Loading...
Loading...

७५ वर्षांनी भेटले हे ९७ वर्षाचा प्रेमी आणि ९२ वर्षाची प्रेमिका, भावूक करणार दोघाची प्रेम कथा

हेडिंग वाचल्यावर विश्वास नाही बसणार ना ? तब्बल ७५ वर्ष एकमेकावर प्रेम करत एकमेका पासून दूर राहणे. शरीरातील आत्माच बाहेर गेला असे अनेकांना वाटेल आणि आता अचानक ७५ वर्षांनी तो आत्मा परत आला आहे. फ्रांस मध्ये देखील असेच काही झाले तब्बल ७५ वर्षांनी एकमेकापासून दूर गेलेले प्रेमी युगल एकमेकाला भेटले आहे. चित्रपटाला शोभणारी हि एक कथा आहे.

Loading...

हि प्रेम कथा आहे १९४४ मधील जेव्हा द्वितीय विश्वयुद्ध झाले तेव्हाची हि गोष्ट, २४ वर्षाचा केटी रॉबिन्स हा १८ वर्षाच्या जेनिन पियरसन ला भेटला होता. पहिल्या भेटीतच दोघांचे एकमेकावर प्रेम झाले आणि एकमेका सोबत जीव जुळला. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणचे राहणारे होते. रॉबिन हा अमेरिकेत राहायचा तर जेनीन हि फ्रांस मध्ये राहत होती.

Loading...

रॉबिन सैन्यात असल्याने त्याला काही दिवसाने युधाकरिता पूर्वेकडील मोर्चावर पाठवण्यात आले. त्यानंतर आली युध्द समाप्ती आणि सगळे लोक आपापल्या घरी परतले ज्यामध्ये रॉबिन देखील होता. मिरर वृत्तपत्रानुसार ते सांगतात कि जेनीन ला हा धक्का सहन नाही झाला आणि ती अनेक दिवस दुखात राहली. रॉबिन पूर्वे कडून परत येणारा या आशेने तिने थोडी इंग्रजी देखील शिकली होती.

परंतु रॉबिन परतला नाही कारण तो अमेरिकेत परत गेला होता. रॉबिन देखील जेनीन ला कधीच विसरला नाही आजही त्याच्याकडे जेनीनचे जुने फोटो संग्रही आहे. रॉबिन सध्या ९७ वर्षाचा आहे आणि जेनीन ९२ वर्षाची दोघे ७५ वर्षांनी परत मिळाले आहेत.

Loading...

या गोष्टीमुळे झाली दोघाची भेट

Loading...

फ्रांस मध्ये डी डे लैडिंगचा ७५ वा सोहळा होता म्हणून रॉबिन फ्रांसला परत गेला आणि दोघाची हि भेट परत घडली आहे. रॉबिनने मिडीयाला सांगितले कि “मी तिला वचन दिले होते कि मी तुला परत घ्याला येईल परंतु तेव्हा मला हे शक्य झाले नाही.” जेनीन सांगते कि ” रॉबिन तिच्या मनात नेहमी होता आणि नेहमी राहील.

दोघाचेहि लग्न झालेले आहे परंतु सध्या दोघाचेही जोडीदार या जगात नाही आहे. दोघे एकमेकाला भेटल्यावर भावूक झालेत आणि परत भेटू हे आश्वासन देऊन रॉबिन अमेरिकेला परतला आहे. खरे प्रेम कोणीही विसरू शकत नाही हे या गोष्टीमुळे आपल्याला कळले असेल.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *