहे हा प्रकार ?

सदर विडीओमध्ये काही परप्रांतीय फळ विक्रेते हे त्यांचा माल ठेवायला मुंबई मध्ये जागा नसल्याने हे फेरीवाले रस्त्यावरील गटारात त्यांचे फळाचे डब्बे ठेवतात. आपण जे फळ खात आहोत हे फळ कुठल्या परिस्थितीत ठेवल्या जाते हे डोळ्याने बघितल्यावर अंगावर काटा येईल. हा विडीओ ज्या व्यक्तीने शूट केला आहे त्याने वाकोला मुंबई या भागातील आहे. खाली दिलेल्या विडीओ मध्ये आपण हा धक्कादायक प्रकार बघू शकता.

सदर विडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून यावर मुंबई महानगर पालिका काय कार्यवाही करेल हे पाहावे लागेल. परंतु सामान्य नागरिकाच्या आरोग्या सोबत जो खेळ चालला आहे तो चिंताजनक आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास शेअर करा जेणेकरून हे प्रकरण सर्वच्या लक्षात येईल. आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *