Mg id top
Loading...

“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.

जिजाबाईंचा शिवाजी उर्फ रजनीकांत…!

आपल्या अभिनयाच्या एक वेगळ्या स्टाईल आणि जबरदस्त संवादफेकीने चित्रपटाला गर्दी खेचुन आणण्यात नेहमी यशस्वी होणारा सुपरस्टार रजनीकांत याच्याबद्दल आपणास माहिती नसणाऱ्या या २५ गोष्टी…

Loading...

१) रजनीकांतचे मुळ नाव शिवाजी गायकवाड असुन त्याचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुर येथे मराठा हेंद्रे पाटील कुटुंबात झाला.

२) रजनीकांतचे चाहते त्याचा जन्मदिवस १२ डिसेंबर जागतिक स्टाईल दिन म्हणुन साजरा करतात.

३) रजनीकांतचे पुर्वज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी येथील असल्याचे सांगितले जाते. जेजुरीचा खंडेराया हे रजनीकांतचे कुलदैवत आहे.

४) रजनीकांत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खुप मोठा चाहता असुन महाराजांचे भले मोठे पेंटिंग त्याच्या घरात लावलेले आहे.

५) हॉलीवुड अभिनेता जॅकी चॅन नंतर आशिया खंडातील सर्वाधिक मानधन (२६ कोटी – शिवाजी द बॉस) घेणारा तो अभिनेता आहे.

६) जगातील सर्वात जास्त चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणुन गिनीज बुकात त्याची नोंद झाली आहे. दक्षिण भारतात त्याच्या नावावर सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत.

७) रजनीकांतने ट्विटरवर अकाऊंट उघडल्यावर २४ तासातच तब्बल २१ लाख लोकांनी त्याला फॉलोव केले होते.

८) रजनीकांतने सुरुवातीच्या काळात खुप हालअपेष्टा सोसुन कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत केली. त्याने मद्रासमध्ये काही काळ सुतारकाम केले. बंगळुरमध्येही कुली काम करत करत तो ७५०रु. पगारावर बस कंडक्टर म्हणुन नोकरीला लागला.

९) बसमध्ये बोटांवरुन चिल्लर फिरवण्याच्या करामती, प्रवाशांना ऍक्शनमध्ये तिकीट देऊन झाल्यावर शिट्टी वाजवण्याची वेगळीच शैली, सिगरेट पेटवण्याची हटके स्टाईल यामुळे रजनीकांत लवकरच प्रसिद्ध झाला.

१०) रजनीकांतने कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळम, बंगाली, हिंदी, इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत मराठी असुन त्याने एकदाही मराठी चित्रपटात काम केले नाही हे विशेष.

११) रजनीकांतचे वडील रामोजी गायकवाड पोलीस हे कॉन्स्टेबल होते तर आई जिजाबाई या गृहिणी होत्या. रजनीकांत पाच वर्षांचा असताना त्याची आई वारली.

१२) रजनीकांतला दोन मोठे भाऊ व एक बहीण आहे. रजनीकांतच्या पत्नीचे नाव लता असुन त्याला सौंदर्या व ऐश्वर्या या दोन मुली आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य अभिनेता धनुषची पत्नी आहे.

१३) रजनीकांतचे प्राथमिक शिक्षण आचार्य पाठशाळा बंगळुर येथे तर उच्चशिक्षण बंगळुरच्या रामकृष्ण मिशनच्या कॉलेजमध्ये झाले. त्याने मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला.

१४) रजनीकांतला रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस अशा नावांनी ओळखले जाते.

१५) चेन्नईमध्ये रजनीकांतचा स्वतःचा राघवेंद्र मंडपम हा प्रसिद्ध मॅरेज हॉल आहे.

१६) रजनीकांतचा २००२ मधील बाबा आणि २००८ मधील कुसेलन हे चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर त्याने स्वतःच्या खिशातुन डिस्ट्रिब्युटर्सला नुकसानभरपाई दिली होती.

१७) रजनीकांत वेळेबाबत खुप शिस्तीचा असुन पहाटे पाचला उठुन योगा करतो. शुटिंगच्या अगोदर तो नेहमी हजर होतो. संध्याकाळी तासभर चालण्याचा व्यायाम करतो आणि रात्री ९ नंतर तो कुणालाही भेटत नाही.

१८) रजनीकांत १९९५ पासुन त्याचा प्रत्येक चित्रपट झाला की काही दिवस हिमालयात जातो. तिकडे गेल्यानंतर हृषिकेश येथील एका हॉटेलमध्ये तो नेहमीच्या ठरलेल्या एकाच खोलीवर मुक्कामाला असतो.

१९) भारत सरकारने रजनीकांतला २००० मध्ये पद्मभुषण आणि २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने गौरविले आहे. त्याचबरोबर जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीनमध्ये जगातील प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये स्थान असे विविध सन्मान त्याला मिळाले आहेत.

२०) १९७५ मध्ये तमिळ अपुर्वा रागणगल या पहिल्या चित्रपटातील खलनायकाच्या छोट्या भुमिकेपासुन त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. १९८८ मध्ये Bloodstone या एकमेव इंग्रजी चित्रपटात त्याने काम केले. अंधा कानुन हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट आहे. त्याने आजपर्यंत पावणेदोनशेच्या आसपास चित्रपटात काम केले आहे.

२१) धोतर कुर्ता हा त्याचा आवडता पोशाख आहे. मसाला डोसा हा खाद्यपदार्थ त्याला आवडतो. रजनीकांतला फार्महाऊसवर राहायला आवडते. तो त्याच्या चेन्नईतील आलिशान अशा Poes Garden या बंगल्यावर क्वचितच असतो.

२२) रजनीकांतचा रोबो २ हा चित्रपट पुर्णतः मेक इन इंडिया चित्रपट ठरला आहे.

२३) योगाचार्य सच्चिदानंद स्वामी यांच्यावर त्याची श्रद्धा आहे. रजनीकांत त्याची अर्धी कमाई सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात खर्च करतो.

२४) रजनीकांत आज जगातील कोणतीही वस्तु विकत घेण्यास सक्षम असला तरी अजुनही आपल्या जुन्या वस्तुच वापरतो. जसे की कपडे, जुनी चित्रे, त्याची जुनी गाडी.

२५) सर्वात शेवटी रजनीकांत हा त्याच्या चाहत्यांमध्ये एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे रजनीकांत जोक्स. जगात त्याच्याइतके जोक कुठल्याही व्यक्तीवर झाले नसतील. रजनीकांतला काहीच अशक्य नाही म्हणुनच कदाचित आज वयाच्या ६७व्या वर्षीही त्याच्याइतकी कमाई करणारा सुपरस्टार जगाच्या पाठीवर सापडत नाही.

कंडक्टर ते सुपरस्टार असा प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या या आपल्या मर्द मराठा शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांतला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा…
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *