विकेट किपरला फक्त धोनीच अश्या प्रकारे चकवू शकतो, बाकी कोणी नाही

महेंद्र सिंग धोनी क्रिकेटमधील भारताचा कोहिनूरच म्हणावे लागेल. धोनी वेगवेगळ्या वेळेस आपल्या चलाख बुद्धीचा परिचय देतो आज असाच नवीन किस्सा आपण खासरेवर बघूया ज्यामध्ये धोनीने परत विकेट किपरला चांगल्या प्रकारे मूर्ख बनविले,

भारतीय संघ न्यूझीलंड सोबत दुसरी टीट्वेंटी मैच ७ बॉल राखून विजयी झाला. आता सिरीज एक एकच्या बरोबरीवर आहे. १० फेब्रुवरीला या सिरीजचा अंतिम सामना खेळण्यात येत आहे. परंतु या मैच मधील काही प्रसंग सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पहिला प्रसंग जेव्हा वृषभ पंतने एका हाताने जोरदार षटकार मारला आणि दुसरा प्रसंग घडला १६ व्या षटकात

बॉलिंगला होते स्पिनर सोढी आणि समोर महेंद्र सिंघ धोनी ओव्हरचा पाचवा चेंडू, धोनी लंबा शॉट खेळायला पुढे आला. स्पिनर सोढीला हे जाणवताच त्याने हा बॉल वाईड टाकला. त्याला वाटल कि धोनी याने स्ट्म्प होईल परंतु धोनीची बुद्धी या पेक्षा चलाख निघाली. त्याने समजून घेतला कि चेंडू हा batवर येत नाही आहे.

मग काय तर धोनीने एक नवीन शॉट खेळला आणि फळीने चेंडू हा अलगद सिली पॉइंट कडे वळविला. धोनीने विकेट कीपिंग करताना त्याचा प्रत्यय अनेक वेळेस दिला आहे परंतु आज परत त्याने या शॉटने बॉलर आणि विकेट किपरला चांगलाच चकवा दिला आहे.

Loading...

खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि अनेक लोक या व्हिडीओची प्रशंसा करत आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *