विघ्न टाळावे वीज अपघाताचे… 1

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीज अपघाताचे विघ्न टाळण्याची.

वीज दिसत नाही, मात्र तिचे परिणाम भयावह व जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे आद्य कर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.

महावितरणने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे अधिक एक रुपया २१ पैसे वाहन आकार; तसेच इंधन अधिभार असे वीजदर ठेवले आहेत. आयोजकांनी अशा उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, हा कमी दर ठेवण्यामागील हेतू आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी थोडाफार खर्च कमीअधिक करता येईल, पण वीजपुरवठ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित, धोकाविरहित असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. केवळ काटकसर म्हणून विजेचा भार सहन करू शकत नसणाऱ्या तकलादू वायर्स वापरल्यास शॉर्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची व अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवाचे दिवस पावसाळी असतात तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत वायर्स ढिल्या किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच अपघाताची मोठी शक्यता असते.

गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे तक्रार निवारण केंद्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

अनेक सार्वजनिक मंडळे जनरेटर्सचा वापर करतात. परंतु, वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो. परंतु, एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे.
गणपतीला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, यादरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. जाणते-अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीजअपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. कोणत्याही चुकीसाठी वीज क्षमा करीत नाही. त्यामुळे वीजपुरवठा घेताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी महावितरणचे अभियंते, जनमित्र आवश्यक तेथे संबंधित गणेश मंडळांना वीजवहन व्यवस्थेसंबंधी व वीजसुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

ज्ञानेश्‍वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल

Comments

comments

Previous ArticleNext Article

1 Comment

  1. चांगला उपक्रम आहे. विजेचा योग्य वापर करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास.. 1

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास

‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले..

लातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या मुंबई पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नांगरे-पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.

विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.

दहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.
या थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.

सामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

पारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं!

Comments

comments

आमचा ‘बच्चू’ किती गोड किती ‘कडू’.. 1

“अचलपूर चे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारल्याचे प्रकरण काल परवा चांगलेच गाजले. नाशिक महानगरपालिकेने अपंग पूनर्वसन कायदा 1995 अमलात आणला नाही तसेच अपंगांसाठी 3 टक्के राखीव असलेला निधी आज पर्यंत खर्च केलेला नाही म्हणून “प्रहार” संघटनेने नाशिक महापालिकेवर हल्ला बोल केला त्यात आयुक्त अभिषेक कृष्णा आणि बच्चू कडू यांच्या “बा”चा “बा”ची चा कार्यक्रम झाला. बच्चू कडू आयुक्तावर धावून गेले आणि त्यांनी आयुक्तावर हात उगारला असे वृत्त उमटले असून बच्चू कडू ना या प्रकरणी अटक ही झाली आहे. सध्या बच्चू कडू जमानतीवर मोकळे आहेत. हात उगराने बुकलून काढणे,सोटे लावणे, अंगावर धावून जाणे, कुणाच्याही बाप्पाने ऐकल्या नसतील अश्या भरजरी शिव्या हासडणे हा बच्चू कडू यांचा स्थायीभाव असून ते अस का करतात? त्यांचा संताप असा कसा ओसंडून वाहतो? अधिकारी कर्मचारी त्यांच्या रागाचे बळी का ठरतात? शिवीगाळ हाणामरीचा ‘आधार’ बच्चू कडू का घेतात? थोडक्यात ‘बच्चू’ कडू ना राग का येतो? याचा विचार करण्याची गरज निश्चितच आहे.एरवी अत्यंत शांत दिसणारा तेजस्वी चेहऱ्यावर हास्य ‘खेळविणारा’ हा माणूस अचानक का ‘खवळतो’ ? याचे उत्तर तर शोधावेच लागेल.”

आमदार बच्चू कडू हे एकटेच असे अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाणारे आमदार आहेत का? राज्य निर्मिती पासून आज मिती पर्यंत असे असंख्य ‘मारकुटे’ आमदार वा लोकप्रतिनिधी आपण पाहिले आहेत.वऱ्हाडापुरतं बोलायचं झालं तर विदर्भवीर भाऊ जाबूवंतरावांपासून ही यादी सुरू होते.भाऊ जाबुवंतरावांनी चक्क विधानसभेत पेपरवेटच फेकून मारला होता.अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आमदार सध्या अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तर इतके अधिकारी -कर्मचारी ‘कुटले’ आहेत की ‘कुटलेले’ अधिकारी -कर्मचारी एकत्र केले तर त्यांचाच एक स्वतंत्र मतदार संघ निर्माण करता येईल. मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी काही महिन्यांपूर्वी एका अधिकाऱ्याची पाद्यपूजा केली होती. आ.यशोमती ठाकूर यांनी एका पोलिसांच्या कानाखाली वाजविल्याने प्रकरण तर काल परवा पर्यंत ताजे होते. ही यादी तशी फार मोठी आहे.आपापल्या मतदार संघाच्या इतिहासात डोकावून ज्याची त्याची त्याने ती ‘अपडेट’ करावी.

या मारकुट्या आमदारांमध्ये दोन प्रकार आहेत.पहिला प्रकार आहे, स्वतःच्या इगो दुखावला ,अपमान झाल्यासारखा वाटला वा अपमान झाला,म्हणून मारहाण करणे आणि दुसरा प्रकार आहे लोकांची सार्वजनिक स्वरूपाची काम न केल्याबद्दल आमदाराने ‘चौदावे’ रत्न दाखविण्याचा. आमदार बच्चू कडू,आमदार प्रकाश भारसाकळे या दुसऱ्या प्रकारात मोडतात.काही महामानव आपली बेकायदेशीर काम न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ठोकतात ते खरे ‘लोकशाही’ जाणणारे असतात. कायदे लोकांनी पाळायचे असतात असा ठाम विश्वास असणारांचा हा वर्ग असतो. काही चतुर, समंजस आमदार अधिकारी,कर्मचाऱ्यांना गोड-गोड बोलून,त्यांना सहज सुलभ रित्या आपली वैध अवैध सहज,सुलभरीत्या उरकून घेतात.साऱ्यांनाच हे जमतं असं नाही. ज्यांना हे जमत नाही त्यांचा मग ‘बच्चू’ कडू होतो आणि अधिकाऱ्यांचा हनुमान होतो.

आमदार मोठा की अधिकारी
आमदार-अधिकाऱ्यात नेमका वाद का होतो ? या प्रश्नाच्या मुळाशी अधिकारी का मार खातो ? या प्रश्नाचे उत्तर आहे.आमदार जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात आणि अधिकारी जनतेच्या करातून भरलेल्या पैशांतून पगार उचलणार सेवक,थोडक्यात नौकर असतो.आमदाराला जनतेने सशक्त केलेले असते तर अधिकाऱ्याला त्याला मिळालेल्या अधिकाराने दोघांचेही काम लोकसेवा असते परंतु अस खरच दिसतं का? एकदा निवडून गेला की , जनतेला ‘माय-बाप’ म्हणणारा त्यांचा बाप होतो.पाच वर्ष सेवा करण्याचं वाचन देणारा मनसोक्त मेवा हदडतो. कुणी जीवाची मुंबई तर कुणी दुबई करतो. एखादा भटक-भोवरतर सारं जग फिरून येतो.तात्पर्य जनतेने आपल्याला मजा मारण्यासाठी निवडून दिल्याचा भ्रम काही भामट्यांना होतो म्हणून काही आमदार नामदार कधी हवाई सुंदरीला टाचणी रुतवताना आपण पाहिले आहेत तर काही झिंगलेले महाभाग आपण जाणतो.

दुसरीकडे आठराविश्व दारिद्र्य भोगणारा गरिबीचे चटके सोसणारा तरुण अधिकारी होताच गरिबी विसरतो,गरीब विसरतो, अधिकारी-कर्मचारी लोकसेवक आहेत,जनतेचे नौकर आहेत परंतु नेमकं ते हेच विसरतात.अधिकार-कर्मचारी वर्ग म्हणजे या समाजाचा मालक आणि जनता म्हणजे भिकेला लागलेली नेहमी नेहमी काही न काही मागणारी,उगाच कार्यालयांमध्ये नसत्या कामासाठी भटकणारी रिकामं टेकडी मंडळी असे समजणाऱ्यांचा प्रस्थापित समूह होय.खुर्च्या उडविणारी ही जमात जनतेच्या पैशावर आपले पोट भरत असते.परंतु नेमकं तेच यांना मान्य नसतं. अर्थात सारेच अधिकारी-कर्मचारी असे नसतात.असंख्य अधिकारी-कर्मचारी आपले कर्तव्य जाणतात .आपल्या देशाशी इमान राखतात. त्यांची समाज इज्जतही करतो परंतु उठून दिसतात माजलेले अधिकारी,कामचोर पगारखोर अधिकारी आणि मग असे अधिकारी ‘बच्चू’ चा बळी ठरतात.

आमदार आपला ‘इगो’ पाळून पोसून वाढवतो,अधिकाऱ्यांच्या हाती अधिकार येताच ‘इगो’ आपोआप वाढतो. अधिकारी, त्यातल्या त्यात ‘वर्ग-1’ अत्यंत ‘साय’ स्तरावर पहुडलेली जमात.थेट जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी पदावर आसनस्थ अधिकारी यांचं तर काहीच खरं नाही. ते मंत्र्यांना सुद्धा जुमानत नसतात ते आमदारांना के मोजतील? मी एवढा शिकलो ,सवरलो रात्रंदिन अभ्यास आणि अभ्यास करून महद प्रयासाने पदावर पोहचलो आणि हा दीड दमडी चा दहावी ,बारावी नापास माणूस केवळ लोकांनी निवडून दिला म्हणून माझ्यावर रंगदारी करतो का? दाखवतोय तुला ‘मी’ कोण आहे ते? असा एकूण ‘इगोइझम’ असतो. ‘मी’ तीन लाख मतदारांचा प्रतिनिधी आहे ‘मी’ म्हणेन ती पूर्व दिशा.माझं काम तर झालंच पाहिजे असा आमदार नावाच्या लोकशाहीतील ‘शहेनशहा’ चा अट्टाहास असतो आणि मग असे दोन ‘इगोईस्ट’ आमने-सामने आले की ‘अनिष्ट’ घडतच घडत. ‘तू’ मोठा की ‘मी’ यातूनच सारे महाभारत घडत असत.

काय ‘द्याचे’ राज्य
सर्वसामान्य माणसांच्या मनात अधिकारी,कर्मचारी यांच्याबद्दल कवडीचीही आस्था कुठेच दिसत नाही. समाजातील ही बांडगुळ आपली विश्वसनीयता पूर्णतः गमावून बसली आहेत.काही सन्मानीय अपवाद वगळता अधिकारी कर्मचार्यांबद्दल चांगलं बोलल्या जात नाही.कोणतेही शासकीय काम पैसा खाऊ घातल्याशिवाय होत नाही हा अलिखित नियमच बनला आहे.हे कायद्याचे नव्हे काय ‘द्यायचे’ राज्य आहे. ‘काय द्याचे’ हे एकदा तत्वतः मेनी झाले की ‘किती द्यायचे’ ? हे ठरते आणि राज्य शकट पुढे सरकते.सर्वसामान्य माणसाचे शासकीय अनुभव ‘अचाट’ असतात. साधा सात बारा काढायचा असला तरी एक हरामखोर पुजावा लागतो. एखादं ना हरकत प्रमाणपत्र बिना पैशाने मिळविणाऱ्याला खरं तर चिकाटीच प्रमाणपत्र पहिल्यांदा देणं जास्त संयुक्तिक ठरेल. सरकारी काम करावयास 56 इंचाची आता ‘ऐच्छिक’ नव्हे ‘अनिवार्य’ झाली आहे.

एक साधा सरकारी कागद मिळविताना ज्याला तो कागद द्यायचा अधिकार आहे त्याला शंभर वेळा जोड्याने मारण्याचा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात डोकावून जातो ही या लोकशाही राज्यातील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग जेव्हा एखादा बच्चू कडू जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला ठोकतो तेच सर्वसामान्य माणूस प्रचंड सुखावतो. त्याचा आत्मा तृप्त होतो. त्याची आंतरिक इच्छा बच्चू कडूच्या माध्यमातून पूर्ण झालेली असते. सर्वसामान्य माणसांची काम सुद्धा जागतिक महासत्तेचे डोहाळे लागलेल्या देशात आज तरी सफळ संपूर्ण होत नाहीत.जी काम होतात ती काही देऊन , काही खिळवून होतात. घेतलेल्या पगाराचा आणि केलेल्या कामाचा संबंध नसतो. या देशात सत्ता आणि संपत्ती नसणाऱ्या माणसाचा जन्म व्यर्थ असून या ‘बनाना पीपल’ चा उपेग केवळ राज्य करण्यापूरता मर्यादित असतो. तुमच्या माहितीसाठी आताशा तमाम मध्यम वर्गही या ‘बनाना पिपल’ वर्गात मोडायला लागला आहे.

कायद्याच्या राज्याचे काय?
आमदार बच्चू कडूनी आत्तापर्यंत अनेकाला सत्य ‘नारायण’ पार पडला आहे. ‘सिधे उंगलीसे घी नहीं निकलता’ हे बच्चू कडुना केव्हा कळले हे माहीत नाही पण त्यांची एक ‘ उंगली’ का वाकडी असते हे आता जनतेला कळले आहे.1995 साली लागू झालेला अपंग पुर्नवसन कायदा नाशिक महापालिकेने अंमलात आणला नाही.अपंगांसाठी राखीव असलेला 1995 पासूनचा निधी खर्च केला नाही. 1995 पासून 2017 पर्यंतचे आयुक्त काय झक मारत होते? असा साधा प्रश्न असून 1995 पासून 2017 पर्यंतच्या आयुक्तांनी केवळ खुर्च्या उबविण्याचे काम केले का? अपंगासाठी लढणाऱ्या बच्चू कडू सारख्या आमदाराने मग जाब विचारला तर त्यात त्यांचे नेमके चुकले कुठे? केवळ हात उगारला हे चुकले असावे.

माजलेल्या नौकारशाहीच्या फेकाटात लात घालण्याची इच्छा सर्वांचीच असते परंतु ती संधी आणि हिंमत एखाद्या बच्चू मधेच असते हे कसे विसरता येईल?
हा सारा बच्चू चा स्टंट आहे, नौटंकी आहे,प्रसिद्धीचा हव्यास आहे,असा नेहमीचा आरोप बच्चूवर होत असतो.हे सर्व एकवेळ मान्य केले तरी अशा स्टंट मुले जनतेचा फायदा आणि बच्चूला प्रसिद्धी मिळत असेल कुणाच्या बापाचे काय जाते? काल अभिषेक कृष्णाच्या अंगावर बच्चू धावून जाताच राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या आयायुक्तांनी अपंगाचा तीन टक्के राखीव निधीचा गोषवारा घेतला असणार यात कुणाला शंका आहे? असं एकाच्या अंगावर धावून गेल्यानंतर जर सारेच जागे झाले तर त्यात आनंदच नव्हे का? दुःख केवळ एवढंच व्हायला हवं की कायद्याच्या पालनासाठी चक्क आमदाराला कायदा हाती घ्यावा लागतो.’काय द्यायचे’ राज्यात अश्याने कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल केव्हा?

पाचर
देशात लोकशाही आहे.लोकशाहीने घटना स्वीकारली आहे. घटनेने नागरिकाला हक्क दिले, कायदा दिला. कायद्याचे नियम दिले. नियमाने माणसं बांधली.यात हाणामारी, शिवीगाळ कुठे येते. अधिकारी-करचार्यांनाही मूलभूत अधिकार आहेत. ते त्यांचे कर्तव्य पार पाडताना ‘कडू’ कुटणे त्यांच्या ‘ड्युटी’ चा कोणता भाग असू शकतो.मार खाण्यासाठी अधिकारी कामावर येतो का? अधिनकाऱ्याने काम केले नाही म्हणून झोडणे योग्य असेल तर काम न करणाऱ्या आमदार,खासदार,मंत्र्यांना का झोडू नये? असा रोकडा सवाल अधिकारी वर्गा तर्फे निश्चतच उपस्थित केला जाऊ शकतो. यावर या मारकुट्या आमदारांचे काय म्हणणे असू शकेल? या प्रश्नाचे उत्तरही मिळविण्याची गरज नाही का? त्याच बरोबर काम न करणाऱ्या अधिकाऱ्याना झोडपणे निश्चतच बेकायदेशीर आहे परंतु मग काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांशी नेमक्या कोणत्या भाषेत बोलावे? कसे वागावे? हे कुणीतरी सांगायला हवेच.

दिलीप एडतकर 
९४२२८५५४९३ 

Comments

comments

भारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या… 0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाला राखी हा शब्द माहित असेल का ? हे नक्की सांगता येणार नाही. परंतु मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भारतातील गावाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एका सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे व आता त्याच गावातून हिंदू मुस्लीम महिला,मुली डोनाल्ड ट्रम्प यांना १००१ राख्या पाठविणार आहेत. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे या करिता हे पाउल उचललेले आहेत.

www.thodkyaat.com

मेवात भागातील मरोरा या गावातील हि घटना. भारत आणि अमेरिका संबंध अधिक चागले व्हावे याकरिता आम्ही हे पाउल उचलले असे सेवाभावी संस्थे कडून सांगण्यात आले.

सुलभ अंतरराष्ट्रीय सामजिक सेवा संस्था (SISSO) यांचे प्रमुख बिंदेश्वर पाठक यांनी या गावाचे नामकरण Trump Village (ट्रम्पवाडी) केले तेव्हापासून हे गाव अधिक चर्चेत आले.

(Photo credit MONEY SHARMA/AFP/Getty Images) www.thodkyaat.com

दिल्ली पासून १०० किलोमीटर अंतरावर मारोरा हे गाव आहे. गावाचे नामकरण झाल्यानंतर प्रशासनास गडबडून जाग आली व जिल्हा प्रशासनाने हे अनअधिकृत ठरवून गावातील काही बोर्ड काढण्यात आले.

मरोरा गाव गुरगाव पासून ६०किमी अंतरावर पूर्णा तहसील मध्ये आहे. जवळपास १८०० लोकसंख्येचे गाव..

स्त्री सबलीकरणाकरिता आम्ही अनेक कार्यक्रम या गावात राबवत आहोत, या संस्थेच्या उपाध्यक्ष मोनिका जैन यांनी सांगितले.

नरेंद्र मोदि व डोनाल्ड ट्रम्पला गावातील सर्व स्त्रिया मोठा भाऊ मानतात म्हणूनच १००१ राख्या डोनाल्डला व ५०१ राख्या मोदीना त्यांनी पाठविल्या.
७ ऑगस्टला ह्या राख्या अमेरिकेला व्हाईट हाउस मध्ये पोहचतील त्यासोबत मोदी व ट्रम्प या दोघांना गावात येण्याचे आमंत्रण हि देण्यात आलेले आहे.

चला आता बघूया या दोन भावाकडून त्यांच्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त काय भेट मिळेल…

मल्हार टाकळे

Comments

comments

%d bloggers like this: