आता राहुल गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपट ‘माय नेम इज रागा’चा टीजर लाँच

काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भूमिकेवर आधारित ‘माय नेम इज रागा’ हा चित्रपट निवडणुकांच्या तोंडावर प्रदर्शित होऊ शकतो. पापा, क्या आप भी मार दिये जाओगे…., काँग्रेस अभी जिंदा है… मै अगर इस देश के लिए फेल भी हो जाऊ तो मेरे लिए बडे गर्व की बात है… यांसारखे डायलॉग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

नुकतेच, ठाकरे, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर विवेक ओबेरायची भूमिका असलेला नरेद्र मोदींवरील चरित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यातच, निवडणुकांच्या गरमा-गरमीच्या हंगामात प्रेक्षकांना राहुल गांधीही चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत.

जिस राहुल का लोगों ने मजाक बनाया, वही राहुल आज उन्ही लोगों का रागा है…. असं म्हणणारी ती सुंदर युवती कोन असाही प्रश्न हा टीझर पाहिल्यानंतर उपस्थित होतो. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा डोळा मारतात. काँग्रेस, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, मोदी यांसह अनेक राजकीय आणि कौटुंबिक पैलू या 4 मिनिटांच्या टीझरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत.

या चित्रपटात अश्विनी कुमार यांनी गांधींची भूमिका केली आहे. तर हिंमत कपाडिया यांनी नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. तर राजू खेर यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भूमिका केली आहे.

Loading...

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *