Mg id top
Loading...

जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र

विकिपीडिया च्या जागतिक वारसा छायाचित्र स्पर्धेत मिळाला बहुमान विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांचे छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

१० हजार छायाचित्रकारांचा सहभाग या स्पर्धेसाठी जगभरातून २ लाख ४५ हजार छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या १० हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आग्रा ते इटली पर्यंत अनेक वारसा स्थळांची २ लाखाहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने ४८९ छायाचित्रे पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतीमतः यातून १५ छायाचित्रे पुरस्कारासाठी निवडण्यात आली.

Loading...

खंडोबाच्या भंडारा यात्रेच्या छायाचित्रात हळदीचा सुगंध

विकिपीडियाने जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या भंडारा यात्रेचे छायाचित्र जगातील सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड केल्यानंतर या छायाचित्राचे वर्णनही अप्रतिम केले आहे. इतिहास, रंग व भक्तिभाव याचा अपूर्व संगम या छायाचित्रात पाहायला मिळतो व यातून हळदीचा ( भंडारा) सुगंध अनुभवता येतो, असे विकिपीडियाने नमूद केले आहे.

जगातील इटली, बांग्लादेश, थायलंड, इटली, जर्मनी,इराण,इजिप्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया या देशातील छायाचित्रांनी ही पहिल्या १५ पुरस्कारात स्थान पटकाविले आहे.

Comments

comments

Loading...

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *