Loading...
Loading...

प्रत्येक मराठी माणसाने वाचावे असे दादा कोंडके यांच्या आत्मचरित्राचे शेवटचे पान…

दादा कोंडके या नावाने मराठी चित्रपटसृष्टीवर खरोखरच दादागिरी करत आपले अधिराज्य गाजवले. दादा म्हणजे केवळ विनोदी अभिनेता नव्हे, तर विनोदी लेखक, गीतकार, संवादकार, दिग्दर्शक, निर्माता आणि बरंच काही ! एकच व्यक्ती परंतू गुण अनेक. त्यांच्या वेशावरून ते लोकांच्या लक्षात राहत असले तरी “वेष असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कळा” या संतवचनानुसार त्यांच्या अंगी अनेक कलागुणांचा संगम होता.

दादांच्या चित्रपटांची इतकी प्रचंड क्रेझ होती की दादांचे ओळीने सलग नऊ चित्रपट “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये निवडले गेले. त्यांचा “एकटा जीव सदाशिव” चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून राज कपूर सारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शक निर्मात्याला सुद्धा आपल्या मुलाला लाँच करण्यासाठी “बॉबी” चित्रपटाचे प्रदर्शन तब्बल पाच महिने लांबवावे लागले होते. यावरुन दादांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.

अशा लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असणारे दादा प्रत्यक्षात मात्र खुप डाऊन टु अर्थ व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनावर “एकटा जीव” हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. त्यात त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी पहायला मिळतात. या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावरील दादांचे शब्द प्रत्येक कलाकार आणि जीवंत व्यक्तीने वाचावे असे आहे.

“…आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे…”

Loading...

लोक देवाकडे पैसा, आयुष्य मागतात, पण दादा सारखा अवलीया माणूसच माझी म्हणता येतील अशी माणसं मागू शकतो. दादांच्या आठवणींना विनम्र अभिवादन !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *