Mg id top
Loading...

शाळेत असताना हे देण्यामागचं कारण खूप कमी लोकांना माहिती आहे..

भारतात ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक दिवस रात्र जीवाची पर्वा न करता सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात. अनेक सैनिक आपल्या प्राणाची आहुती देखील देतात.

अशावेळी त्यांच्या कुटुंबाची अवस्था कशी होते, त्यांचे दुःख काय असते हे समजणे कठीण आहे. सैनिकांना शहीद झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन व इतर आर्थिक मदत मिळते. पण ती मदत अपुरी असते. त्यामुळे सरकारने सैनिकांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी एक विशेष प्लॅन बनवला होता.

Loading...

आपल्याला सशस्त्र सेना ध्वज दिन हा लहानपणी शाळेत असल्यापासूनच माहिती होतो. शाळेत त्या स्वरूपाचा एक छोटा झेंडा आपल्याला काही रुपये घेऊन दिला जायचा. पण तो का दिला जातो हे खूप कमी लोकांना माहिती असेल.

तर याची सुरुवात झाली १९४९ साली. त्यावेळच्या सरकारने सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशसेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी झेंड्यांच्या विक्री मधून मिळणार निधी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

७ डिसेंबर १९४९ ला याची सुरुवात करण्यात आली होती. माजी सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक सैनिकांना युद्धादरम्यान अपंगत्व देखील येतील. पण सशस्त्र सेना ध्वज दिनाला उभारला जाणारा निधी त्यांना उपयोगी ठरतो.

माजी सैनिक आणि हुतात्मा झालेल्यांच्या विधवा आणि मुलांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मंत्रालयाने सशस्त्र सेने ध्वज दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. 

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *