Mg id top
Loading...

हॉलिवूडसुद्धा करतो बॉलिवूड चित्रपटांची चोरी, हे आहेत ९ चित्रपटांचे पुरावे

बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांबाबत हॉलिवूड चित्रपटांच्या कथा चोरल्याचे आरोप झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. परंतु हॉलीवूडने देखील बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या कथा चोरल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. चला तर आज पुराव्यांसहित पाहूया बॉलिवूडच्या या ९ चित्रपटांबाबत, ज्यांच्या कथा हॉलीवूडने चोरल्या…

१) संगम : राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट “संगम” १९६४ मध्ये प्रदर्शित झाला. हॉलीवूडने २००१ त्याची नक्कल करत “पर्ल हार्बर” चित्रपट बनविला. दोन्ही चित्रपटांची कथा एकसारखीच आहे, दोन्ही चित्रपटांमध्ये दोन जिवलग मित्र आणि एक मुलगी असा लव्ह ट्रँगल आहे.

Loading...

२) मैंने प्यार क्यों किया : २००५ साली आलेल्या बॉलिवूडमधील सलमान खानचा “मैंने प्यार क्यों किया” आणि २०११ साली आलेल्या हॉलिवूडमधील एडम सॅन्डलरचा “जस्ट गो विथ इट” या दोन्ही चित्रपटांची कथा जवळपास सारखीच आहे.

३) रंगीला : १९९५ मध्ये आमिर खान आणि उर्मिलाचा “रंगीला” चित्रपट रिलीज झाला. २००४ साली हॉलिवूडमध्ये “विन अ डेट विथ टेड हॅमिल्टन” चित्रपट रिलीज झाला. दोन्ही चित्रपटांची कथा सारखीच असून त्यात लव्ह ट्रँगल दाखवला आहे.

४) विक्की डोनर : २०१३ मध्ये आलेला आयुष्यमान खुराणाचा “विक्की डोनर” चित्रपटाची प्रेरणा घेऊनच हॉलिवूडमध्ये २०१३ सालीच “डिलिव्हरी मॅन” चित्रपट रिलीज झाला. दोन्ही चित्रपट स्पर्म डोनर या विषयवार बनल्या आहेत.

५) डर : १९९३ मध्ये शाहरुख खानचा “डर” चित्रपट आल्यानंतर १९९६ मध्ये हॉलीवूडने “फियर” चित्रपट बनवला. चित्रपटाची कथा आणि लव्ह ट्रँगल एकसारखाच आहे.

६) जब वी मेट : २००७ मधील करीना कपूर आणि शाहिद कपूरचा “जब वी मेट” रिलीज झाला. हॉलीवूडने २०१० साली “लीप ईयर” चित्रपट बनवला. दोन्ही चित्रपटांची कथा एकसारखीच आहे.

७) अ वेनसडे : २००८ सालच्या “अ वेनसडे” चित्रपटाचा रिमेक करुन २०१३ साली हॉलिवूडमध्ये “ए कॉमन मॅन” चित्रपट प्रदर्शित झाला होता.

८) मधुमती : १९५८ सालच्या दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या “मधुमती” या सुपरहिट चित्रपटाची कॉपी करून १९७५ मध्ये हॉलीवूडने “द रेनकर्नेशन ऑफ पीटर प्राऊड” हा सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट बनवला.

९) छोटी सी बात : १९७६ साली बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या “छोटी सी बात” चित्रपटाची कॉपी करून हॉलीवूडने २००५ साली “हीच” हा चित्रपट बनवला ज्यात विल स्मिथ, इवा मेंडेस आणि केविन जेम्सने भूमिका केल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *