फेसबुक वापरता परंतु फेसबुक विषयी ह्या खासरे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ? 0

फेसबुक ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. जेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकचा अविष्कार केला तेव्हा त्याला देखील वाटले नव्हते की ही गोष्ट इतकी धुमाकूळ घालेल, असो पण तेव्हा त्याने धरलेला हट्ट आज त्याच्या आणि किंबहुना युजरच्या देखील चांगलाच कामी आला आहे. गळ्यांच्याच रोजच्या वापरातील फेसबुकबद्दलच्या अशा काही खासरे गोष्टी आहेत. ज्या युजर्सला फार क्वचितच माहिती असतील.
1- फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहितीये का? फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला कलरब्लाइंडनेस आहे.फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.

2- फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला कधीही ब्लॉक करता येणार नाही.

3- फेसबुकचा वापर करोडो युजर्स करतात. दुनियेतील जवळपास प्रत्येक देशात फेसबुकचा वापर केला जातो. पण चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशात फेसबुक बॅन आहे.

4- आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलबद्दल आपण फेसबुकवर त्यासंबंधी रिपोर्ट करू शकतो. फेसबुक अशा प्रोफाइलला मेमोरलाइज्ड अकाऊंट करतं.ज्याचा वापर त्या मृताचं कुटुंबीय व मित्र करू शकतात. ही लोक मृत व्यक्तीच्या टाईमलाईनवर जाऊन काहीही शेअर करून जुन्या गोष्टी ताज्या करू शकतात. या अकाऊंटला कुणीही लॉग- इन करू शकत नाही. तसंच या अकाऊंटमध्ये कुठलाही बदल करता येत नाही.

5- फेसबुकवर ‘पोक’ नावाचं एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ व उपयोग काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही. पण वास्तवातही यामागे काहीही अर्थ नाही. मार्क झुकरबर्गला फेसबुकमध्ये काहीही उपयोग नाही असं एक ऑप्शन हवं होतं. म्हणून त्याची निर्मिती झाली.

6- फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येतं, त्याचं नाव आधी ‘AWESOME’ असं होतं. पण ते बदलून LIKE केलं गेलं.

7- फेसबुकचा अतीवापर एका आजाराला निमंत्रण देत असतं. ज्याला फेसबुक अॅडिक्शस डिसऑर्डर असं नाव दिलं गेलं आहे. दुनियेतील करोडो लोक या आजाराने ग्रासले आहेत.

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्हाला माहितेय? पहिला ईमेल, ट्विट, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब व्हीडीओ ! 1

आता इंटरनेट शिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करणंही अशक्यच, हो ना! ईमेल, ट्विटर, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब आणि स्काईपचा आपला अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? पहिला ईमेल कुणी केला असेल, पहिलं ट्विट काय होतं?, युट्यूबवर अपलोड झालेलं पहिलं व्हिडिओ कोणतं होतं?, पहिली वेबसाईट कोणती होती?, पहिलं फेसबुक अकौंट कुणाचं होतं? आज या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात….

पहिला ईमेल

जगातला पहिला ईमेल 1971 मध्ये रे टॉमलिन्सन यांनी स्वतःलाच पाठवला होता. तो टेक्स्ट मेसेज त्यांनी QWERTYIOP असा काहीतरी टाईप करून पाठवलेला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ईमेलमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीही विशेष नव्हते.

पहिली वेबसाईट

टिम बर्नर्स ली हे वर्ल्ड वाईड वेब (WWW) चे जनक आहेत. जगातली पहिली वेबसाईट त्यांनी 1991 मध्ये बनवली होती. त्या वेबसाईटचा अॅड्रेस http://info.cern.ch/hypertext/WWW/TheProject.html असा होता. ली यांनी ही वेबसाईट बनवून त्यावर लोकांसाठी WWW बद्दलची सविस्तर माहिती दिली होती. तसेच जगातला पहिला ब्राऊजरही World Wide Web त्यांनीच बनवला होता.

पहिलं फेसबुक अकाउंट

सर्वात अगोदर फेसबुकवर 3 अकौंट तयार करण्यात आली. मात्र ती फक्त टेस्टींगसाठी वापरली गेली होती. ती तेव्हाच डिलीट करण्यात आली. त्यानंतरचे चौथं अकौंट हे खुद्द मार्क झुकरबर्ग यांचे आहे, ज्याला आपण पहिले-वहिले फेसबुक अकौंट म्हणू शकतो. त्यावेळी प्रत्येक अकौंटला आयडी कोड देण्यात आला होता. झुकरबर्ग यांचे अकौंट चौथं असल्याने आजही त्याच्या अकाउंट URL मध्ये 4 हा अंक आहे. त्यानंतर 5 व 6 नंबरचे अकाउंट हे झुकेरबर्ग यांचे रुममेट्स आणि फेसबुकच्या सहसंस्थापकांचे आहेत. यानंतर 7 नंबरचे अकौंट हे Arie Hasit यांनी बनवले आहे आणि ते फेसबुकच्या टीम बाहेरील फेसबुक अकौंट उघडणारी पहिली व्यक्ती आहेत.

पहिला युट्यूब व्हीडीओ

युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी जगातला पहिला युट्यूब व्हीडीओ अपलोड केला होता. “मी अॅट द झू” असं नाव असलेला हा 19 सेकंदांचा व्हीडीओ 24 एप्रिल 2005 रोजी अपलोड करण्यात आलाय. आजपर्यंत या व्हीडीओला 4 करोडपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय.

पहिलं ट्विट

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी 21 मार्च 2006 रोजी जगातला पहिला ट्विट केला होता. “just setting up my twttr” असे ते ट्विट होते.

पहिलं डोमेन नेम

जगातलं पहिलं डोमेन नेम Symbolics.com असून ते 15 मार्च 1985 रोजी रजिस्टर करण्यात आले होते. हे डोमेन नेम Symbolics Inc. नावाच्या कॉम्प्युटर सिस्टम कंपनीकडून नोंदवले गेले होते.

स्काईपवरचं पहिलं वाक्य

एप्रिल 2003 मध्ये स्काईपवर इस्टोनीयन भाषेत पहिल्यांदा काही शब्द बोलले गेले होते. स्काईपच्या डेव्हलपमेंट टीमच्या एका सदस्याने उच्चारलेले “हॅलो, तुम्ही मला ऐकू शकता का?” असे ते वाक्य होते.

चला पटापट शेअर करा ह्या खासरे माहितीला

Comments

comments

जाणून घ्या, तुमचे फेसबुक अकाउंटला कोण वारंवार भेट देतो… 0

फेसबूकने तरुणाईस अक्षरशः वेद लावले आहे. तरुणच कशाला सर्व वयोगटातील लोक फेसबुक वापरतात. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो. काही वेळा आपण इतरांचे प्रोफाईल चेक करतो. तसंच आपलं प्रोफाइल कोण चेक करतं का ? हा प्रश्न नेहमी तुम्हाला पडतो. जर तुम्हाला माहिती करायचे असेल कि तुमच्या प्रोफाईलला कोण भेट देते तर किती बरे होईल.
हो आता तुम्ही हे माहिती करू शकता ते हि अगदी सोप्या पद्धतीने त्या करिता फक्त एक Google Extension आपल्या Chrome Browser मध्ये इंस्टाल करायच काम आहे..

Extension मिळविण्याकरिता काय करसाल ?

गुगल क्रोममध्ये उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉट वर क्लिक करा. त्यामध्ये More Tools वर क्लिक करा, नंतर Extension वर क्लीक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. मग स्क्रीनवर खूप ऑपशन्स येतील. त्यातील सर्वात खाली असलेले Get more extensions वर क्लिक करा.

Get more extensions वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. मग डाव्या बाजूला दिलेल्या सर्च ऑप्शनमध्ये Flatbook लिहून एंटर करा. अॅड ऑप्शन येईल. Flatbook अॅड झाल्यावर प्रोसेस पूर्ण होईल.

हे flatbook app तुमच्या फेसबुक खात्यास कनेक्ट होईल तुम्ही फेसबुकवर डाव्या बाजूस बघू शकता. काही तासात तुमच्या account ची पूर्ण माहिती मिळविल्या नंतर तुम्हाला कोणी Unfriend केले, तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हि सर्व माहिती तुम्हाला Flatbook मध्ये मिळेल.
या करिता तुम्ही खाली दिलेला विडीओ हि बघू शकता…

धन्यवाद पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका…

Comments

comments

फेसबुक मध्ये काम करणारी पहिली महिला… 1

२००५ मध्ये ती जेव्हा फेसबुकमध्ये जुळली तेव्हा फेसबुकमध्ये काम करणारी ती पहिला महिला इंजिनिअर ठरली होती. मात्र तेथेही रूचीने आपले वेगळे पण दाखवून दिले. रूचीच्या एका संकल्पनेमुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. आज जी न्यूज फीड आपण बघतो ज्यावर आपले मित्र काय करत आहे, वेगवेगळ्या बातम्या इत्यादी अपडेट मिळतात त्या न्यूज फिडचा शोध लावणारी दुसरी तिसरी कोणी नसून रुची एक पुणेकर आहे. चला बघूया खासरेवर या पुणेकर इंजिनियरची माहिती…

जन्म २० जानेवारी १९८२ साली तिचा जन्म पुणेला झाला प्राथमिक शिक्षण पुणेला तिने पूर्ण केले. लहानपणची आठवण विचारल्या असत्या ती सांगते कि हॉकि टीमची सलग ६ वर्ष ती सदस्य होती. याच गोष्टीमुळे तिला टीम सोबत काम करायची सवय लागली आणि हि सवय भविष्यात तिला अत्यंत उपयोगी आली.

तिचे शिक्षण कॉर्नेगी मेलन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये बॅचलर व मास्टर डिग्री घेतली. पती आदित्य अग्रवाल व तिची भेट याच दरम्यान झाले. आदित्य हा मलेशियन भारतीय आहे. सध्या आदित्य आणि रुची दोघेही सोबत काम करतात. नुकतेच तिचे नाव PayTm सोबत जोडले गेले. त्यामुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे.

रुची संघवीचे वडील पुण्यात एक हेवी इंजीनियरिंग कंपनी चालवतात. तर तिचे आजोबा दादा स्टेनलेस स्टीलच्या उद्योगात होते. त्यामुळे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर रूची घरातील व्यवसायाच सांभाळेल असे ठरले होते. त्यावेळी तिचे वडील तिला म्हणत असत की, या स्पर्धत तू महिला आहे टिकणार कशी ? त्यावेळी ती वडीलांना विश्वासाने सांगायची, मी जे काही करेन त्यात नक्कीच यशस्वी होईन. कारण तिला स्वतःवर आत्मविश्वास होता.

पदवी घेतानाच रूचीला वॉल स्ट्रीटमध्ये एका बँकेत काम करण्यास संधी मिळाली होती. तेथील क्यूबिकल्स खूपच छोटे होते व तेथे तिला कम्फर्ट वाटत नसत. त्यावेळी तिने बँकेला सांगितले की, मला येलो फीवरचा त्रास आहे आणि ती काम करू शकत नाही. बॅंकेने तिला सोडण्याचा निर्णय घेतला व रूची ओरेकल कॉरपोरेशनमध्ये ज्वाईन झाली. त्यानंतर काही काळ तेथे काम केल्यानंतर रूचीने ओरेकल कंपनी सोडून फेसबुकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय चुकीचा असल्याचे घरच्यांचे म्हणणे होते. कारण फेसबुकमध्ये त्यावेळी केवळ 20 लोक होते. फेसबुक नुकतीच सुरु झालेली एक नवीन कंपनी होती.

फेसबुकमध्ये काम करताना रूचीला तिचा जुना वर्गमित्र आदित्य अग्रवाल भेटला. दोघांत पुन्हा मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रुचीने फेसबुकमधील न्यूजफीड फीचरचे पहिले व्हर्जन तयार केले होते. अर्थात याला प्रथम काहींनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले.

फेसबुकमधील फीचर ‘न्यूज फीड’ची आयडिया रुचीची होती. २००५ मध्ये रूचीने फेसबुक जॉईन केल्यानंतर संस्थापक जुकरबर्ग आणि त्याचे सहकारी साईटवर यूजर्सना जास्तीत जास्त वेळ व्यस्त राहण्यासाठी काही तरी कल्पना शोधत होते. कारण पहिले मित्राला मेसेज करणे, मित्र शोधणे येवढेच फेसबुकचे फिचर होते यामध्ये रुचीने अमुलाग्र बदल केला. त्याकरिता रूचीने एक न्यूज पेपरसारखी आयडिया दिली. ज्यामुळे हार्डकोर वाचक तासनतास साईटवर राहू शकतील असे रूचीचे म्हणणे होते. ही आयडिया मार्कला पसंद आली. मग त्यानंतर तयार झाले फेसबुकचे फीचर ‘न्यूज फीड’ केवळ या फीचरमुळे फेसबुकवर प्रती ताशी ५० हजार नवे यूजर्स राहू लागले. ज्यामुळे फेसबुकला कोट्यावधीचा फायदा मिळू लागला.

फेसबुकमध्ये काम करताना तिने कंपनीपासून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. मला आई-वडिलांना भेटायला जायचे असल्याचे कारण तिने कंपनीला दिले. त्यावेळी ती आदित्यसोबत डेटिंग करत होती. भारतात आल्यावर आदित्यसोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला. दोघांचे लग्न झाले. ह्या लग्नात स्वतः मार्क झकेनबर्ग आला होता. त्याच्या सोबत त्याची पत्नी प्रीसिलापण होती दोघांनी भारतीय वेषात धमाल उडवली होती. हे तुम्ही फोटोत बघूच शकता. २०१० साली हे दोघेही फेसबुकमधून वेगळे झाले. आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

रूची व पती आदित्यने मिळून कोव नावाची कंपनीची सुरुवात केली. दोन वर्षातच ती 25 कोटी डॉलरला ड्रॉपबॉक्स कंपनीला विकली व दोघेही त्याच कंपनीत रूजू झाले. रुची ड्रॉपबॉक्समध्ये व्हाईस प्रेसीडेंट (ऑपरेशन्स) राहिली. वर्षभर तेथे राहिल्यानंतर तेथूनही ती बाहेर पडून सल्लागार म्हणून काम पाहू लागली.

Paytm सध्या भारतात सर्वाधिक लोकप्रिय झाले. याचे मुख्य कारण प्रधानमंत्री मोदिनी केलेली नोटबंदी आहे. परंतु रुची सध्या PayTm सोबत काम करत नाही कारण तिचे बाळ तिला महिन्यात चार वेळेस वेगवेगळ्या देशात प्रवास करणे कठीण जात होते म्हणून तिने PayTm सोबत संबंध तोडले. परंतु जे होते ते चांगल्या करिता होते. रुची व तिचा पती आदित्य दोघेही त्यांच्या आयुष्यात नवीन बाळासोबत खुश आहे.

तिला पुणेच काय आवडते हे विचारल्यास ती सांगते कि जोशी वडेवाला, Marzorin, Cake & Counter आणि शिवसागर या गोष्टीची तिला अमेरिकेत नेहमी आठवण येते.

रुची संघवी फेसबुकमध्ये काम करणारी पहिली महिला व विशेष म्हणजे एक पुणेकर तिला खासरे तर्फे सलाम…
हि माहिती अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

%d bloggers like this: