Mg id top
Loading...

बॉलीवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री करणार लग्न, असा हवा मुलगा..

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ चित्रपटात अजय देवगण सोबत दिसलेली सुंदर अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्याला आठवत असेल. अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही ती अधूनमधून दिसत असते. तर ती काजल अग्रवाल लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याची बातमी आहे.

एका चॅट शो मध्ये बोलताना काजलने तिच्या लग्नाच्या प्लॅन विषयी माहिती दिली आणि सांगितले की ती लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहे. परंतु काजलने तिच्या नात्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Loading...

काजलला कसा पती हवाय ?

काजलला कसा पती हवा आहे याबद्दल विचारण्यात आल्यानंतर काजलने तिच्या भावी पतीमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवीत याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. काजलने सांगितले की, “बर्‍याच गोष्टी आहेत. परंतु माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो आध्यात्मिक, काळजी घेणारा आणि माझ्याबाबतीत खूप काळजी करणारा असला पाहिजे.”

काजलने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचे नाही. असे मानले जाते की काजल सध्या एका बिझनेसमॅनला डेट करत आहे. पण याबाबतीतच्या अफवांबद्दल काजल काहीही बोलली नाही.

काजल सध्या काय करत आहे ?

काजल सध्या अभिनेता कमल हसनसोबत “इंडियन 2” चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या “इंडियन” चित्रपटाचा सिक्वेल आहे. एस.शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

शंकरने यापूर्वी रजनीकांत यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अलीकडेच कमल हसनने या चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. कमल हसन आणि काजल यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह , विवेक, प्रिया भवानी शंकर सारख्या कलाकारही दिसणार आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *