श्रीदेवी यांचा मृत्यू होण्याअगोदर अमिताभ यांना कशाप्रकारे लागली होती चाहूल? 0

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी दुबईत त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेल्या होत्या. या लग्न सोहळ्यानंतर दुबईतच त्याचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र श्रीदेवी यांच्या निधनाच्या काही तास आधी अमिताभ बच्चन यांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांना काही तरी अघटीत घडणार याची चाहूल आधीच लागली होती का? असे अनेक प्रश्न आता सर्वांच्या डोक्यात घोंगावत आहेत.

T 2625 – न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!, असं ट्विट रात्री १ वाजून १५ मिनिटांनी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. त्यानंतर रात्री २ वाजून १४ मिनिटांनी फिल्मफेअरनं अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दिली. भल्या सकाळी श्रीदेवीच्या चाहत्यांना मिळालेली ही बातमी अत्यंत धक्कादायक होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं. अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांचं निधन होणार असं माहीत होतं का ? असा प्रश्न लोकांच्या मनात तयार झाला आहे.

अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे, ती ५५ वर्षांची होती. तिला आलेला ह्रदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीदेवी तिचा नवरा बोनी कपूर आणि लहान मुलगी ‘खुशी’ सोबत दुबईला मोहीत मारवाह याच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तिची मोठी मुलगी जान्हवी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने ती या लग्नसमारंभाला जाऊ शकली नव्हती.

श्रीदेवी विवाहसोहळ्यादरम्यान बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान करत मृत घोषित केलं. बोनी कपूर यांचा लहान भाऊ संजय कपूर याने या वृत्ताला दुजोरा दिला असून हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान श्रीदेवीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लागीर झालं जी मधील राहुल्याने घेतली महागडी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल… 2

राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे. ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला. पण सध्या राहुल खूप फोर्म मध्ये आहे कारण त्याने भल्या भल्याने जे शक्य होत नाही ते करून दाखवले आहे.

राहुल मगदूम याने नवीन BMWX3 हि कार घेतली आहे. हि खबर लागीर झालं जी मधील आज्या चा दोस्त असणारा विक्या म्हणजेच निखील चव्हाण याने instagram वरून दिली आहे. BMW x3 या कारची किमत तब्बल ५० लाख रुपये आहे. राहुल्याने हि कार घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. BMW कार घेतल्याने राहुल्या सध्या लय फोर्मात आहे असेच बोलल्या जाते आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

विराट कोहलीला पिण्यासाठी लागणाऱ्या एक लिटर पाण्याचा खर्च ऐकून हैराण व्हाल… 0

विराट कोहली हा फक्त एक क्रिकेटपटू राहिला नसून करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आदर्श बनला आहे. क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर नंतर विराट कोहली हे एकमेव नाव आहे ज्याला देश आणि विदेशात प्रेम आणि सन्मान मिळतो. विराट कोहलीने कमी वयातच अनेक असे रेकॉर्ड बनवले आहेत ज्यांना तोडणे कठीण वाटते. पण यासाठी कोहलीची फिटनेस खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कोहली आपल्या फिटनेस साठी केवळ भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे.कोहलीच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा त्याच्या फिटनेसचाच आहे. आपल्या फिटनेससाठी तो आपल्या खाण्यापिण्याचं स्वतः विशेष ध्यान ठेवतो. तो सकाळ-संध्याकाळ जिम ना चुकता करतो. तो खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच कंजूशी नाही करत. जंक फुडपासून तो नेहमी दूर राहतो.

पण फिटनेस मध्ये महत्त्वाची भूमिका असते तीे पाण्याची. विराट कोहली बाहेरचं खाण्यासोबत बाहेरचं पाणीही टाळतो. विराट हा एक खास प्रकारचं पाणी पितो. बोलले जाते की विराट जे पाणी पितो ते एवियन पाणी खूप महाग असते आणि हे पाणी फ्रांसवरून मागवले जाते.

या पाण्याच्या एक लिटर बाटलीची किंमत तब्बल 600 रुपये आहे. या कंपनीच्या 1 लिटर पाण्याची किंमत तब्बल 600 रुपयांपासून 36000 रुपये पर्यंत आहे. एवीयन कंपनीचे पाणी भारतात मिळत नाही त्यामुळे कोहली नेहमी काही बाटल्या आपल्यासोबत ठेवतो. या कंपनीचे पाणी अनेक मोठे सेलेब्रिटी आणि क्रिकेटर करतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: जाणून घ्या बॅटवर स्टीकर लावण्याचे किती पैसे घेतात स्टार क्रिकेटर ?
अधिक वाचा: विराट आणि अनुष्कासोबत रिसेप्शन मध्ये आलेला कोण आहे हा पाहूणा जाणून घ्या खासरेवर
अधिक वाचा: मुकेश-नीता अंबानी आपल्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायचे, वाचून आश्चर्याचा धक्का बसेल…

Comments

comments

या मुलीच्या व्हिडीओने इंटरनेटवर घातलाय अक्षरशः धुमाकूळ, बघा कोण आहे हि मुलगी… 0

इंटरनेटवर कधी कोणती गोष्ट वायरल होईल सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर एका मुलीच्या व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. व्हाट्सएप, फेसबुक सहित सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मुलीचं गाणं असलेला व्हीडीओ सध्या खूप गाजला आहे. या व्हिडीओचे प्रचंड वायरल होण्यामागचे कारण म्हणजे या मुलीने या व्हिडीओ मध्ये जे एक्सप्रेशन दाखवले आहेत ते पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. या एक्सप्रेशननी लोकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले आहेत मात्र या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

या गाण्यात दिसणारी ही मुलगी एखादी साधीसुधी मुलगी नाहीये तर ती आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीअर. प्रिया ही एक अभिनेत्री असून ती मल्याळम सिनेमा ‘ओरु आदर लव्ह’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. याच सिनेमातील एक गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्याने थोड्याच कालावधीत इंटरनेटवर लाखो हिट्स मिळवले आहेत. ‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्याने एक दिवसातच प्रिया ला प्रसिद्धीझोतात आणले आहे.

या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे. शान रहमानने हे गाणं पोस्ट केल्यानंतर इंटरनेटवर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रियाचा हा पहिला सिनेमा 03 मार्च 2018 ला रिलीज होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

%d bloggers like this: