Mg id top
Loading...

अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात आपण आजपर्यंत अनेकदा बघत आलो आहोत. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात गेले तर फायद्याचं ठरतं.

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी अंडे खाणे फायद्याचं आहे. आपण अंडे तर खातोच पण अंडे फोडल्यावर त्याचे कवच आपण टाकून देतो. पण अंड्याचे कवचही फायद्याचे असते हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. या कवचाचे फायदे माहिती नसल्याने आपण विचार न करता अंडे फोडून झाल्यावर कवचाला केराची टोपली दाखवतो.

Loading...

खासरेवर जाणून घेऊया काय आहेत अंड्याच्या कवचाचे फायदे-

अंड्याचं कवच आपण फेकून देतो पण याच कवचाचा वापर किडे किटाणू दूर पळवून लावण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी देखील अंड्यांच्या कवचाचा वापर होतो. त्यासाठी लहान बादलीत दोन चमचे अंड्याच्या कवचाची पावडर घाला आणि त्यात रात्रभर कपडे भिजवत ठेवा.

जसे कि आपण बघितला अंड्याच्या कवचाने किडे किटाणू पळून जातात. त्याप्रमाणे अंड्याचे कवच फळे आणि भाज्यांजवळ ठेवा. त्यामुळे फळे भाज्यांवर घोंगावणारे किडे पळून जातील.

अंडे फोडून त्याच्या कवचात मेण भरून वात लावल्यावर मेणबत्ती म्हणून अंड्याच्या कवचाचा उपयोग होऊ शकतो. अंड्याच्या कवचाची पावडर चेहऱ्याला लावल्यास त्वचा टवटवीत दिसेल. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.

त्वचेची आग होत असेल किंवा खाज येत असल्यास अंड्याचे कवच वापरा. तसेच मांजरी घाण करतात तेथे अंड्याचे कवच फोडून टाका. तुम्हाला लवकरच याचा परिणाम दिसेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *