सावधान!शिवाजी नाहीसा होतोय.. 4

शिर्षक वाचुन जरासं चमकल्यागत होईन,काहींना उगाच छञपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल राग य़ेईन,पण गेल्या महीन्यात असा काही प्रसंग माझ्यासोबत घडला ज्यामुळे मला वाटलं की खरंच शिवाजी आपल्यातुन नाहीसा होत चाललाय ,की आपणच हऴुहऴु त्याला नाहीसं करत चाललोयत.?

रविवारची सुट्टी होती ,बरेच दिवस कुठं फिरायला गेलो नव्हतो म्हणुन माझे सहकारी मिञ डाँ.जाधव त्यांचा सौ आणि ५ वर्षांची छोटी मुलगी नित्त्या आणि आम्ही दोघे नवरा बायको असा फिरायला जायचा प्लँन बनला. जवऴच ३०कि.मि वर डोंगरांच्या मधोमध एक हनुमानाचे मंदिर आहे तिथं आम्ही सरांच्या ४ व्हीलर मधे निघालो.रस्त्यात नित्त्याने इंग्लिश च्या खुप सा-या पोयम्स म्हणुन दाखविल्या सर आणि मँडम दोघेही तिला प्रोत्साहन देत होते. मला आणि प्रीतीलाही तिचं खुप कौतुक वाटलं…मग काँन्व्हेंट ,तिथला होमवर्क ,तिथल्या मिस,सगऴ्याबद्दल नित्त्याने भरभरुन सांगितलं. डोंगरामधुन वऴणे घेत घेत आम्ही एकदाचे तिथं पोहोचलो.

दर्शन झाल्यानंतर असंच आजुबाजुच्या टेकड्यांवर फिरत असताना आम्ही एके ठीकाणी पोहोचलो जिथं दरीवजा जागा होती.समोर गडद हिरवी झाडी,मध्येच थंड हवेची येणारी झुऴूक,अचानक समोरुन येणारे ढग आणि आपल्याला हरवुन टाकणारे धुके.डोळे बंद करुन मी तो गारवा अनुभुवत होतो आणि अचानक माझ्या डोऴ्यापुढे तरळु लागला आपला सह्याद्री,आपला पुरंदर,रायगड,प्रतापगड, आपले शिवराय…

भारावलेल्या अवस्थेतच शेजारी उभ्या असलेल्या नित्त्याला विचारलं तुला शिवाजी महाराज माहितेत का गं?
तिच्या चेह-यावरचे हावभाव बिलकुल ही न बदलता ती सहज म्हणाली ‘नाही’ .
मला तर गालात चपराक मारल्यासारखीच झाली.
तेवढ्यात सर म्हणाले ,”मी नव्हतं का सांगितलं बाळा शिवाजीने कोणत्या खानाला मारलेलं?”
पहिल्यापेक्षा ही अजुन सहजपणे ती म्हणाली , “हो,आमीर खान ला.”
सर,”आमीर खान नाही बाळा,अफजलखान.”

एव्हाना नकळत झालेल्या जोक वर सर्वच हसत होते…मीही त्या हसणा-यांचा गर्दीत होतो पण कऴत नव्हतं हसतोय नेमकं त्या जोकवर की ज्वाज्वल्य इतिहासाच्या झालेल्या दुर्दशेवर..

पाश्चात्य जीवनशैलीचं आंधऴ्याप्रमाणे अनुकरण करता करता आम्ही आमच्याच जीवनमुल्यांपासुन कधी भरकटलोत तेच समजलं नाही.चकचकीत वाटणा-याला सोनं समजत चाललो आणि जे देदीप्यमान,तेजपुंज आहे ते विसरत चाललो.

आज शिवाजीच वादग्रस्त बनलाय कधी त्याचा जन्मतिथीमुळे ,कधी जेम्स लेन प्रकरणामुळे तर कधी अरबी समुद्रातल्या स्मारकामुळे. लहाणपणी आजीच्या शेजारी आम्ही सर्व भावंडं गोष्ट एेकण्यासाठी झोपायचो, मग आजी सांगायची जिजाऊचा बाल शिवबा,आईचा आदर करणारा,स्वराज्याचा निर्धार करणारा,अन्याय आणि दुष्टांचा संहार करणारा शिवबा,स्ञीयांचा आदर करणारा शिवबा लहानाचा मोठा होत असताना रक्तामध्ये हळुहळु भिनायला लागलेला शिवबा मग जसजशी समज वाढत गेली वय वाढत गेली तसतसं पुस्तक, टीव्ही,
कादंब-या ,वर्तमानपञ जिथं जिथं शिवबा सापडत गेला तिथं तिथं वाचत गेलो ,शिवबा समजुन घेत गेलो. नकळत डोक्यातला आणि ओठांवरचं शिवबा हे नाव बदलुन छञपती शिवाजी महाराज कधी झालं तेच समजलं नाही.

होय छञपती शिवाजी महाराज! लहानांपासुन ते व्रुद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी ‘दीपस्तंभ’ बनलेले अवलिया म्हणजे महाराज जगावं कसं,मुल्य जपावीत कशी हे शिकवणारा ‘आद्यशिक्षक’ म्हणजे महाराज. स्वाभिमान आणि शौर्याचा ‘मुर्तिमंत पुतऴा’ म्हणजे महाराज. रांझ्याच्या पाटलाचे हात तोडुन आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई संबोधुन सोडुन देऊन अखंड स्ञीजातीला बहीण आणि मातेसमान मानण्याचा आदर्श घालुन देणारा ‘चारिञ्यवान’ राजा म्हणजे महाराज, आभाळ कोसळलं तरी डगमगुन न जाता धैर्याने उभं राहायला शिकवणारा ‘ऊर्जास्ञोत’ म्हणजे महाराज. रणांगनावरचं शञुत्व रणांगनावरंच सोडुन कुराणची प्रत मुस्लिम सैन्यांकडे देणारा ‘मानवतावादी’ सम्राट म्हणजे महाराज. प्रजेच्या गवताच्या काडीलाही हात लावाल तर याद राखा असं आपल्या सैन्याला निक्षुन सांगणारा आणि प्रजेवर जीव ओवाळुन टाकणारा राजा म्हणजे महाराज. पण दुर्दैवाने आपल्यातुन हरवत चाललेत महाराज.

जगण्याचा प्रत्येक पैलु हा महाराजांचा अभ्यास आणि आवड निर्माण केली तर पुढच्या पिढ्यांना आत्मसात होईन.पण नाही आम्हाला फक्त आंधळेपणाने पाश्चात्य जीवन,शिक्षण स्विकारायचंय ज्यात माणुस म्हणुन जगण्यासाठी लागणारी तत्व कुठंच नाहीत आहे ती फक्त स्वार्थ,चंगऴवादाची रेलचेल.ब-याचदा आपण फक्त अनुकरण करतोय हेच आपल्याला समजत नाही.आणि म्हणुनच आपली पिढी सशक्त बनत नाहीय.

छोट्या छोट्या कारणावरुन आत्महत्येमुळं कितीतरी कोवळी मुल्ं मरतायत,व्यसनाधीनतेचं वय हऴुहळु १४-१५ वर्षापर्यंत येतंय,बलात्कार आणि अत्याचार करणा-यांत अल्पवयीन गुन्हेगार वाढतायत. का होतंय हे सगळं? केला कधी मुळाशी जाऊन विचार? करा कधीतरी विचार मग समजेन हे सगळं घडतंय ते शिवाजी आमच्यातुन नाहीसा होत असल्यामुळे. कारण शिवाजी ही व्यक्ती नसुन ती एक जीवनपद्धती आहे ज्यातुन संस्कार आणि मुल्य जपण्याची शिकवण मिळते.

पण य़ा मिथ्या पाश्चातिकरणामुळे आपण या जीवनपद्धतीलाच तिलांजली दिलीय.शरम वाटायला हवी…

जाँनी जाँनी एस पप्पा म्हणना-या 3-4 वर्षांचा लेकराचं आपल्याला खुप कौतुक वाटतं पण ज्या वयात व्यक्तीमत्वाची जडणघडण होण्यासाठी शिवरायांसारखी व्यक्तिमत्व त्याचा मनात रुजवली पाहीजेत त्या काळात हा काल्पनिक जाँनी,काल्पनिक पप्पा आणि काल्पनिक शुगर आपण त्यांचा मनात घोळत ठेवतो. ज्या वयात मन आणि मनगट बऴकट होण्यासाठी शिवरायांचे किल्ले आणि शिवरायांच चरिञ त्यांचा हातात पडायला पाहीजे त्याकाळात व्हीडीओ गेम्स ,कार्टुन रिमोट,आणि मोबाईल त्यांचा हातात देतोयत. आणि आपणंच हळु हळु शिवाजी नाहीसा करतोयत.

पण हे थांबलं पाहीजे,य़ेणारा काळ हा संघर्षाचा असणार आहे,स्पर्धेचा असणार आहे. सायन्स इतकं पुढं जाईन की अन्नधान्य आणि सुखसोईंची रेलचेल असेन. पण सायन्स कितीही पुढं गेलं तरी मानवी मुल्य ही पिकवता येणार नाहीत किंवा त्यासाठी कोणती मशीन बनवता येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला इतिहास आणि शिवबा य़ेणा-या पिढ्यांमध्ये रुजवावा लागेन.
कारण जे लोक इतिहास विसरतात ते कधीच इतिहास बनवु शकत नाहीत…

सरतेशेवटी एकच आवाहन माँडर्न बना,नवे तंञ ,नवी जीवनपद्धती अवगत करा ,जगाच्या स्पर्धेत टीकण्यासाठी संघर्षही करा पण हे सर्व करत असताना छञपती शिवाजी महाराजांसारखा जो तेजस्वी वारसा आपल्याला लाभलाय तो तुम्ही विसरु नका आणि पुढच्या पिढ्यांनाही विसरु देऊ नका. हात जोडुन सांगतो. शिवाजी नाहीसा होऊ देऊ नका.

डाँ.विशाल शेटे यांच्या फेसबुकवरून
हे सत्य पटल्यास अवश्य शेअर करा…

Comments

comments

Previous ArticleNext Article

4 Comments

    1. डॉ.साहेब लहान मूल ही अनुकरण प्रिय असतात आपणच त्याना इंग्रजीच्या अती हव्यसा पाई ज्या वयात शुभोंकरोती शिकवायला पाहीजे त्या वयात जॉनी जॉनी शिकवतो मग कसे त्यांना आपले महाराज समजनार तुमचा लेख वाचला आणि मन सुन्न झाले असे वाटते आपण पुढची पीढ़ी नासावत् तर नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA.. 0

महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…

गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..

सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..

 

 

आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?
माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?

रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..

अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .
अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..

असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..

त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…

महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…

प्राजक्त झावरे पाटील

Comments

comments

काय सांगते शिवरायांची राजमुद्रा ? 0

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

मराठी अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची (राज)मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी विराजमान होते.

English Meaning –
The glory of this Mudra of Raja Shahaji’s son Shivaji will ever increasing like the crescent moon, it will be worshiped by the world and it will shine only for welfare of the people.

छत्रपती शिवाजी महाराजांना बेंगलोरहुन पुण्याला पाठवताना शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत ही राजमुद्रा, भगवा झेंडा आणि विश्वासु माणसं दिली होती. त्यावेळी शिवरायांचं वय होतं अवघं बारा वर्षे.

शिवरायांच्या माध्यमातुन उभा होणारं स्वराज्य कसं असावं याचा विचार करुनच शहाजीराजेंनी अत्यंत दुरदृष्टीने तिची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्यावर नजर टाकली असता ते कार्य राजमुद्रेवरील ओळींच्या अंकित राहुनच केल्याचे दिसुन येते. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी उद्देशिका जशी मार्गदर्शक ठरली त्याचीच भुतकाळातील आवृत्ती म्हणजे शिवरायांची राजमुद्रा. स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरणारी ही राजमुद्रा समोर ठेवुनच शिवरायांनी आपल्या विश्वासु सहकाऱ्यांच्या सोबतीने स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला.

आपली राजमुद्रा समजुन घेताना शिवछत्रपती कुतूहलापोटी चंद्राच्या प्रतिपदेपर्यंतच्या कलांचे ज्यावेळी निरीक्षण करत असतील तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतील याची कल्पना करुन पहा.

अगदी राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले. प्रसंगी शस्त्र उचलुन शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली. रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले. त्यांचे व्यक्तित्व आहेच विश्वव्यापक. स्वतः शहाजीराजेंनीच त्यांच्याकडुन विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवुन राजमुद्रेत “विश्ववंदिता” या शब्दाचे प्रयोजन केले होते.

इतिहासाच्या पटलावरील “शिवाजी” हा तीन अक्षरी शब्द स्वतःच एक वेगळा धर्म, जात, प्रांत, राष्ट्र आणि विश्व आहे. त्यांचा जन्म या पृथ्वीवर, भारतवर्षात, महाराष्ट्रप्रांती, हिंदु धर्मात, मराठा जातीत, भोसले घराण्यात झाला हे वास्तव कुणी नाकारत नाही. शिवाजी महाराज हे भोसले, मराठा, हिंदु, महाराष्ट्रीय, भारतवर्षीय किंवा पृथ्वीवासी होते म्हणुन एवढे विश्ववंदनीय कार्य करु शकले नाहीत, तर ते “शिवाजी” होते म्हणुन हे कार्य करु शकले. हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांची ओळख उतरत्या क्रमाने व्हावी की उलट चढत्या क्रमाने होत जावी याचा प्रत्येकाने विचार करावा. शिवरायांचे व्यक्तित्व कुठल्याही चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे कर्तृत्व या सगळ्या चौकटी मोडुन त्याच्या पलीकडे जाणारे आहे. राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणेच विश्ववंदनीय आहे.

– अनिल माने

Comments

comments

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर 0

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी रचलेल्या राजकारणाचा तसेच योजलेल्या युक्त्या-कुलपत्यांचा वृतांत कथन कराणार्या अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर.(सारांश स्वरूपात)

•••बारा मे १६६६•••
(परखलदास कडून कल्याणदास यांस)

शिवाजीमहाराज रामसिंगाला उद्देशून : मी कशाप्रकारचा माणूस आहे हे तुम्ही पाहीले, तुमच्या वडीलांनी पाहीले, मला मुद्दामच इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मनसब टाकून देतो मी उभे रहावे अशी तुमची इच्छा होती तर मला योग्यतेनुरूप उभे करावयचे होते. माझे मरण ओढवले आहे. एक तुम्ही तरी मला मारा नाहीतर मी स्वताला मारून घेईन.
मोगल सरदार मुल्तफाखान व मुखिलखान यांना उद्देशून : मी वस्त्रे घेणार नाही. बादशहाने मला मुद्दामच जसवंतसिंगाच्या पाठी इभे केले. मला मारायचे असेल तर मारा, कैदेत टाकायचे असेल टाका. मी वस्त्रे घालाणार नाही.
तळावर परतल्यावर सायंकाळी रामसिंगाने शिवाजीमहाराजांची समजूत घातल्यावर महाराज म्हणाले ठिक आहे मी आपल्या मुलाला( संभाजीला) माझ्या भावाबरोबर( रामसिंग₹ पाठविन. मीहि दोन दिवसानंतर येईन.शिवाजीमहाराज रामसिंगाला उद्देशून : मी कशाप्रकारचा माणूस आहे हे तुम्ही पाहीले, तुमच्या वडीलांनी पाहीले, मला मुद्दामच इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मनसब टाकून देतो मी उभे रहावे अशी तुमची इच्छा होती तर मला योग्यतेनुरूप उभे करावयचे होते. माझे मरण ओढवले आहे. एक तुम्ही तरी मला मारा नाहीतर मी स्वताला मारून घेईन.

•••२९ मे १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजेंनी मुहंमद अमीनखान द्वारे बादशाहला एक अर्जी दिली आहे. त्यात शिवाजीराजेंनी म्हटले आहे : बादशाहांनी माझे जे किल्ले घेतलेत ते सर्व परत करावेत. मी दोन कोटी बादशहांना देईन. मला निरोप द्यावा. मी आपल्या मुलाला चाकरीत ठेऊन जाईन. माझ्याकडून बादशहाने पाहीजे तशी शपथ घ्यावी. मी बादशहाच्या वतनावरील श्रद्धेने येते आलो आहे. माझी निष्ठा खरी आहे. बादशहांनी एखादी मोहीम काढली तर मला बोलवावे मी येऊन हजर होईन. आता बादशहाने विजापूरची मोहीम हाती घेतली आहे. तेथे मला जाऊ द्यावे.

•••७ जून १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास दिवाण यांस)
बादशहाने शिवाजीराजेंनी निरोप पाठिवला की तुमचे सगळे किल्ले मला देऊन टाका. मी तुम्हाला मनसब देईन. शिवाजीराजेंनी अर्ज केला मला मनसबची इच्छा नाही. आणि किल्ले माझ्या अधिकारात नाहीत.
त्याच पत्राचा पुढील मजकूर आहे: मी ऐकतो की, शिवाजीराजे कुमार रामसिंग याजपाशी येऊन त्याला म्हटले मला वाटत होते की या बादशाहीत तुमचे सांगितलेले ऐकतात. पण येथे तर तुम्ही माझ्याबद्दल बादशहाला पुष्कळ समजावीत आहात. आता तुम्ही एक काम करावे. बादशहाला तुम्ही म्हणावे, हजरत हा शिवाजीराजा, त्याच्यावर मी आता लक्ष ठेवणार नाही, त्याला मारायचे असेल तर मारा. यावर रामसिंग म्हणाला मी तुम्हाला कसा सोडीन ?

•••९ जून १६६६•••
(परखलदास यांजकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजेंपाशी असलेले किल्ले त्यांनी द्यावे असे बादशहाने त्यांना सांगितले. पण शिवाजीराजे तयार झाले नाहीत. राजेंनी बादशहाला एक अर्जी केली आहे त्यात म्हटले की मला राहण्यासाठी एक वाडा देण्यात यावा त्यात मी जाऊन राहीन. पण येथे रामसिंगाशी माझा काही संबंध ठेवू नका…. शिवाजीराजेंनी रामसिंगाला सांगून पाठवले की तुम्ही माझ्याबद्दलचे जामिनपत्र बादशहाला लिहून दिले आहे ते परत मागवून घ्या. बादशहा माझे वाटेल ते करू द्या.आठ जूनला शिवाजीराजेंनी आपल्या सगळ्या नोकरांना निरोप दिला.आणि त्यांना म्हटले : येथून निघून जा. माझ्याजवळ कोणीही राहू नका. मी येथे एकटा राहीन. त्यांना मला मारायचे असेल तर मारू द्या. शिवाजीराजेंनी सिद्दी फौलादखानाच्या मार्फतीने बादशहाला कळविले की मी आपल्या सैन्याला निरोप दिला आहे. त्यांना दस्तके( प्रवासाचे परवाने) देण्यात यावी ही विनंती आहे.

•••१६ जून १६६६•••
( बल्लशहाकडून कल्यादास यांस)
अलिकडे शिवाजीराजेंनी बादशहाला अर्ज केला की मी फकिर ( संन्यासी किंवा बैरागी) होऊ इच्छितो. आज्ञा झाली तर मी काशीला जाईन. बादशहाने म्हटले ठिक आहे फकिर होऊन त्याने प्रयागच्या किल्ल्यात राहवे. तेथिल सुभेदार बहाद्दूरखान याचे त्याच्यावर लक्ष राहील.

•••१३ जुलै १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास दिवाण यांस)
शिवाजीराजेंनी मुहंमद अमिनखान व अकिलखान यांच्या मारफत पत्र लिहीली आहे. बादशहीलाही त्यांनी एक अर्ज केला आहे त्यात म्हटले आहे की मी बादशहांना माझे सर्व किल्ले देऊन टाकतो. बादशहाने मला स्वदेशी परतण्याची परवानगी द्यावी. मी येथून लिहीले तरी माझे अधिकारी मानणार नाहीत. मी तेथे जाईन आणि त्यांच्याशी लढून गड घेऊन बादशहांना देईन.बादशहाला हे पटले नाही. त्याचे म्हणने शिवाजी तेथे गेल्याने गड देतील ते येथून लिहिल्याने देणार नाहीत काय ?
त्याच पत्रातील पुढील मजकूर आहे: कुमार रामसिंग याने शिवाजीराजेंनी म्हटले बादशहांना किल्ले देऊन टाका. यावर शिवाजीराजे म्हटले तुमच्या वडीलांनी माझे बावीस किल्ले बादशहाला दिले आणि त्यांच्या मोबदल्यात टोकचा परगणा मिळवला. आता तुम्ही माझे इतर किल्ले बागशहाला देऊ करत आहात. तर तुम्ही कोणता परगणा मिळवण्याचा विचार करत आहे. तुम्ही तोडाचा परगणा घेणार आहात काय ? हे ऐकून कुमार रामसिंग गप्प बसला.

•••१८ जुलै १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजे कुमार रामसिंगापैशी येऊन बसले होते. रामसिंगाने त्यांना म्हटले बादशहा तीन दिवसासाठी शिकारीला जात आहे ( २४ जुलै ते २७ जुलै ). मी त्यांच्याबरोबर जात आहे. त्यावर शिवाजीराजे म्हणाले तुम्ही बादशहाला म्हणावे मी शिवाजीवर लक्ष (निगाहबान) ठेवून आहे. म्हणजे बादशहा तुम्हाला येथेच ठेवेल. कुमार रामसिंग म्हणाला तुम्ही येत असाल तर तुम्हालाही शिकारीसाठी बरोबर घेऊन चलतो. शिवाजीराजे म्हणाले बादशहा माझे प्रकरण केव्हा निकालात काढणार आहे ? मी त्यांना सांगितले की माझा मामला निकालात काढा. मी असाच मरून जाईन आणि किल्ले पण बादशहाच्या हाती लागणार नाहीत.

•••२२ जुलै १६६६•••
(परखलदास यांचे कल्याणदासांच्या नावे)
शिवाजीराजेंचा एक कवी कवीन्द्र कवीश्वर आहे. त्याला शिवाजीराजेंनी एक हत्ती एक हत्तीण एक घोडा आणि वस्त्र दिली आहेत. त्याला आणखी एक हत्ती देण्याचे वचन दिले आहे.शिवाजीराजे म्हणत आहेत : बादशहा मला येथून जाण्यासाठी दस्तक देत नाही. नाहीतर मी आग्र्यात घोड्यावरून प्रवेश केला त्याचप्रमाणे घोड्यावर स्वार होऊन आग्र्यातून निधीन गेलो असतो. माझे हत्ती घोडे सर्व वाटून टाकिन आणि बैरागी होऊन बसून राहीन.

•••१८ ऑगस्ट १६६६•••
(बल्लूशहाकडून कल्याणदास यांस)
भाद्रपदे वद्य १४ शनिवार ( १८ ऑगस्ट १६६६) सवाराही सेवोजी अठास्यो भागो…. अर्थात आज सकाळीच शिवाजीराजे येथून पळाले.
(साभार : समग्र सेतू माधवराव पगडी)

Courtesy
Ajay Veersen Jadhavrao

Comments

comments