शिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर? बघा यामागील कारण खासरेवर

कधीही हायवेने प्रवास केल्यावर कुठल्याही हॉटेलवर थांबल्यावर एक चित्र नक्की दिसेल. पंजाबी शीख ड्रायवर पगडीवाले हे नक्कीच दिसणार. भारतात जास्तीत जास्त ट्रक ड्रायवर हे पंजाबी आहे. पण असे का कधी या मागच्या कारणाचा विचार केला आहे का? नाहीना परंतु या मागील खरे कारण काय आहे हे आपण आता खासरेवर बघूया..

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीश साम्राज्याने भारताची फाळणी केली. परंतु भारतातील पश्चिम भागात राहणारे नागरिक हे पाकिस्तानचा भाग झाले होते. त्यामध्ये बहुतांश शीख समाज होता. रातोरात या भागात राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घरदार, जमीन जुमला सर्व सोडून जावे लागले. ते भारतात स्थलांतरीत झाले. भारतातील लढवय्या आणि स्वाभिमानी समाज रातोरात रस्त्यावर आला होता डोक्यावर छप्पर नव्हते किंवा खिशात एक रुपया सुध्दा नव्हता. त्या नंतर झालेल्या दंगलीत अनेक कुटुंबाची एकमेकापासून ताटातूट झाली जवळचे दूर गेले.

शून्यातून त्यांना भारतात सुरवात करावी लागली. काही लोकांना सरकार तर्फे जमिनी देण्यात आल्या परंतु बहुतांश शीख समुदाय हा बेघर आणि भूमिहीन राहिला. त्या वेळेस शीख समाजातील उपजत स्वाभिमानी वृत्ती जागृत झाली. त्यामुळे हा समाज संपूर्ण भारतात विखुरल्या गेला भिक मागण्यापेक्षा काम कधीहि चांगले राहील हे त्यांना माहिती होते.

त्यामुळे बहुतांश लोक हे रोड ट्रान्सपोर्ट, taxi, भारतीय सैन्य आणि रस्त्यावर चालणारे हॉटेल या क्षेत्रात उतरले. पंजाबी खाद्य अतिशय प्रसिध्द आहे याचे मुख्य कारण कि त्या काळात भारतात वेगवेगळ्या भागात स्थलांतरीत झालेले लोक हे धाबे चालवू लागले. भारतात असा कुठलाही हायवे नाही जिथे पंजाबी धाबा तुम्हाला दिसणार नाही. आता संपूर्ण जगात शीख लोक त्यांचा व्यवसाय घेऊन चालले आहे.

Loading...

तुम्ही भारतातील कुठल्याही कोपऱ्यात जा आणि विचार सरदारजी का धाबा कुठे आहे ? तुम्हाला काही अंतरावरच तो मिळणार हे नक्की आहे. शीख लोकांना आता त्यांचे अन्न संपूर्ण भारतात मिळते त्यामुळे कालांतराने जगण्याकरिता वाहन चालकाची जवाबदारी स्वीकारलेल्या लोकांच्या पिढ्यांनी हा धंदा सुरु ठेवला. कारण मनुष्य सर्व पोटासाठी करतो आणि त्याला घरच्या सारखे अन्न भारतात कुठेही उपलब्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिकतर पंजाबी लोक असतात.

या सोबत आणखी एक कारण आहे लोक शीख लोकावर जास्त भरोसा करतात. त्यांच्या मते शीख हे इमानदार जात आहे त्यामुळे सुध्दा शीख लोकांना या व्यवसायात जास्त संधी आहे. त्या काळात भारताबाहेर जे लोक गेले त्यांनी सुध्दा taxi चालक आणि ट्रकचा व्यवसाय निवडला या मागचे सर्वात महत्वाचे कारण हे आहे कि, ड्रायवर होण्याकरिता प्रदेशात कुठलीही पदवी लागत नाही.

आणि परदेशात वाहन चालकास चांगला पैसा मिळतो व रोजच्या रोज नगद हातात पैसे त्यामुळे घरदार चालविणे सोपे झाले. या सर्व गोष्टीमुळे भारतात आणि भारताबाहेर सर्वाधिक शीख लोक तुम्हाला ट्रक अथवा वाहनचालक म्हणून भेटतील… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *