इथे जन्मलेली प्रत्येक मुलगी बनते वेश्या, आशिया खंडातील सर्वात मोठी वेश्या वस्ती ‘सोनागाछी’

भले ही देह व्यापारासाठी भारतात कायदा आहे पण अनेक मुलींच्या नशिबात हे नसतं. वेश्या वस्त्या आल्या कुठुन? याविषयी अनेक प्रकारचे मत आहेत, ज्यामध्ये जास्त लोकांचं हेच म्हणणं आहे की पूर्वी या जागेवर नाचणे गाण्याचे प्रकार होत असत. ज्याला कलेचा एक भाग म्हणून बघितले जात असे. पण वेळ गेला काळ बदलला तसं त्याची जागा एका शापाने घेतली. देशातील अनेक भागात आजसुद्धमुलींना या शापाच्या हवाली केलं जातं. त्यामधील एक ठिकाण म्हणजे कोलकात्यातील सोनागाछी.

सोनागाछी आहे आशियातील सर्वात मोठी वेश्या वस्ती-
सोनागाछीची झोपडपट्टी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी वेश्या वस्ती आहे. इथे अनेक गॅंग आहेत ज्या या देह व्यापाराच्या धंद्याला चालवतात. या वस्तीमध्ये 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या जवळपास 12 हजार मुली सेक्स व्यापारात समाविष्ट आहेत. फोटोग्राफर सॊविद दत्ता नुकतेच तिथे गेले आणि त्यांनी काही निवडक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या फोटोंना त्यांनी श्रेणीत टाकले आहे आणि The Price Of A Child असे नाव दिले आहे.

वस्तीवर बनला आहे सिनेमाही-
खरंतर वेश्या वस्ती आणि वेश्यावर अनेक सिनेमे आजपर्यंत तयार झाले आहेत. परंतु हे माहिती झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोलकात्यातील या रेडलाईट एरिया विषय घेऊन एक सिनेमा तयार झालेला आहे. Born Into Brothels नावाच्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार सुद्धा भेटला आहे.

मन भरेल तुमचं-
याला दुर्भाग्य म्हणणं चुकीचं आहे कारण हे त्याच्या बरेच पूढे आहे. ज्या वयात आपले आईवडील आपल्याला जगातील रीतिरिवाज, लाज-लज्जा शिकवतात पण इथल्या मुली या वयात स्वताला विकायचं शिकतात. 12-17 वर्षाच्या मुली मानसासोबत झोपायला शिकतात. त्यांना खुश ठेवायचं शिकतात, त्याबदल्यात त्यांना 2 डॉलर म्हणजेच 124 रुपय मिळतात. या रुपयांच्या बदल्यात इथल्या स्त्रिया पुरुषांची हावस भागवण्यासाठी त्यांच्या टेबलवर झोपतात.

नाही येऊ शकत कोणीही बाहेरुन-
या वस्तीमध्ये कोण्या बाहेरच्या व्यक्तीच्या येण्यास बंदी आहे. एवढेच नव्हे तर पत्रकार आणि फोटोग्राफरना सुद्धा हे लोक आतमध्ये येऊ देत नाहीत. दत्ताच्या मते सर्व गरिबी, भ्रष्टाचार आणि अनैतिकताचा परिणाम आहे. इथल्या जास्त मुली या शाळा सोडून आल्या आहेत आणि आता देहविक्रीचे शिक्षण घेत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *