शेतकरी कर्जमाफी अर्जदार यादीत तुमचा नाव आहे का?
- 6.6Kshares
- Facebook6.5K
- Twitter37
- Pinterest0
- Facebook Messenger
- Share
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.
या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.
खालील यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासा आणि नसेल तर कृपया पुन्हा शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज त्वरित भरा. शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१७ आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : १८००१०२५३११
Latest posts by khaasre (see all)
- देशाच्या रक्षणासाठी चेंडू सोडून ग्रेनेडही हातात घ्यायला तयार आहे हा भारतीय खेळाडू.. - February 20, 2019
- मनसेच्या नितीन नांदगावकरांना या कारणामुळे २ वर्षासाठी मुंबईतून केले जात आहे तडीपार.. - February 20, 2019
- छोटासा देश आर्मीसाठी आहे खूप प्रसिद्ध! स्त्रियांना देखील लष्करी प्रशिक्षण घेणं असत आवश्यक.. - February 20, 2019
- 6.6Kshares
- Facebook6.5K
- Twitter37
- Pinterest0
- Facebook Messenger
- Share
कुठे बघायचं नाव यादीत
माझा नाव आहे का
at post rajgoli bk
माझे कर्ज नाही पण शेताचे लाईट बिल 3 वर्षापासुन थकित आहे. अगोदर रेग्युलर होतो ते माफ किंवा व्याज माफ होईल का ? मी भरण्यास तयार आहे.
kapus-wadgaon vaijapur
aurangabad