Loading...
Loading...

रोहित शर्माचा नाद खुळा! पत्रकाराने मराठीत विचारलेल्या प्रश्नाचं दिलं मराठीत उत्तर! बघा व्हिडीओ..

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या २०१९ विश्वचषकात रविवारी(9 जून) भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना द ओव्हल मैदानावर होणार आहे.या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. रोज बॉल स्टेडीयमवर हा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली होती.

Loading...

या सामन्याचा हिरो रोहित शर्मा ठरला होता. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने या सामन्यात १४४ चेंडूत नाबाद १२२ धावांची विजयी खेळी केली होती. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील २३ वे शतक होते. या शतकासह रोहित भारताकडून सर्वाधिक शतकं करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला.

Loading...

उद्या भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात पण भारताला रोहित आणि शिखर धवनकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. उद्याच्या सामन्यापूर्वी आज रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला.

या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला पत्रकार सुनंदन लेले यांनी मराठीत प्रश्न विचारला. रोहित शर्मा हा महाराष्ट्रातीलच असल्याने त्याने देखील या प्रश्नाचं मराठीतच उत्तर दिलं. बघा तुम्हीच रोहितचे मराठीतील उत्तर..

Loading...

बघा व्हिडीओ-

Loading...

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *