महिला नागा साधूंचे काही धक्कादायक रहस्य, पुरुष नागा साधुपेक्षा वेगळ्या असतात महिला नागा साधू

सहसा आपण मानतो की केवळ पुरुषच नागा साधू बनतात. परंतु तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटेल की महिला सुद्धा नागा साधू बनतात. भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यात महिला नागा साधू सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. आपण आज जाणून घेऊया याच महिला नागा साधू विषयी काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया ज्याविषयी तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. तुम्ही हे ऐकून हैरान व्हाल की महिला नागा साधूंची दुनिया कशा प्रकारे पुरुष नागा साधू सारखीच असते. चला तर खासरेवर बघूया किती रहस्यमय आहे महिला नागा साधूंची दुनिया…

महिला नागा साधू बनण्याच्या अगोदर महिलांना 10 ते 12 वर्षापर्यंत पूर्ण ब्रम्हचर्यचे पालन करावे लागते. त्यानंतर निर्णय घेतला जातो की ती महिला ब्रम्हचर्यचं पालन करत आहे आणि तिला नागा साधू बनवले जाऊ शकते. या गोष्टीचा निर्णय महिला नागा साधूच्या गुरू करतात. महिलांचे संन्यासी बनण्याच्या अगोदर मुंडन केले जाते. याशिवाय तिची पूर्ण परिपूर्णता निश्चित करण्यासाठी तिला सिद्ध करावे लागते की ती आपल्या परिवारापासून दूर झाली आहे आणि तिला कशाचाच मोह राहिला नाहीये.

संन्यासी बनण्याच्या अगोदर आखाड्याचे साधू संत त्या महिलेच्या परिवाराची माहिती तपासतात. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की कुंभमेळ्यात नागा साधूंसोबत महिला नागा साधू सुद्धा शाही स्नान करतात. नागा संन्यासी आखड्याचे सर्व साधू आणि संत त्यांना माता बोलतात आणि त्यांचा सन्मान करतात.

परंतु पुरुष नागा साधू आणि महिला नागा साधू यांच्यामध्ये फरक हा कपड्याचा असतो. एकीकडे पुरुष नागा साधू हे पिवळे वस्त्र घालतात आणि तेच घालून स्नान करतात. पुरुष नागा साधू हे नग्न स्नान करतात तर महिला नागा साधू मात्र पूर्ण कपड्यासहित स्नान करतात. महिला नागा साधूंना संन्यासी बनण्याच्या अगोदर स्वतःचे पिंडदान करावे लागते आणि तर्पण करावे लागते म्हणजेच त्या स्वतःला मृत मानतात.

महिला नागा साधू पूर्ण दिवस देवाचं स्मरण करत बसतात. त्या भगवान शंकराचा जप करत बसतात आणि फक्त खाण्याच्या वेळी थोडाफार आराम करतात. 2013 च्या कुंभमेळ्याच्या दरम्यान त्यांना स्नान आणि आखाड्यासाठी वेगळी जागा देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना प्रत्येक वेळी कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. याचा विरोध सुद्धा झाला होता पण तो जास्त दिवस टिकला नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *