बंद कारमध्ये एसी सुरु करुन झोपणे आहे धोकादायक, जीवही जाऊ शकतो

गरमीच्या काळात लोकांना एका गोष्टीची फार ओढ असते, ती म्हणजे थंडावा ! मग थंड पेय, थंड आहार, थंड सावली अशा गोष्टींसोबत एसीकडेही लोकांचा ओढा असतो. अनेकदा असे बघण्यात येते की आरामच्या वेळी लोक केवळ या कारणासाठी कारमध्ये जाऊन बसतात की कारमधील एसीचा थंडावा मिळावा.

दुपारच्या जेवणानंतर किंवा शॉपिंगच्या वेळी लोक आरामासाठी हा मार्ग अवलंबतात. परंतु या मार्गाने जर आपण बंद कारमध्ये एसी चालू करुन झोपत असाल, तर सावधान का. कारण हे तुमच्या जीवावर देखील बेतू शकते..

बंद कारमध्ये एसी सुरु करुन झोपणे का आहे धोकादायक ?

वास्तवात बंद कार ही एखाद्या छोट्या बंद खोलीसारखीच असते. अशा बंद कारमध्ये एसी चालू केला तर त्या आवश्यक प्रमाणात व्हेंटिलेशन होऊ शकत नाही. त्यामुळे कारमध्ये कार्बन मोनो ऑक्साईड हा गॅस जमा व्हायला सुरुवात होते.

Loading...

कार्बन मोनो ऑक्साईड हा ऑक्सिजन आणि कार्बन पासून बनतो. त्यामुळे बंद कारमध्ये उपलब्ध असणारा ऑक्सिजन हा कार्बन मोनो ऑक्साईड गॅस तयार होण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हळूहळू कारमध्ये त्याचे प्रमाण कमी होत जाते.

जाऊ शकतो जीव…

डॉक्टरांचे असे सांगणे आहे की कार्बन मोनो ऑक्साईड आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरातील रक्तात मिसळत जातो. तो रक्तात मिसळायला सुरुवात झाली की ब्लड सर्क्युलेशनमुळे शरीरात वाहणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत जाते.

अशा परिस्थितीत शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने अत्यंत कमी काळात कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे बंद कारमध्ये एसी चालू करुन झोपणे जे आपल्या जीवावर बेतू शकते आणि कदाचित आपला जीवदेखील जाऊ शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *