Mg id top
Loading...

जाणुन घ्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना कोणकोणते अधिकार मिळतात ?

भारतात जितके पेट्रोल पंप आहेत, त्यातले ९५% हुन अधिक पेट्रोल पंप सरकारी ऑइल कंपन्यांपैकी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियमशी संबंधित आहेत. पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल किंवा डिझेल भरायला तर जात असाल, पण आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांची पेट्रोल पंपावर कधी ना कधी फसवणूक झाली असेल. आपल्यापैकी खूपच कमी जणांना पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांची माहिती असेल. आज आपण पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांबद्दल जाणुन घेणार आहोत…

पेट्रोल पंपावर ग्राहकांना कोणकोणते अधिकार मिळतात ?

Loading...

१) गुणवत्ता तपासणीचा अधिकार : पंपावर जाऊन इंधन भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपल्या वाहनात भरल्या जाणाऱ्या डिझेल व पेट्रोलची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार आहे. आपण पैसे देऊन विकत घेत असलेल्या वस्तू किंवा सेवा योग्य आहेत का नाही ते जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.

२) भेसळ तपासण्याचा अधिकार : पेट्रोलमध्ये भेसळ आहे का नाही हे तपासण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. त्यासाठी पेट्रोल भरणाऱ्या यंत्राचे नोजल साफ करुन फिल्टर पेपरवर पेट्रोलचा एक थेंब टाकावा. दोन मिनटात त्या थेंबाचे बाष्पीभवन झाले किंवा थेम्ब टाकलेली जागा गुलाबी झाली तर पेट्रोलमध्ये भेसळ नाही असे मानावे.

३) मोजमाप करण्याचा अधिकार : ग्राहकाला पंपावर योग्य प्रमाणात इंधन दिले जात आहे का नाही हे तपासण्याचा आणि बिल मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी वजन आणि तपासणी विभागाने पेट्रोल पंपाला दरवर्षी प्रमाणित करुन दिलेल्या पाच लिटरच्या मापात इंधन भरुन ते योग्य प्रमाणात आहे का ते तपासता येते. यामध्ये २५ मिलीपेक्षा जास्त तफावत आढळल्यास पेट्रोल पंप मालकावर कारवाई होऊ शकते.

४) इंधनाची घनता तपासण्याचा अधिकार : ग्राहकाला आपल्या वाहनात भरल्या जाणाऱ्या इंधनाची घनता तपासणी करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पेट्रोल पंपावर असणाऱ्या ५०० मिलीच्या भांड्यात ७५% इंधन घेऊन ASTM (American society for testing of materials) या यंत्राच्या माध्यमातून तपासलेले इंधनाचे तापमान आणि घनता रजिस्टरमध्ये देण्यात आलेल्या घनतेसोबत जुळावी लागते.

५) तक्रार करण्याचा अधिकार : पेट्रोल पंप किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या तक्रारींचे निवारण केले नाही तर केंद्रीय सार्वजनिक तक्रार आणि देखरेख व्यवस्थापनाकडे जाऊन तक्रार नोंदवू शकता. या तक्रारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नोडल अधिकाऱ्याकडे पाठवल्या जातात आणि ग्राहकाच्या तक्रारींचे निवारण केले जाते.

६) ग्राहकांना मिळणाऱ्या विनामूल्य सुविधा : आपत्कालीन स्थितीत ग्राहकांना पेट्रोल पंपावरुन निशुल्क दूरध्वनी कॉल करता येतो. तसेच वाहनांच्या चाकांमध्ये निशुल्क हवा भरता येते. निशुल्क पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरता येते. मोफत प्रथमोपचार घेता येतो. तक्रार करण्यासाठी तक्रारपेटी असते. अग्निशामक उपकरणे वापरता येतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *