मायावतींच्या नावाच्या आधी लावण्यात येणारे “सुश्री” चा नेमका अर्थ काय ?

अनेक सन्माननीय स्त्रियांच्या नावाच्या आधी सुश्री लावलेले आपण बघितले आहे. परंतु आपण कधी विचार केला आहे का नक्की सुश्रीचा अर्थ काय होतो. परंतु हा विषय आज का आला ? तर मायवती यांनी ६ फेब्रुवरीला आपले twitter खाते सुरु केले आणि या खात्यास नाव सुश्री मायावती हे देण्यात आले. परंतु याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना माहिती नाही आहे.

मायावतीचे समर्थक जेव्हा पण त्यांचे पोस्टर लावतात त्याच्यावर लिहलेले आढळेल कि सुश्री बहन मायावती जी आणि पार्टीत त्यांना बहनजी या नावाने ओळखल्या जाते. समाजवादी पार्टी आणि बसपाची युती होण्या अगोदर ते मायावतींना बुवा म्हणायचे परंतु आता ते सुध्दा बहणजी हाच शब्द वापरतात.

सुश्री चा इतिहास असा आहे कि, हरिवंशराय बच्चन सांगतात कि हिंदीची प्रसिध्द पत्रिका “पल्लव” चे संपादन सुमित्रा नंदन पंत करत होते. त्या काळात अनेक स्त्रिया आपल्या कविता पाठवत आणि त्यांच्या नावापुढे कुमारी हि नसत. त्यामुळे त्यांना मोठा प्रश्न पडत होता कि श्रीमती लावावे कि कुमारी ? त्या काळात फोन नसल्यामुळे परत संपर्क करण्याला मार्ग हि नव्हता.

त्यामुळे त्यांनी सुश्री लिहण्याचा निर्णय घेतला कारण हिंदी मध्ये विवाहित स्त्रीला श्रीमती आणि अविवाहित स्त्रीला कुमारी या शब्दाचा वापर होतो. परंतु ज्यांचे लग्न झाले का नाही हे माहिती नाही त्यांना सुश्री लावणे उचित आहे. सुश्री चा अर्थ सुंदर , चांगला असा होतो. हा शब्द इंग्रजीच्या Miss या शब्दापासून प्रभावित आहे.

या कारणामुळे मायावती यांच्या नावापुढे सुश्री लावण्यात येते. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *