पत्नी किंवा प्रेयसीसाठी आकाशातून चंद्र तारे आणणारे अनेक आहे परंतु सकाळी उठून दुधाची बाटली आणायला मागेपुढे बघतात. परंतु अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी असे काही केले कि सोशल मिडीयावर त्याची वाहवाह सुरु आहे.
अमेरिकेतील केंटकि येथील केल्सी ब्रीवर Kelsey Brewer या आई होणार आहेत. आणि आपल्या इकडे ज्या प्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतात तसेच अमेरिकेत देखील मैटरनिटी फोटोशूट करण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये महिला ७व्या किंवा ८ व्या महिन्यात फोटोशूट करतात.
परंतु तिच्या सोबत वेगळे घडले आणि तिची आरोग्य परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट घेण्यास सांगितले. त्यामुळे तिची मैटरनिटी फोटोशूट करायची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे ती नाराज झाली. आपल्या बायकोला नाराज बघून तिचा नवरा जेरेड यांनी ठरवले कि तिला असे नाराज ठेवायचे नाही आणि निर्णय घेतला फोतोशुट करायचा.
परंतु हा फोटोशूट बिना केल्सी शिवाय होता संपूर्ण मैटरनिटी फोटोशूट हा जेरेडनि स्वतः केला आहे. आणि या फोटोशूटचे फोटो ककेल्सीनि आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. या पोस्टला तब्बल ६० हजार लाईक आणि ४५ हजार लोकांनी हा फोटो अल्बम शेअर केला आहे.
हे फोटो Kiana Smither या फोटोग्राफरनि शूट केलेले आहेत. विशेष म्हणजे हि फोटो काढणारी व्यक्ती म्हणजे केल्सीची बहिण कियान आहे. ती सांगते कि या फोटोशूट विषयी केल्सीला कल्पना नव्हती आणि जेव्हा तिला हे फोटो दाखविले तर आनंदाच्या भरात रडायला लागली.
केल्सी आणि जेरेडला आता बाळ देखील झाले आहे. जेरेड या गोष्टीतून आपल्या पत्नीला खुश कसे ठेवावे हे सांगून गेला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.