निता अंबानी यांचा रोजचा खर्च तुम्हाला माहिती आहे का?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी ते एक बिझनेस वूमन अशी स्वतंत्र ओळख नीता अंबानी यांनी बनवली आहे. अंबानी परिवाराविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी भारतीयांमध्ये खूप उत्सुकता असते. त्यांचे शौक, गाड्या, त्यांचे राहणीमान हे कसे असेल याविषयी अनेक जण जाणून घेऊ इच्छितात. आज आपण नीता अंबानी यांच्या दैनंदिन जीवनाविषयी माहिती बघणार आहोत. त्यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी विषयी माहिती दिली होती. चला तर खासरेवर जाणून घेऊया नीता अंबानी यांचा रोजचा खर्च आणि त्यांचे शौक…

सकाळची सुरुवात होते तीन लाखाच्या चहाने-

चहासारखी सामान्य वाटणारी गोष्ट सुद्धा नीता अंबानी यांच्या घरी 3 लाखाला पडते. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की त्यांच्या दिवसाची सुरुवात जपानच्या सर्वात जुन्या क्रोकरी ब्रँड नेरिटेकच्या कपात चहा पिऊन होते. नेरिटेक क्रोकरीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये सोन्याच्या बॉर्डर आहेत आणि याच्या 50 सेटची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. म्हणजेच एक कप चहाची किंमत 3 लाख रुपये आहे.

नीता यांना आहे ब्रँडेड घड्यांची आवड-

नीता अंबानी आपल्या घडीसाठी खूप उत्साही असतात. त्या महागड्या आणि ब्रँडेड घड्यांच्या शौकीन आहेत.त्यांच्या घड्यांच्या कलेक्शन मध्ये बुल्गारी, कार्टीअर, राडो, गुची केल्वीन आणि फोसिल सारख्या महागड्या ब्रॅंडचा समावेश आहे. या सर्व ब्रँडच्या घड्यांची किंमत दीड ते दोन लाखपासून सुरू होते.

महागड्या हँडबॅग्सची सुद्धा आहे आवड-

नीता अंबानी यांच्याकडे खूप आकर्षक हँडबॅग्सचं सुद्धा कलेक्शन आहे. त्यांची ज्वेलरी तर हिऱ्यांची असतेच सोबतच त्यांच्या हँडबॅग्स सुद्धा हिरेजडित असतात.

जगातील सर्वात महागड्या ब्रॅंडचे हँडबॅग्स जसे की चनेल, गोयार्ड आणि जिम्मी चू केरी त्यांच्या या कलेक्शन मध्ये सामील आहेत. बऱ्याचदा नीता अंबानी ज्यूडीथ लायबरच्या गैनिश क्लच सोबत दिसतात. या छोट्या साईझच्या क्लचवर हिरे जडलेले असतात. या हँडबॅग्सची किंमत 3-4 लाखांपासून सुरू होते.

रिपीट नाही होत कोणतेच चप्पल, बूट आणि कपडे-

नीता अंबानी यांनी स्टायलीश चप्पल बुटांची सुद्धा प्रचंड आवड आहे. एका इंग्लिश पेपरच्या मते नीता अंबानी यांचे कपडे आणि चप्पल-बूट कधीच रिपीट होत नाहीत. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोडा, मर्लिन ब्रॉंडचे चप्पल आणि बूट आहेत. या सर्व ब्रँडच्या चप्पल बुटांची किंमत एक लाखापासून होते.

जेवढा जास्त पैसे तेवढा जास्त खर्च असणारच. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आपले खासरे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *