गुजरातमधील असा दर्गा जिथे हजारो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम साजरा करतात इफ्तार!

आपण सातत्याने एका समुदायाला दुसऱ्या समुदायाविरोधात भांडताना पाहिलं आहे.अशा वातावरणात सामाजिक सलोख्याच्या बातम्या आशेचा किरण जागवण्याचे काम करतात.अशीच एक बातमी गुजरात मधून आली आहे. इथे रमजानच्या महिन्यात हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे लोक एकत्र येऊन इफ्तार साजरा करतात.

रमजानच्या दिवसात मुस्लिम समुदायाचे लोक रोजा ठेवतात. संध्याकाळच्या वेळी इफ्तार सोबत ते आपला रोजा सोडतात. यामध्ये अनेक प्रकारचे पंचपक्वान्न आणि फळे खाण्याचा रिवाज आहे. तसे पाहायला गेले तर मुस्लिम समाजाचे लोकच इफ्तार करतात, परंतु गुजरातमधील सुरत येथील हजरत ख्वाजा दर्ग्यामध्ये दरवर्षी वेगळाच नजारा बघायला मिळतो.

रमजानच्या महिन्यात इथे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन इफ्तार साजरा करतात. दरवर्षी श्रद्धाळू लोक इथे एकत्र येतात. गेल्या पाच वर्षांपासून इथे हजेरी लावणाऱ्या के.घीवाला यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ते या दर्ग्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून येत आहेत. कित्येक हिंदू या दर्ग्यामध्ये येत असतात. हा धार्मिक सलोख्याचे उत्कृष्ठ नमुना आहे.

अशाच एका दुसऱ्या भाविकाने सांगितले की ते इथे ३८ वर्षांपासून येतात. इथल्या दर्ग्यामध्ये सर्व धर्माचे लोक प्रार्थना करण्यासाठी येतात. इफ्तार फक्त मुस्लिमांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे. जर आपल्याला धार्मिक सलोख्याचे उदाहरण बघायचे असेल तर आपल्याला इथे अवश्य यावे लागेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *