Mg id top
Loading...

गाडीला पोलिसांचा पहारा न मिळाल्याने नरेंद्र मोदींच्या भावाने केले धरणे आंदोलन

राजकारणातील महत्वाच्या लोकांना शासनाकडून काही शासकीय सवलती किंवा सेवा पुरवण्यात येतात. त्यामध्ये पोलीस संरक्षण ही एक सेवा पुरवली जाते. परंतु कधीकधी नेत्यांचे कुटुंबीयच अशा शासकीय सवलतींचा गैरफायदा घेताना दिसतात. असाच एक प्रकार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बाबतीत समोर आला आहे. प्रधानमंत्र्यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी त्यांच्या गाडीला पोलिसांचा पहारा न मिळाल्याने चिडून राष्ट्रीय महामार्गावरच पोलिसांच्या पहाऱ्याच्या गाडीसमोर धरणे आंदोलन केले. पाहूया काय आहे प्रकरण…

प्रधानमंत्र्यांच्या भावाचे ४ तास धरणे आंदोलन

Loading...

झालं असं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे रस्तेमार्गाने अहमदाबाद वरून हरिद्वार येथे निघाले होते. रस्त्यात अजमेर वरून जयपूरला जात असताना त्यांच्या गाडीला मागे आणि पुढे पोलीस पहारा दिला गेला नाही. यामुळे चिडलेले प्रल्हाद मोदी बगरु पोलीस स्टेशनसमोर आले आणि राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांच्या पत्र्याच्या गाडीसमोर बसून त्यांनी ४ तास धरणे आंदोलन केले.

उच्चभ्रू राजकीय विषय असल्याने अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर त्यांना पहारा पुरवण्याची सोया करण्यात आल्यांनतर ४ तासानंतर प्रल्हाद मोदी तिथून निघून गेले.

प्रल्हाद मोदींना पहारा देण्यासाठी गृहमंत्रालयाच्या सूचना नव्हत्या

डेप्युटी चीफ ऑफ प्रोटोकॉल राजेंद्र सिंह शेखावत यांनी याबाबदल बोलताना सांगितले की प्रल्हाद मोदी यांच्या प्रोटोकॉल बाबतीत गृहमंत्रालयाकडून आम्हाला कसल्याही सूचना आल्या नव्हत्या. जेव्हा गृहमंत्रालय सांगते तेव्हाच आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोटोकॉल पुरवतो. प्रल्हाद मोदींनी याबाबदल संगितले की इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा माझ्या मार्गाविषयी सूचना घेत होती, तर मग पोलिसांनी पहारा नाकारण्याचे कारण काय ?

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *