Mg id top
Loading...

विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही माहिती आहे का?

आपण कधी विमान प्रवास केला आहे का ? विमानामध्ये पायलट, को-पायलट असतात हे आपल्याला माहीत आहे. विमानातील हवाई सुंदरींबद्दलचे अनेक किस्से, कथा मित्रांकडून तुम्ही ऐकल्या असतील.

पण एवढेच नाही तर या विमानाच्या बाबतीत अनेक इंटरेस्टिंग फॅक्टस आहेत, जे आजपर्यंत तुम्ही कधी वाचले नसतील. जसे की विमानातील पायलट आणि को-पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही. आज आम्ही तुम्हाला त्या सांगणार आहोत.

विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही ?

खरे तर दोन्ही पायलटला एकसारखे जेवण न देण्यामागे एक विशेष असे कारण असते. समजा त्या दोघांना एकसारखे जेवण दिले आणि त्या जेवणामध्ये चुकत काही गडबड असेल तर ते जेवण खाल्ल्यास एकाचवेळी दोन्ही पायलटची तब्येत बिघडू शकते.

दोघांनाही उपचाराची गरज निर्माण होईल. अशा स्थितीमध्ये विमान चालवायचे कुणी ? विमानातील प्रवाशांच्या जीवासाठी हा धोका आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही पायलटला वेगवगेळे जेवण दिले जाते.

विमानातील इतर गमतीशीर फॅक्टस

१) बीबीसीच्या एका रिपोर्ट अनुसार विमानातुन प्रवास करत असताना लोक अधिक प्रमाणात गॅस सोडत असतात. त्यामुळे विमानात दुर्गंधी पसरू शकते. हे होऊ नये म्हणून विमानात कोळशाचे फिल्टर वापरले जातात.

२) विमानातुन प्रवास करत असताना आपल्या जेवणाचा स्वाद बदलत असतो. या मागचे कारण म्हणजे विमानातल्या जेवणामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, परंतु विमानात दबाव अधिक असल्यामुळे जेवताना आपल्याला ते कसलेच जाणवत नाही.

३) विमानातील प्रवासादरम्यान प्रवाशांना आपत्कालीन उपाय म्हणून ऑक्सिजनचे मास्क दिलेले असतात. परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्या मास्कचा वापर करून प्रवाशांना केवळ १५ मिनिटंच ऑक्सिजन घेता येतो.

४) १९५३ पूर्वी विमानाच्या खिडक्यांचा आकार चौकोनी होता. परंतु एका अपघातानंतर त्यांचा आकार गोलाकृती किंवा अंडाकृती करण्यात आला. गोलाकार किंवा अंडाकार खिडक्यांच्या कोपऱ्यांमुळे हवेला जास्त विरोध होत नाही आणि त्यामुळे विमानावर हवेचा दाबही कमी पडतो.

विमानाच्या पासची मजेशीर कथा

असे सांगितले जाते की, १९८७ मध्ये अमेरिकेच्या एका व्यक्तीने एका विमान वाहतूक सेवेचा आजन्म पास काढला होता. तेवढ्यासाठी त्याने ६९ लाख रुपये एअरलाईन्सला दिले होते. त्या पासच्या आधारे त्या व्यक्तीने २००८ पर्यंत १०००० हुन अधिक प्रसंगी विमानप्रवासाचा लाभ घेतला.

परंतु त्याच्या या ६९ लाख रुपयांच्या पासच्या बदल्यातील १०००० वेळच्या प्रवासामुळे विमान वाहतूक कंपनीला जवळपास ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे लक्षात आले. नंतर कंपनीकडून त्या व्यक्तीचा पासच रद्द करण्यात आला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *