मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके! 1

मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके!

● मराठा मोर्चाचे विराट दर्शन, मुख्यमंत्र्यांचे डोळे फिरले – संध्याकाळ

● सामना

मराठा तळपले, सरकार नरमले!

सबने देखा आँखो से!मराठा आया लाखो से!

‘माणुसकीच्या गर्दी’तून ‘ऍम्ब्युलन्सलाही मिळाली वाट

● लोकमत

गर्दीचा विक्रम मोडीत! स्वयंशिस्तीचे अनोखे सामूहिक दर्शन

एक मराठा, लाट मराठा

आवा $$$ ज मराठयांचा …

रणरागिणींच्या वेदनेचा हुंकार

● मोर्चाची धडक …. सरकारला धडकी – मुंबई चौफेर

● पुढारी

मराठा महासागराला सरकारचा सलाम!

यावेळी गद्दारी कराल, तर सोडणार नाही!

मुंबई मेरी जाम!

मौन आहोत, गौण समजू नका

मराठा हित की बात करेगा, वही देशपे राज करेगा

● महाराष्ट्र टाईम्स

आवाज … मराठा
नि:शब्द हुंकार!

● सकाळ

आझाद हुंकार …!
धडक मराठा
भगवे तुफान!
एकजुटीची गर्जना!

● पुण्यनगरी

एकच चर्चा, मराठा मोर्चा
तुफान उठले, सरकार झुकले

● मराठा क्रांती फत्ते – नवराष्ट्र

● तरुण भारत (बेळगाव)
मराठा तुफानापुढे सरकार नतमस्तक
जय मराठा!

● मुंबई में मराठों की ललकार
नवभारत टाइम्स

● A (Maratha) RIVER RUNS THROUGH
Mumbai Mirror

● They came, they kept mum, they conquered
mid-day

● As Maratha troop in, CM rolls out sops
The Times of India

● Marathas storm SoBo with silent march, make CM talk
hindustan times

लढाई संपलेली नाही…

ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करून घेणे.
उर्वरित मागण्यांसाठी पुन्हा लढा उभा करणे.

एक मराठा लाख मराठा

Comments

comments

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले… 0

मुंबईचे डबेवाले

आपल्याकडील चांगल्या गोष्टींची ओळख आपल्याला कधी कधी परकीयांच्या दृष्टीतुनच होते असे अनेकदा अनुभवायला मिळते. मुंबईच्या डबेवाल्यांबाबत नेमकं हेच आहे. सातासमुद्रापार जाऊन कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांबाबत आपण मात्र दृष्टिहीन झाल्यासारखे दुर्लक्ष केले. रेल्वे आणि बेस्ट सेवा यानंतरची मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी महत्वाची ही व्यवस्था आहे. मुंबई महानगरीची ती एक ओळख आहे. त्यांची दखल घेतली जावी त्यासाठी हा लेखनप्रपंच.

 

 

नोव्हेंबर २००३ मध्ये इंग्लडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्स मुंबई भेटीवर आला होता. त्याने मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल बरेच ऐकले होते. मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सने डबेवाल्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांना काही तिरकस प्रश्न विचारले. एकतर तुम्ही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहात, तरीही व्यवस्थापनाचे हे कौशल्य तुम्ही कुठे शिकलात ? डब्यांचे Coding, Time Management, Accuracy अशा गोष्टी तुम्ही कुठुन आत्मसात केल्या ? काळानुसार जसे ग्राहक बदलत जातात तसेच तुमच्यातही नवेनवे डबेवाले लोक येत राहतात, तरी सुद्धा गेली सव्वाशे वर्ष वितरण व्यवस्थेतील ही अचुकता तुम्ही कशी जोपासली आहे ? यामागची प्रेरणा नेमकी काय आहे ?

 

 

डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सला उत्तर दिले, “आम्ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन जे मावळे लढले, त्याच मावळ्यांचे आम्ही वंशज आहोत. छत्रपती शिवरायांच्या काळातील व्यवस्थापनाची शिस्त आमच्या रक्तातच आली आहे. त्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. त्याकाळी रयतेच्या संरक्षणासाठी आमचे पुर्वज लढले, आज त्याच रयतेच्या पोटात वेळेवर अन्नाचे दोन घास जावेत म्हणुन आम्ही झटत आहोत. आमचे पुर्वज गडकिल्ले, तटाबुरुजांवरती चढायचे, आम्ही मुंबईतल्या इमारतींचे मजले चढतो. घोडे गेले, सायकली-गाड्या आल्या. याच्या माध्यमातुनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होत आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती कायम आमच्या पाठीशी उभी असल्यानेच आम्ही हे करु शकतोय.”

 

 

डबेवाल्यांचे उत्तर ऐकुन प्रिन्स चार्ल्सने त्यांना सॅल्युट केला आणि त्यांच्याबद्दल “So you are Shivaji’s Maratha. You Can never be wrong. I salute you all.” अशा शब्दात गौरवोद्गार काढले. एवढेच नाही तर प्रिन्सने त्यांना स्वतःच्या लग्नासाठी विशेष पाहुणे म्हणुन इंग्लंडला निमंत्रित केले. तेथे त्यांचा जाहीर सत्कार केला. अशा डबेवाल्यांबाबत आपल्याला थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे.

 

 

डबेवाल्यांचा इतिहास :
भारतात ब्रिटिश सत्तेचा अंमल असतानाच्या काळात १८९० मध्ये ब्रिटिश तसेच पारशी कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचवुन त्यातुन आर्थिक प्रपंच उभा करावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने महादु हावजी बच्चे यांनी ही सेवा सुरु केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत ३५ डबेवाले काम करत होते. नंतर त्यांची संख्या वाढत जाऊन आज ५००० झाली आहे. पायजमा, शर्ट, गांधी टोपी आणि डब्यांसाठी चुंबळ असा त्यांचा पोशाख असतो. बहुतेकजण डबेवाले हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ते शरीराने दणकट असल्याने डोक्यावरील जाळीतुन डब्याचा भार घेऊन फिरणे, रेल्वेत चढणे-उतरणे अशी धावपळ त्यांना जमत असते. नवीन डबेवाला भरती करत असताना त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्यांच्या आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागते. दादरच्या रानडे रोड येथे ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’(डबेवाले) यांचे कार्यालय आहे. डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे यांनी “डबेवाला धर्मशाळा” काढली.

 

 

 

डबेवाल्यांची काम करण्याची पद्धत :
डबेवाले सर्वप्रथम एका भागातील डबे गोळा करतात. ते डबे ज्या ज्या भागात वितरित करायचे आहेत त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. एकाच भागात वितरित करायचे डबे एकत्रित करुन जलद लोकल रेल्वेने नियोजित जागी पाठवले जातात. डब्यांवर कलर कोडिंग स्वरुपात त्यांचा पत्ता नमुद असतो. ही एक विशिष्ट सांकेतिक ओळख असते, जी फक्त डबेवाल्यांनाच समजते. रेल्वेतुन डबे उतरुन घेतल्यानंतर स्थानिक डबेवाले त्या कोडिंग वरुन ते डबे वितरित करतात. त्यांनतर स्वतःचे भोजन उरकुन रिकामे डबे गोळा करण्याच्या कामाला लागतात आणि शेवटी ते परत घरपोच करतात. कलर कोड मुळे डब्यांची अदलाबदल होत नाही. डबे पोहोच करण्याचा कुठेही पत्ता लिहलेला नसतो. तो डोक्यात ठेवुन डबे पोहोच केले जातात. डबेवाला हा एखाद्या अभियंत्याप्रमाणे त्याचे कार्य करतो आणि डोकं संगणकाप्रमाणे माहिती साठवण्याचे काम करते. कलर कोडिंग पद्धतीने आपल्या कामात त्यांनी यांत्रिकपणा आणला आहे. त्यामुळेच ५००० डबेवाले दररोज २ लाख डबे वितरित करतात. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी करण्यास खुप अवघड गोष्ट आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता अगदी वेळेवर घरचं ताजे जेवण कोणतीही चुक न होता ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास बाळगुन प्रामाणिकपणे ते आपले काम करत असतात.

 

 

एवढी सगळी धावपळ करुन प्रतिदिन २५० ते ३००₹ वेतन घेऊन महिना साधारण ७-८ हजार वेतन मिळवतात.

डबेवाल्यांचे हे अनोखे नेटवर्क पाहुन अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कुललाही त्यांचे कौशल्य जाणुन घेण्यासाठी इथं यावे लागले. डबेवाल्यांच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. त्याच्यावर अहवाल तयार केला. आता त्या अहवालाच्या विक्रीतुन व्यवस्थापनाची कौशल्ये जगभर पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. परंतु जिथे पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपल्याला डबेवाल्यांच्या असा अहवाल करण्याची दृष्टी कधी आली नाही. दुर्दैव !

डबेवाल्यांच्या या वितरण प्रणालीचा Error Rate म्हणजेच डबा पोहोचवण्याच्या कामात चुक होण्याचे प्रमाण ६० लाख डब्यांमागे फक्त १ इतका नगण्य आहे. या अचुकतेमुळेच फॉर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस “Six Sigma Accuracy” या अत्यंत महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या वर्गात मोटोरोला, जनरल मोटर्स अशा उद्योगांच्या समवेत स्थान दिले आहे.

 

 

स्टॅनफोर्ड व जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्याकडुन तर शुन्य टक्के इंधन, शुन्य टक्के आधुनिक तंत्रज्ञान, शुन्य टक्के वादविवाद, अत्यल्प गुंतवणुक याद्वारे शंभर टक्के परिणाम आणि ग्राहकांना शंभर टक्के समाधान पुरवणारी ही संस्था आहे अशी त्यांना वाहवा मिळाली आहे.

डबेवाल्यांच्या प्रवासातील काही ठळक गोष्टी :
● छत्रपती शिवाजी महाराज हे डबेवाल्यांचे प्रेरणास्थान आहेत, तर पंढरीच्या विठोबारायावर, वारकरी संतपरंपरेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.
● डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित “मुंबईचा डबेवाला” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
● डॉ.पवन अग्रवाल यांनी मुंबईच्या डबेवाल्यांवर Ph.D. करुन त्यांच्या जीवनावर आधारित “Teena & Tiffin” या कॉमिक्सची निर्मिती केली.

 

● डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे, गंगाराम तळेकर, सुभाष तळेकर व इतरांनी ६० हुन अधिक देशात डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे दिले आहेत.
● जमाल हिराणी या भारतीयाने लंडन येथे सुरु केलेल्या “Tiffin Beats” उपहारगृहाच्या प्रमोशनसाठी डबेवाल्यांचे नेते गंगाराम तळेकर यांना निमंत्रित केले होते.
● Rohinton Mistry या इंग्रजी लेखकाने त्याच्या “Such a long journey” नावाच्या पुस्तकात डबेवाल्यांना “घामटलेली डुकरे” असे संबोधले होते. त्याला उत्तर देण्यासाठी गंगाराम तळेकरांनी इंग्रजीतच “The wonder of Dabewala unfolded” हे अप्रतिम पुस्तक लिहुन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि डबेवाले किती ग्रेट आहेत ते दाखवुन दिले.
● वेगवेगळ्या कार्यक्रमांतुन शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये आणि गरिबांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने डबेवाल्यांनी मोफत “रोटी बँक” सुरु केली आहे.

 

 

डबेवाल्यांच्या कार्याबद्दल सांगण्यासारखे बरेच आहे. अभ्यासाच्या आणि शब्दांच्या मर्यादांमुळे जितके शक्य तितके लिहण्याचा प्रयत्न केला आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला घड्याळाच्या वेळेइतकेच तंतोतंत वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य, अचुकता, वेळेचे गणित आजही कित्येकांच्या कौतुकाचा विषय आहे. तरी सुद्धा आपल्याला आपल्या मुलाबाळांना मिलियन डॉलर सक्सेस स्टोऱ्या सांगत बसतो, मात्र आठवी पास डबेवाल्यांच्या कथा सांगणे आपल्याला कधी महत्वाचे वाटत नाही. हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे. शालेय अभ्यासक्रमात डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य समाविष्ट व्हावे.

– अनिल माने.

 

Comments

comments

मंदिराबाहेरील देवाची कहाणी… 2

साधारण तीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. मुंबईमध्ये परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर एक गृहस्थ दररोज समोर उभ्या असलेल्या गर्दीकडे पाहत रहायचे. एकदा एका मायलेकीने त्यांना टाटा हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी अज्ञानातुन पालिकेच्या शीव येथील सरकारी रुग्णालयाचा पत्ता दिला, मात्र नंतर आपली चुक नंतर त्यांच्या लक्षात आली. परळमध्ये राहुन आपल्याला टाटा हॉस्पिटलबद्दल माहिती नाही, मग बाहेरगावाहुन येणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील याचा त्यांनी विचार केला. मृत्युच्या दारात उभं असणाऱ्या रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील तणाव, अपरिचित ठिकाणी त्यांची होणारी धावपळ, कुठे शोधायचे, कोणाला भेटायचे, कुठे भेटायचे, राहायचे कुठे, खायचे काय असे असंख्य प्रश्न चेहऱ्यावर घेऊन वावरणारी ती लोकं पाहिलं की हे गृहस्थ मनातुन खुप अस्वस्थ व्हायचे. आपल्या आजोबांनी सांगितलं होतं “आपण समाजाचं देणं लागतो”, म्हणुन आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा त्यांनी विचार केला आणि तिथुन सुरु झाला त्यांच्या वेगळ्या कामाचा प्रवास. त्या गृहस्थाचे नाव म्हणजे हरखचंद सावला.

लहानपणी शाळेत असताना मित्राला शाळेची फी भरता येत नव्हती म्हणुन स्वतः पायी प्रवास करुन वाचलेल्या पैशातुन मित्राला मदत करणाऱ्या सावलांनी मोठे पाऊल उचलले होते. पण प्रमुख अडचण होती पैशांची. मात्र त्यावरही त्यांनी मार्ग काढला. त्यांनी घरातील जुन्या कपड्यांपासुन गोधड्या बनवुन रुग्णांना वाटल्या. रद्दी विकुन पावसाळ्यात छत्र्या वाटपाचे उपक्रम राबवले. परंतु तरीही पैशांची चणचण जाणवु लागली.

आणि मग एक दिवस त्यांनी आपलं चांगल्या स्थितीत सुरु असणारे हॉटेल भाड्याने दिलं आणि त्यातुन उभे राहिलेल्या पैशांतुन टाटा हॉस्पिटल समोरच्या असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपली अन्नदान सेवा सुरु केली. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत द्यायचा त्यांचा हा उपक्रम लोकांनाही आवडला.

सुरुवातीला डाळभाजी, भात, चपाती असं भोजन सुरु केले. पन्नास लोकांना भोजन द्यायला सुरुवात केली. हळुहळु ही संख्या वाढु लागली. असंख्य हात त्यांच्या मदतीला येऊ लागले. बघता बघता वर्ष उलटत गेली. कधी थंडी, कधी उन तर कधी मुंबईचा मुसळधार पाऊसही त्यांच्या कामात खंड पाडु शकला नाही. १२ वर्ष ही सेवा दिल्यानंतर त्यांनी आपले कार्य अजुन व्यापक करण्याचा निर्णय घेतला. आज केवळ टाटा हॉस्पिटलच नाही, तर जेजे, कामा, सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमधील ७०० लोकांना दोन वेळचे मोफत जेवण दिलं जात आहे. गेली तीस वर्ष ही सेवा अखंड सुरु आहे.

हरखचंद सावला एवढ करुनच थांबले नाहीत. त्यांनी “जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट” स्थापन केला. त्या माध्यमातुन त्यांनी गरजु रुग्णांना मोफत औषध पुरवणे सुरु केले. त्यासाठी त्यांनी “औषध बँक” स्थापन केली. या बँकेत तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन् सोशल वर्करची टीमच त्यांनी कामाला लावली. लोकांच्या घरातील शिल्लक राहिलेली औषधे तपासुन त्यांचा वापर गरीब रुग्णांसाठी केला जाऊ लागला. त्यांनी सिक बेड सर्व्हिस, कॅन्सरग्रस्त बाल रुग्णांसाठी खेळण्यांची टॉयबँक, सहली, कृत्रिम अवयव पुरवणे, मनोरुग्णांवर उपचार, त्यांची घरवापसी, रस्त्यावरील भिकाऱ्यांवर उपचार, त्यांची स्वच्छता, दुखापतग्रस्त जनावरांवर उपचार असे अनेक उपक्रम सुरु केले. २६ जुलैच्या मुंबई महापुरामुळे जखमी झालेल्या तीन हजार कबुतरांवर त्यांनी उपचार केले. “जीवन ज्योत” ट्रस्टच्या माध्यमातुन ६० हुन अधिक उपक्रम राबवले जात आहेत.

तुम्ही आजही परळला गेलात तर तिथे तुम्हाला अत्यंत साधा पांढरा पायजमा कुर्ता घातलेला परंतु चेहऱ्यावर समाधान असणारा हा अवलिया रुग्णांच्या ताटात अन्न वाढताना, रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करताना, त्यांना मानसिक आधार देताना, औषध पुरवताना इतकंच काय एखादा रुग्ण ज्याला कुणीच नसतं तो दगावला तर त्याचे अंत्यसंस्कार करताना दिसेल. ६० वर्षीय हरखचंद सावला आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. कुठलाही गाजावाजा नाही, अवडंबर नाही की प्रसिद्धीचा मोह नाही. विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम केल्यानंतर त्यांचा फोटो सापडला. त्यांनी आतापर्यंत १०० हुन अधिक वेळा रक्तदान केले आहे. ३० वर्षात दहा ते बारा लाख रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी दोन वेळचे मोफत जेवण दिले आहे. संध्याकाळी झोपताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ते सर्वांनाच मिळत नाही. सावलांच्या अफाट जिद्दीला, कार्याला शतशः प्रणाम !

इतकी वर्षे क्रिकेट खेळुन अनेक विक्रम, अनेक शतके, अनेक धावा केल्या म्हणुन सचिन तेंडुलकरला “देवत्व” बहाल करणारे करोडो लोक आपल्या देशात पहायला मिळतील. पण ३० वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाईकाना दोन वेळचे भोजन मोफत देणाऱ्या हरखचंद सावलांना कोणी ओळखतही नाही. त्यांना देव मानणे तर दुरची गोष्ट. ही आहे आपल्या देशातील माध्यमांची कृपा आणि लोकांची मानसिकता.

कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात, तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात आणि नाही जमलंच तर जवळपासच्या मंदिरात जाऊन देव शोधणाऱ्या करोडो आंधळ्या भक्तांना हा मंदिराबाहेरचा देव कधीच सापडणार नाही. तो आपल्या आजुबाजुलाच आहे पण आपल्याला मात्र त्याची खबर नाही अशी अवस्था आहे. सगळे वेड्यासारखे कुठल्यातरी बापु, महाराज, बाबाच्या मागे पळत असतात. लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे सगळे बापु, महाराज, बाबा कोट्याधीश होतात, मात्र भोळ्या भक्तांच्या व्यथा, वेदना आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.

मंदिरात देव शोधणाऱ्या भक्तांना देव सापडला का नाही ते माहीत नाही, परंतु गेल्या ३० वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाईकांना हरखचंद सावलांच्या रुपात मंदिराबाहेरचा देव सापडला आहे.

लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय लेख शेअर करू नये…

Comments

comments

भारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या… 0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाला राखी हा शब्द माहित असेल का ? हे नक्की सांगता येणार नाही. परंतु मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भारतातील गावाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एका सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे व आता त्याच गावातून हिंदू मुस्लीम महिला,मुली डोनाल्ड ट्रम्प यांना १००१ राख्या पाठविणार आहेत. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे या करिता हे पाउल उचललेले आहेत.

www.thodkyaat.com

मेवात भागातील मरोरा या गावातील हि घटना. भारत आणि अमेरिका संबंध अधिक चागले व्हावे याकरिता आम्ही हे पाउल उचलले असे सेवाभावी संस्थे कडून सांगण्यात आले.

सुलभ अंतरराष्ट्रीय सामजिक सेवा संस्था (SISSO) यांचे प्रमुख बिंदेश्वर पाठक यांनी या गावाचे नामकरण Trump Village (ट्रम्पवाडी) केले तेव्हापासून हे गाव अधिक चर्चेत आले.

(Photo credit MONEY SHARMA/AFP/Getty Images) www.thodkyaat.com

दिल्ली पासून १०० किलोमीटर अंतरावर मारोरा हे गाव आहे. गावाचे नामकरण झाल्यानंतर प्रशासनास गडबडून जाग आली व जिल्हा प्रशासनाने हे अनअधिकृत ठरवून गावातील काही बोर्ड काढण्यात आले.

मरोरा गाव गुरगाव पासून ६०किमी अंतरावर पूर्णा तहसील मध्ये आहे. जवळपास १८०० लोकसंख्येचे गाव..

स्त्री सबलीकरणाकरिता आम्ही अनेक कार्यक्रम या गावात राबवत आहोत, या संस्थेच्या उपाध्यक्ष मोनिका जैन यांनी सांगितले.

नरेंद्र मोदि व डोनाल्ड ट्रम्पला गावातील सर्व स्त्रिया मोठा भाऊ मानतात म्हणूनच १००१ राख्या डोनाल्डला व ५०१ राख्या मोदीना त्यांनी पाठविल्या.
७ ऑगस्टला ह्या राख्या अमेरिकेला व्हाईट हाउस मध्ये पोहचतील त्यासोबत मोदी व ट्रम्प या दोघांना गावात येण्याचे आमंत्रण हि देण्यात आलेले आहे.

चला आता बघूया या दोन भावाकडून त्यांच्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त काय भेट मिळेल…

मल्हार टाकळे

Comments

comments

%d bloggers like this: