Mg id top
Loading...

नर्सनेच रुग्णांना केले ठार, मिळाले १३० मृतदेह, ३०० लोकांच्या खुनाचा संशय

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णांना दवापाणी करण्यासाठी नर्सची नेमणूक केली जाते. रुग्णांची चांगली सुश्रुषा करण्याने त्यांना बऱ्याच अंशी आराम मिळतो. पण उत्तर जर्मनीतील एका पुरुष नर्सने आपल्या दवाखान्यात आलेल्या रुग्णांना बरे करण्याऐवजी त्यांना मरणाची वाट दाखवण्याचे काम केल्याचा विषय चर्चेत आहे.

अशा बळी पडलेल्या रुग्णांची संख्या थोडीथोडकी नाही, तब्बल ३०० असण्याची शंका आहे. जाणून घेऊया या क्रूरकर्मा नर्सच्या घृणास्पद कृत्याबद्दल…

Loading...

कोण आहे तो क्रूरकर्मा नर्स

उत्तर जर्मनीतील ओल्डनबर्ग शहरातील नील्स होगल्स नावाच्या ४२ वर्षीय पुरुष नर्सला सर्वात खतरनाक सिरीयल किलर मानले जाते. त्याच्यावर ३०० हुन अधिक लोकांना चुकीची औषधे आणि इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार २००० पासून ते होगल्सला अटक करेपर्यंत ३०० रुग्णांचा मृत्यू झाल्याची शंका आहे. एवढे मृत्यू झाल्यानंतरही नील्स होगल्सचे कारनामे उघडकीस येण्यासाठी जवळपास एक दशक लोटावे लागले.

किती लोकांना मारले नील्स होगल्सने ?

होगल्सच्या हातून शिकार झालेल्या १३० हुन अधिक लोकांचे मृतदेह जर्मनी, तुर्की आणि पोलंडमध्ये सापडले आहेत. होगल्सने स्वतः ४३ लोकांना मारल्याचा दावा केला आहे. ५२ लोकांना मारल्याच्या गोष्टीचा ना स्वीकार केला आहे ना नकार दिला आहे. ५ लोकांच्या मारल्याचा दावा सरळ फेटाळून लावला आहे.

ओल्डनबर्ग हॉस्पिटलमध्ये काम करण्यापूर्वी नील्स ज्या डेल्मनहॉर्स्ट हॉस्पिटलात काम करत होता तिथेही त्याच्या निगराणीखाली असणाऱ्या ब्रिगिटे, हॅन्स एस., ख्रिस्तोफर के. आणि जोसफ झेड. यांचा अवघ्या काही महिन्यातच मृत्यू झाला होता.

नील्स काम करत असलेल्या हॉस्पिटलवर प्रश्नचिन्ह

सध्या नील्स होगल्स जर्मनीच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या खुनी सिरीयल किलरच्या भयानक कारनाम्यांची माहिती हॉस्पिटलच्या प्रशासनाला कशी नव्हती यावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हॉस्पिटलच्या प्रशासनालाही त्याच्यावर कधी संशय आला नाही. नील्स होगल्सच्या मृत रुग्णांची संख्या पाहता हॉस्पिटलनेही त्याला कधी नोटीस दिली नाही. तसेच त्याला रुग्णांपासून दूर ठेवण्याचा किंवा कामावर न येण्याचा आदेशही दिला नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *