कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ?

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत. आजवर… Continue reading कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ?

सध्याच्या परिस्थितीस व्यथित होऊन युवकाचे छत्रपती शिवरायंना पत्र…

महाराजसाहेब , आपल्या चरणासी विनम्रतापूर्वक मुजरा… महाराज, खरे तर पत्र लिहुन आपल्याला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती,पण साडेतिनशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला तुमच्या शिवाय दुसरा आधारच नाही. त्यामुळे नाइलाजाने हा पत्रप्रपंच करावा लागला.. महाराज, प्रतिगामी तुम्हाला ‘हिंदुत्ववादी’ म्हणुन स्विकारतात तर पुरोगामी तुम्हाला ‘धर्मनिरपेक्ष राजा’ मानतात. पण राजे, तुम्ही एक आदर्श पुत्र,पती,पिता आणि माणुस होतात हे मात्र… Continue reading सध्याच्या परिस्थितीस व्यथित होऊन युवकाचे छत्रपती शिवरायंना पत्र…

मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्तानात पसरले होते. गुजरात , दिल्ली, ओरिसा, मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश अशा उत्तर हिंदुस्तानावर वर्चस्व मिळवलेल्या शाहूंनी आपल्या आजोबांप्रमाणे दक्षिण भारतातही छाप सोडली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक प्रांती मोठी सत्ता हस्तगत केली, पुढे औरंगजेबाविरुद्धच्या निर्णायक लढाईत याच कर्नाटक प्रांताने संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांना सहाय्य… Continue reading मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम: दक्षिण दिग्विजय मोहीम

शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहिती आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी, मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याचे वीट आणि वीट शाबूत ठेवण्याचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून,त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकाळातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास… Continue reading शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम: दक्षिण दिग्विजय मोहीम

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..

म्हैसूर संस्थानचा दसरा देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचपाठोपाठ करवीर राज्याच्या शाही सीमोल्लंघन सोहळ्यालादेखील तितकेच, किंबहुना आपल्या दृष्टीने त्याहून अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजीत केल्या जाणाऱ्या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र हा शाही दसरा सोहळा नावारुपास आला तो राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला… Continue reading कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..