आपण माणूस आहोत का क्रूर प्राणी ? हत्तीचा ‘हा’ पूर्ण फोटो पाहून ठरवा…

ही दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बोत्स्वाना हा कलहरी वाळवंटाने व्यापलेला भाग ! कधीकाळी जगातील सर्वात गरीब असणारा हा देश आज जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. दोन महिन्यांपूर्वीच तिथल्या सरकारने शिकारीला कायदेशीर मान्यता दिली.

तिथल्या पर्यावरण, नैसर्गिक संसाधने आणि पर्यटन मंत्रालयाने फेसबुकवर याची घोषणाही केली. ५ वर्षांपूर्वी शिकारीवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांनी आलेला हा फोटो बोत्स्वाना सरकारच्या निर्णयाचाच एक परिणाम आहे. हा फोटोच सांगत आहे की जगात माणूस आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी संपल्या आहेत.

सगळं काही पैशांसाठी !

काळीज पिळवटून टाकणाऱ्या या फोटोत एक हत्ती मोकळ्या पटांगणात मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. सगळ्यात विकृत गोष्ट म्हणजे शिकाऱ्यांनी त्या हत्तीची सोंड कापून वेगळी करून त्याच्या शेजारी ठेवली आहे. त्याचा चेहरा कापण्यात आला आहे. त्याच्या पोटातून आतड्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत.

Loading...

पाशवीपणाचा हा सगळं नंगानाच झाला तो केवळ काही पैशांसाठी. हे सगळं घडलं ते केवळ त्या हत्तीच्या दंतांसाठी ! हा फोटो द्रोण कॅमेरातून घेण्यात आला आहे. हे बघून आपल्यालाही माणसाचं माणूसपण संपल्याचे जाणवेल.

पहा फोटो :

अशी करतात शिकार आणि इतके मिळतात पैसे

हत्तीची शिकार करण्यासाठी सर्वप्रथम त्याला घेरले जाते. चारी बाजूंनी त्याच्या पोटावर शस्त्रांनी वार केले जातात. त्यांनतर लाकडे कापण्यासाठी जो साखळीचा कटर वापरला जातो, त्याने हत्तीची सोंड कापली जाते. इतक्या क्रूरपणे हत्तीला मारून झाल्यावरही कटरने त्याचा चेहरा कापून काढला जातो.

त्यातून हस्तिदंत काढले जातात. साधारणपणे अर्धा किलो वजनाच्या आणि अर्धा फूट लांबीच्या हस्तीदंताची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास २५ लाख रुपये आहे. त्यांचा वापर शोभेच्या वस्तू, मूर्ती आणि औषधे निर्माण करण्यासाठी केला जातो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *