Mg id top
Loading...

सौरभ गांगुली यांनी बीसीसीआयचा अध्यक्ष होऊन मोडला हा ६५ वर्ष जुना “विक्रम”

भारतीय क्रिकेटविश्वात प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेला, टीम इंडियाचा माजी कप्तान दादा उर्फ सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सौरवची निवड करण्यात आल्याचे समजते. रविवारी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बीसीसीआयची औपचारिक बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होऊ शकते. अरुण हे केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. त्याचवेळी आसामच्या देबाजीत सैकिया यांची संयुक्त सचिवपदी निवड होण्याचीही शक्यता आहे.

Loading...

सध्या बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष असलेले सौरव गांगुली जुलै 2020 पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्ष पदी राहतील. हे यामुळे की 6 वर्षांच्या त्यांचा प्रशासकीय कार्यकाळ जुलै 2020 मध्ये पूर्ण होत आहे. ते 2014 मध्ये बंगाल क्रिकेट संघाच्या संयुक्त सचिव बनले होते. आता 47 वर्षीय गांगुली जुलै 2020 मध्ये कॅब पदाधिकारी म्हणून 6 वर्ष पूर्ण करतील. त्यानंतर कूलिंग ऑफ पिरियड सुरु होईल.

सौरव गांगुली यांनी 65 वर्षापूर्वीचा जुना विक्रम बरोबरी करुन बीसीसीआयचे अध्यक्ष पदाची खूर्ची मिळाली. गांगुली असे दुसरे कर्णधार आहेत, जे बीसीसीआयचे पूर्णकालिक अध्यक्ष होते. याआधी 1954 मध्ये विजयनगरमचे महाराजकुमार भारताचे असे पहिले कर्णधार होते जे बीसीसीआयचे अध्यक्ष होते, त्यांना विज्जी म्हणून ओळखले जात आहे.

विज्जी यांनी 1936 साली इंग्लंड दौऱ्यात तीन सामन्याच्या कसोटीत भारतीय संघ जिंकला होता. 2014 साली सुनील गावस्कर यांना बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष बनवण्यात आले परंतू के पूर्णकालिक प्रशासक राहिले नाही.

बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये नऊ सदस्य असतात. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड यांनी ४७१ मते मिळवून कीर्ती आझाद यांचा पराभव केल्यामुळे त्यांची क्रिकेट असोसिएशनचे पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे तर महीला क्रिकेटच्या माजी कप्तान शांता रंगास्वामी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली. माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्ना कौन्सिलमध्ये आयपीएल जीसी प्रतिनिधी असतील.

दरम्यान आयसीसी मध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी कोण असेल यावर अद्याप निर्णय झालेला नही. पुढच्या महिन्यात हा निर्णय घेतला जाणार आहे असे समजते. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची त्याची इनिंग दहा महिन्यांची असेल. पण त्याचे नाव गांगुली आहे त्याला ठसा उमटवण्यास तेवढा कालावधीही पुरेसा ठरेल. मॅचफिक्सिंगनंतर भारतीय संघाची विस्कटलेली घडी गांगुलीने नेतृत्व स्वीकारून बसवली होती.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *