जेव्हा काम करणारी मुलगी राष्ट्रपतींची लेक आहे हे लोकांना कळते तेव्हा…

‘जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दुसरो के कंधो पर तो जनाजे उठते है.’ हे शब्द त्या लोकांसाठी अगदी योग्य लागू होतात जे स्वकर्तुत्वाने काही तरी करायचं ठरवतात. नेहमीच आपण बघतो की आई-वडिलांचे नाव प्रसिद्ध असेल तर त्यांच्या मुलांना सर्व काही आयतेच मिळते. मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागत. परंतु ही गोष्ट सर्वांवर लागू नाही होत.

काही युवक-युवती आज पण असे बघायला मिळतात जे सुप्रसिद्ध परिवारातील असूनसुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमवण्यासाठी प्रयत्न करतात किंवा कमावतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी कोणाच्या नावाची गरज पडत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी. ती एअर इंडिया मध्ये नोकरी करते.

राष्ट्रपतींची मुलगी असल्याचे एअर इंडियाला नव्हते माहिती-

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मूलगो स्वाती ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएस सारख्या लांब पल्ल्याच्या देशामध्ये जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग 777 आणि 787 या विमानामध्ये एअर हॉस्टेस आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एअर इंडियाच्या एकही कर्मचाऱ्यांना स्वाती राष्ट्रपतींची मुलगी असल्याची माहिती नव्हती. परंतु त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

स्वाती कामावर नाही पडू देत आपल्या नावाचा प्रभाव-

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्वाती त्यांच्या सर्वात चांगल्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. एवढ्या मोठ्या राजकिय परिवारातून असूनही त्या याचा प्रभाव आपल्या कामावर पडू देत नाहीत. एअर इंडियाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी स्वाती यांनी विशेष रजेसाठी अर्ज केला होता, तेव्हा पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्या आपल्या वडिलांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सुट्टी घेत आहेत.

आडनाव सुद्धा नाही वापरत स्वाती-

स्वाती आपल्या नावांमध्ये कोविंद हे आडनाव सुद्धा वापरत नाहीत. त्यांच्या अधिकृत कागदपत्रांवर सुद्धा त्यांच्या आईचे नाव सविता आणि वडिलांचे नाव आर एन कोविंद लिहिलेले आहे. स्वाती यांच्या नम्र स्वभावामुळे त्यांच्या टीम मधील इतर लोकांना सुद्धा माहिती नव्हते की त्या रामनाथ कोविंद यांच्या मुलगी आहेत.

चालू ठेवू इच्छितात एअर इंडिया मधील नोकरी-

या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतरही स्वाती आपली एअर इंडिया मधील एअर हॉस्टेस म्हणून नोकरी चालू ठेवू इच्छितात. स्वाती आपल्या परिवारासोबत राष्ट्रपती भवनात राहणार आहे. आता त्यांच्याबद्दल सर्वाना कळल्यानंतर सुरक्षेसाठी एअर इंडियाची नोकरी सोडणार का? असे स्वाती यांना विचारल्यानंतर त्यांनी ‘बघू पुढे काय होते’ असे उत्तर दिले.

स्वाती यांचे म्हणणे आहे की त्यांचा पूर्ण परिवार जमिनीशी जुळलेला आहे आणि परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या वाडीलांसारखे स्वकर्तुत्वाने पुढे जाऊ इच्छितात. स्वातींच्या म्हणण्यानुसार त्यांचे वडील सर्व मुलांना चांगले शिक्षण घेण्यासाठी सल्ला देतात. याचाच परिणाम म्हणजे परिवारातील सर्व सदस्य स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाऊन आपली ओळख निर्माण करू इच्छितात. त्यांनी सांगितले की त्यांचे वडील स्वतः मेहनत करून सर्वोच स्थानी पोहचले आहेत आणि त्यांना वडिलांचा अभिमान आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *