Mg id top
Loading...

सापडली होती कचराकुंडीत, आता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

आजहि महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रेक्षकामध्ये एक मिथुनचा चाहता वर्ग वेगळा आहे. मिथुन जसा चित्रपटात हिरोची भूमिका निभावतो तसेच खर्या आयुष्यात देखील तो हिरो आहे हे त्याने सिद्ध केले आहे. खेड्यात जो पर्यत मिथुनचा चित्रपट लागत नाही तो पर्यंत लोक झोपत नाही हि खरी गोष्ट आहे.
वाचा खासरे वर मिथुनने असे काय केले ?

Loading...

मिथुन व योगिता बाली ह्यांना तीन मुले आहेत मिमोह,उश्मेय व नमाशी परंतु या व्यतिरिक्त एक मुलगी सुध्दा त्यांना आहे ती दत्तक घेण्यात आली आहे. आणि त्या मागचे कारण सुध्दा असेच आहे ती मिथुनला मिळाली होती रस्त्यावर कचरा पेटीमध्ये…

हो कचरा पेटी मध्ये मिथुनने तिला तिथून उचलून घरी नेले तिला मोठे केले व आज तुम्ही तिला बघाल तर तोंडात बोटे गेल्याशिवाय राहणार नाही. तिच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण सोशल मिडियावर सुरु आहे. दिशांनी चक्रवर्ती आज ट्रेंडीग विषय आहे.

सध्या दिशानि न्यूयॉर्कला Acting Course करत आहे. हा कोर्स झाल्यानंतर ती पूर्णतः तयार आहे bollywood मध्ये तिचे पदार्पण करायला. तेव्हा आता ती नेमकी कोणत्या चित्रपटातून या कलाविश्वात पदार्पण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मिथुन सोबत अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यानी हे मनाचे औदार्य दाखविले आहे. नुकतेच सनी लीयोनी व तिच्या पतीने लातूर येथून एका अनाथ मुलीला दत्तक घेतले व तिचे नाव निशा कौर वेबर ठेवले आहे.

रविना टंडने १९९५ साली दोन मुली पूजा आणि छाया दत्तक घेतल्या होत्या. सुश्मिता सेन हिने वयाच्या २५व्या वर्षी पहिली मुलगी दत्तक घेतली होती आता तिला दोन दत्तक मुली आहे. सुभाष घाईने सुध्दा मेघना नावाची मुलगी दत्तक घेतली आहे.

सलीम  खान व मिथुनची मुलगी यांची कथा परंतु या सर्वा पेक्षा वेगळी आहे. अर्पिता खान सलमानची बहिण मागील वर्षी तिचे धूमधडाक्यात लग्न झाले तीही सलीम खानने रस्त्यावरून उचलून आणून दत्तक घेतले होते.

दिशांनी चक्रवर्ती लवकरच रुपेरी पडद्यावर दिसेल परंतु सध्या ती बर्याच युवकांच्या हृदयाचे ठोके चुकवत आहे हे नक्की…

मिथुन दाच्या या कामाला खासरे तर्फे सलाम….

Comments

comments

Loading...

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *