संधीवाताने त्रस्त आहात? 2 रुपयांच्या तुरटीने दूर करा संधीवात… 0

आपल्याला तुरटी फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात असंच माहिती असते. पण तुरटीचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते जे की अनेक आजारांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. संधीवात दूर करण्यासाठी तर तुरटी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही तुरटीचे महत्वपुर्ण फायदे बघूया…

तुरटीमध्ये असलेले मॅग्नेशियम संधीवाताच्या वेदना दूर करते. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात तुरटी टाकायची आहे आणि त्या पाण्याने ती जागा शेका. तुमच्या वेदना कमी होतील. तुरटी केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कोमट पाण्यात तुरटी टाकून डीप कंडिशनर तेवढ्याच प्रमाणात मिसळून ते मिश्रण केसांना लावा. 15-20 मिनिटांनी ते थंड पाण्याने धुवा. तुमचे केस दाट होण्यास मदत होईल. तुम्हाला असे आठवड्यातून एकदा करायचे आहे.

तुरटी पाण्यात टाकून आंघोळ केल्यास तुमचा ताण कमी होण्यासही मदत मिळेल. आठवड्यातून तीन वेळा ही क्रिया करा. तुरटी खाज किंवा सनबर्न दुर करण्यासाठी देखील उपयोगी पडू शकते. तुरटीचे मिश्रण त्या जागी लावल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

तुरटीत जे मॅग्नेशियम असते त्याने मसल्स रिलॅक्स होतात. वेदना होत असलेल्या ठिकाणी तुरटीने मसाज करा. तसेच तुरटीने स्किनच्या डेड सेल्स सुद्धा निघतील. सोबतच तुमच्या नसांमधील वेदना आणि जॉईंट पेन कमी होईल. यासाठी गरम पाण्यात तुरटी टाका आणि वेदना होणारा भाग त्यामध्ये बुडवून थोडा वेळ ठेवा. तसेच बाथटबमध्ये तुरटीचे पाणी मिसळून अंघोळ केल्यास हार्ट अटॅकची शक्यता कमी होते आज धोका टाळता येतो.

तुरटीच्या पाण्यात 15 मिनिट पाय टाकून बसल्यास पायांची सूज, दुर्गंधी, थकवा, आणि फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या दूर होतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मिनटात घालवा दाताचे पिवळेपण,दात एवढे पांढरेशुभ्र होतील की लोकं बघतच राहतील 0

प्रत्येक व्यक्तीला त्याचा चेहरा सुंदर असावा असे नेहमी वाटते. अनेक सौंदर्य संपन्न व्यक्ती त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतात. पण इथेच एक मोठी चूक माणसाकडून घडते. कारण चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांचे देखणेपणही तेवढेच महत्वाचे असते हे ते विसरून जातात.

लहानपनापासूनच सर्वाना दात घासायला कंटाळा येत असतो, हा कंटाळा अत्यंत चिंतेचा विषय असतो. कारण आरोग्याची सुरुवात ही मुखरोग्यपासून होत असते.

प्रत्येकाच्या दाताबाबत अधिक समस्या असतात. दात किडने, दात पिवळे पडणे दात दुखणे या सर्व समस्याचे मूळ एकच आहे दात ना घासणे. याव्यतिरिक्त काही पदार्थांचे जास्त सेवन, वाढते वय किंवा औषधींची जास्त डोस केल्यास दात पिवळे होऊ शकतात.

जाणून घेऊया पिवळे दात मिनिटातच पांढरेशुभ्र करणाऱ्या काही खास टिप्स आज खासरेवर .

1.तुळस-

Tulashi

तुळशी ही एक अतिशय महत्वपूर्ण औषधी वनस्पती आहे. तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणाला दूर करण्यासाठी अद्भुत क्षमता असते. तुळशीचे पानं वाळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील.तुळस ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. ही वनस्पती वातावरण शुद्ध राखतेच तसेच आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

2.मीठ –

Salt

मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा (लाकडापासून तयार केलेला कोळसा) मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो.

3.संत्र्याची साल –

Orange

संत्र्याची साल आणि तुळशीचे पानं वळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. ब्रश केल्यांनतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा. संत्रीमधील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियममुळे दात मोत्यासारखे पांढरे दिसतील.

4.गाजर –

Carrots

दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास यामधील रेशे दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात.
गाजराच्या बाबतीत एक गोष्ट खास आहे कि ते वर्षभर बाजारात उपलब्ध असतात.गाजर आपण सलाड म्हणून हि खाऊ शकतो व भाजी बनवून हि खाऊ शकतो.

5.लिंब –

लिंबाचा उपयोग प्राचीन काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. लिंबामध्ये दात पांढरे करणारे आणि बॅक्टेरिया नष्ट करणारे गुण आढळून येतात. हे एक नैसर्गिक अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक आहे. दररोज लिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे कोणतेही आजार होत नाहीत. वाळलेल्या लिंबाच्या सालांची पूड करून ठेवून घ्या. याला दिवसातून एकवेळा दातांवर चोळा. दात चमकायला लागतील.

6.लिंबू –

लिंबू हे एक असे फळ आहे, ज्यामुळे तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते. यामुळे हे दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. एका लिंबाचा रस काढून त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळून घ्यावे. जेवण केल्यानंतर या पाण्याने गुळणा करा. या उपायने दात पांढरे होतील आणि तोंडातील दुर्गंधी दूर होईल. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून दातांची मसाज करा.

7.स्ट्रॉबेरी –

Stroberi

स्ट्रॉबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आढळून येणारे मॅलिक एसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा.

8.केळ –

Banana

केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा. दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.पण केळाच्या बाबतीत एक धोका असा पण आहे कि आपण जर केल जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्या दातांमध्ये कीड लागू शकते.

9.टोमॅटो –

Tomato

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोचा रस दातांसाठी खूप चांगला असतो. टोमॅटोच्या रसाने दातांवर मसाज केल्यानंतर थोड्यावेळाने ब्रश करा. या उपायने दात पांढरेशुभ्र होतील.

10.सफरचंद –

Apple

सफरचंद दातांवर स्क्रब करण्याचे काम करते. त्याशिवाय सफरचंदात मैलिक अ‍ॅसिड असते, त्यामुळे दात चमकदार होतात. सफरचंदाचे सेवन केल्याने जीवाणूंचा परिणाम होत नाही आणि श्‍वासाचा दुर्गंध येत नाही. त्यामुळे मुलांना रोज एक सफरचंद खायला द्यावे. दात चमकतीलच; पण पोटासंबंधीचे सर्व विकार दूर होण्यास मदत होते.

11.टरबूज-

लोह, मॅग्नशिअम, कॅल्शिअम, मॅगनीज, झिंक, पोटॅशिअम आणि आयोडिन यासारख्या पोषक घटकांनी युक्त टरबूज दातांसाठी फायदेशीर असते. मुलांचे दात चमकदार करायचे असतील, तर त्यांना टरबूज अवश्य द्यावे.

12.आक्रोड व बदाम –

nuts

सुकामेवा मुलांना अवश्य द्यायला हवा. त्याचे आरोग्यासाठी फायदे आहेतच. त्याशिवाय आक्रोड आणि बदाम खाल्ल्याने दातांवर जमा झालेले प्लाक किंवा कीटण साफ होते आणि दातांचा पिवळेपणाही दूर होतो.

तर या आहेत मिनिटामध्ये दात चकाचक करण्याच्या घरगुती टिप्स माहिती आवडल्यास शेअर करा…
वाचा पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कथा…

Comments

comments

उसाचा रस पिण्याचे तोटे वाचून तुम्ही थक्क व्हाल,खास करून या व्यक्तींनी राहावं सावध ! 0

Sugarcane Juice

उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो.उसाच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते.

उसाचा रस आरोग्यास चांगलाही मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पिशक तत्वे असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसाचे असे काही फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो.

जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे काही तोटे-

  • मोठ्या प्रमाणात कॅलरी व कार्बोहायड्रेट असल्यामुळे उसाचा रस हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उसाचा रस सेवन करणे टाळा.
  • उसाच्या रसात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायबिटीज सारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींनी उसाचा रस पिणे कटाक्षाने टाळावे,अथवा अगदी थोड्या प्रमाणात उसाचा रसाचे सेवन करावे.
  • सहसा आपण फ्रिजमध्ये थंड करून उसाचा रस पिणे पसंत करतो. पण हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळावं.
  • उसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये. बरेच वेळा आपल्याला वेगवेगळे पेय मिक्स करून पिण्याची सवय असते. पण उसाच्या रसाच्या बाबतीत हे टाळावे.त्यामूळे उसाच्या रसाचे गुणधर्म कमी किंवा बदलू शकतात.
  • दिवसातून आपण 3-4 ग्लास उसाचा रस पिणे पसंत करतो पण केवळ दोनच ग्लास उसाचा रस प्यावा.जास्त रस पिल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकते.जोइंडिस सारख्या आजाराचे रुग्ण जास्त वेळा उसाचा रस पिऊ शकता.
  • काही व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढत असते. अशा व्यक्तींनी उसाच्या रसाचे सेवन करणे टाळावे. करण यामुळे यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो.
  • कफाचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही उसाचा रस पिणे टाळावे. यामुळे कफाचा त्रास वाढतो.या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण आपल्या आरोग्याची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतो.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा..

वाचा पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कथा…

Comments

comments

वजन कमी करायचे नो टेन्शन, वापरा या काही खास निंजा टेक्निक. 0

Lazy peoples

आपण नेहमी वाचत असतो की एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपटासाठी अगदी काही दिवसात अनेक किलो वजन कमी केले. गेल्या काही दिवसात तर अशा बातम्या फारच बघायला मिळाल्या. यातला झटपट वजन कमी करण्याचा भाग अधिक आकर्षक असतो. कमी काळात खूप वजन कमी करणे अयोग्यच आहे.

आपण जसा जसा व्यायाम करायला लागतो तशा काही गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात.

व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.

जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल बर्न होत असल्याची शक्यता जास्त असते. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.

आपण सुरुवातीला जिमला नियमितपणे आनंदाने जातो पण थोडे दिवस उलटल्यावर आपणास जिम ला जायचा कंटाळा येतो. आपल्या आळशीपणामुळे आपन जिममध्ये सातत्य राखण्यास अपयशी ठरतो.

अशा आळशी लोकांसाठी आज आपण जाणून घेऊया वजन कमी करण्याचा काही निंजा टेक्निक:

Fit body
Fit waist

नो इलेक्ट्रॉनिक्स-

आज काल आपल्यापैकी प्रत्येकाला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करायची सवय असते किंवा रात्री शो बघण्याची किंवा नेट सर्फिंग करण्याची सवय असते. प्रथमतः आपण आपल्या सवयी पूर्णपणे बंद कराव्यात. कारण यातून निघणाऱ्या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाईट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझम मध्ये नादात होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स चा वापर बंद ठेवा.

नो दारू-

चयापचय क्रिया हा आपल्या शरीरातील महत्वाची क्रिया आहे. दारू पिणारे व्यक्ती सहसा रात्री दारू पिणे पसंत करतात. यामुळे चयापचय क्रिया कमी होते. म्हणून दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी रात्री झोपण्याच्या किमान 3 तास अगोदर दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होतात.

नो हेव्ही फूड-

रात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेणे सहसा टाळावे. कारण शरीराला ते पचवण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही तर त्याचे फॅट्स मध्ये रूपांतर होते.

नो लाईट-

रात्री चांगली झोप लागणे ही महत्वाचे आहे. त्यासाठी रात्री झोपताना पुर्णपणे अंधारात झोपणे पसंत करा. पूर्णपणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू शकते. याने फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते.

कुलिंग-

थंड वातावरणात झोपणे हे फॅट्स बर्न करण्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. करण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे कुलिंगमध्ये झोपणारे 7% जलद गतीने कॅलरीज बर्न करू शकतात.

झोपण्याची वेळ-

आपल्या झोपेची वेळ निश्चित करा. कमी जास्त प्रमाणात झोप घेणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. कमी झोप घेणाऱ्यांचं वजन देखील जलद गतीने वाढते. म्हणून किमान 6-7 तास झोप घेणे आवश्यक आहे.

तर या आहेत वजन कमी करण्याच्या काही निंजा टेक्निक. ही माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

Comments

comments

%d bloggers like this: