देशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…

भारतात वीजचोरी हा खूप गंभीर प्रश्न बनलेला आहे. आकडेवारी नुसार दरवर्षी जवळपास 1 लाख 3 हजार कोटी रुपयांची वीजचोरी होते. विजेच्या बिलापासून वाचण्यासाठी गरीब लोकच नाही तर शिकलेले लोकं सुद्धा आकडे टाकून वीज चोरी करतात. बोलायचं झालं तर वीज चोरी एक सामान्य गोष्ट बनली आहे. सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे वीज विभाग वीजचोरी रोखण्यासाठी जेवढ्या संकल्पना आणतो त्यावर तोड काढत लोकं नवीन नवीन आयडिया शोधून वीजचोरी करतात.

पण या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी 39 वर्षीय एक महिला खूप जिद्दीने पेटून उठली आहे आणि यावर एक असा उपाय शोधला आहे त्याची खूप गरज होती. ती महिला सुद्धा कोणी सामान्य महिला नाहीये तर त्या आहेत 2003 बॅच च्या आयएएस ऑफिसर रितू माहेश्वरी.

2000 साली पंजाबच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या 2003 साली आयएएस म्हणून जॉईन झाल्या. विशेष म्हणजे 2011 मध्ये रितू यांची नियुक्ती कानपूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीमध्ये झाली. तिथे काम करत असताना त्यांना दिसले की शहरातील लोक मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीजचोरी करत आहेत. त्यांनी या समस्येकडे गंभीरपणे बघत त्यांनी एक नवीन संकल्पना राबवली. ज्यामध्ये त्यांनी एक तृतीयांश लोकांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसवले. या स्मार्ट मीटरद्वारे वीज वापर हा डिजिटली रेकॉर्ड केला जाऊ शकत होता. ज्यामुळे वीज वितरण प्रणालीमध्ये क्षणाक्षणाला होणार विजेचा वापराचा तपशील सहजपणे बघितला जाऊ शकत होता.

रितू माहेश्वरी माहेश्वरी म्हणतात, ‘मी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधाला झुगारून त्यांनी 5 लाखांमधील 1 लाख 60 हजार मिटर बदलले. यामुळे कानपुर शहरातील विजचोरीच्या घटना खूप कमी झाल्या जे की अगोदर 30% होत्या.’ वीज मंत्रालयाच्या वेबसाईटवर बघू शकतो की रितू यांच्या रणनितीने कानपुर इलेक्ट्रिसिटी कंपनीचा तोटा अर्ध्यावर म्हणजे 15.6% वर आला आहे.

वीजचोरी विरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्या विजचोरांच्या नजरेत आल्या. मोठमोठ्या गुंड आणि नेत्यांकडून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन धमकावले जाऊ लागले. पण रितू सर्व धमक्यांना न घाबरता एक वेगळी सिस्टीम बनवण्यात व्यस्त राहिल्या. वीजचोरी मध्ये कमी करून गावागावात शेतकऱ्यांपर्यंत वीज पोचवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे या समस्येवर डिजिटल मित्र हा एकमेव पर्याय आहे. केंद्र सरकार पाच वर्षात पावर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन इंडस्ट्री मध्ये जवळजवळ 3 लाख 30 हजार करोड रुपये गुंतनवण्याच्या विचारात आहे. अशात या आयएएस अधिकाऱ्याने केलेले काम खूप अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम…
ध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: