Loading...
Loading...

जेवण देण्यापूर्वी भांडी उष्टी करत असलेल्या मुस्लिमाच्या व्हायरल व्हिडिओची सत्यता

आपण जर धार्मिक तेढ वाढवणाऱ्या कुठल्या ग्रुपमध्ये ऍड असाल तर असा व्हिडीओ आपल्यापर्यंत सुद्धा आला असेल. या व्हिडिओत दिसते की टोपी घातलेली काही मुस्लिम मुले खुलेआम प्लेट आणि चमचे चाटून बाजूला ठेवत आहेत. व्हिडिओच्या सोबतचे कॅप्शन “काफिरों को ईद पर सेवईयां खिलाने के लिए अपने हाथ बर्तन धोते शांतिदूत ।

Loading...

जिहादियों के यहां अगर आप दावत में जाते हो तो इस वीडियो को जरूर देखे।” असे आहे. म्हणजेच हे लोक उष्ट्या भांड्यांमध्ये पाहुण्यांना जेवण देतात असं हा शेअर करणाऱ्यांचं म्हणणं आहे. पाहूया या व्हायरल व्हिडिओमागील वास्तव…

Loading...

व्हायरल असलेला व्हिडीओ खरा आहे, पण त्याबाबतीत पसरवला जात असणारा संदेश खोटा आहे. मुसलमान लोकांना उष्टे अन्न खायला घालतात हा अपसमज मुस्लिमांमध्येही आहे. सुन्नी मुस्लिमांना वाटते की शिया मुस्लिम त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी देण्यापूर्वी त्यात थुंकतात.

Loading...

पण याचा पुरावा कुणाजवळी नाही. सगळे सांगतात आमच्या चाचाने बघितले, अब्बाने बघितले किंवा मौलानाने सांगितले. स्वतःच्या डोळ्यांनी कुणीच बघितलेले नसते. ही दंतकथा पसरवण्यामागचा उद्देश मुस्लिम आणि इतर धर्माच्या लोकांमध्ये तेढ वाढावी हाच आहे.

व्हायरल व्हिडिओची सत्यता

Loading...

व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीशी चर्चा केली तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की, आपण खात असलेल्या अन्नाचा अत्यंत आदर करावा अशी मुस्लिम धर्मात अशी शिकवण आहे. जिथे ते जेवण करतात त्याला दस्तरख्वान म्हटले जाते. या दस्तरख्वानात डाळ किंवा भाताचा एखादा कणही पडला तर तो उचलून खातात.

जेवण करुन उठण्याआधी प्लेट पूर्णपणे साफ करावी लागते. त्यात जरासेही अन्न शिल्लक राहता कामा नये. नीट बघितले तर आपल्याला लक्षात येईल या व्हिडिओतील मुस्लिम लोक प्लेट धुण्यापूर्वी चाटून साफ करत आहेत. मात्र सर्वसामान्यपणे कुणी असे करत नाही. एखाद्या पीर किंवा औलियाचे निस्सीम अनुयायीच असे करू शकतात.

अजून थोडा तपास केला असता ट्विटरवर एक माहिती मिळाली. त्यात लिहले होते दाउदी बोहरा मुस्लिमांमध्ये एक अशी परंपरा आहे की भांडी धुण्यापूर्वी ती चाटून साफ केली जातात. त्यातही असेच सांगण्यात आले होते की असे करणे म्हणजे एक्सट्रीम लेव्हल आहे. प्लेट साफ करणे, बोटे चाटणे हे सगळे सुन्नतचा भाग आहे. व्हिडिओतील लोक भांडी उष्टी करत नसून, खरकटी भांडी धुण्यापूर्वी चाटून साफ करत आहेत असे दिसते. बोहरा समाजाचे हे लोक असतील तर मोदींनी बोहरा समाजाबद्दल “बोहरा मुसलमान शांतीचे दुसरे नाव आहे. जिथे बोहरा तिथे शांती आहे.” असे उदगार काढले होते.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *