Mg id top
Loading...

पीछे देखो पीछे म्हणणारा गोंडस अहमद शहा बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

सोशल मिडीयावर तुम्ही “पीछे देखो पीछे” वाल्या एका गोंडस मुलाचा व्हिडीओ पाहिला असेल तर त्याचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. अहमद शाह खान असे नाव असणारा तो छोटा मुलगा पाकिस्तानचा असुन त्या व्हिडिओमुळे पाकिस्तानसोबतच भारतातही तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत पाकिस्तानचा तैमूर आहे असं त्याचे वर्णन केलेजाते. आता त्याचा “दूध प्या दूध” नवीन व्हिडीओ आला आहे. जाणून घेऊया त्याविषयीचं…

अहमदचा नवीन व्हिडीओ दूध प्या !

Loading...

सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अहमद शाहकडे एका दुधाच्या ब्रॅण्डची जाहिरात चालून आली आहे. इस्लामाबाद शहरात Purelait नावाची दुधाची होम डिलिव्हरी देणारी आणि दुधाच्या प्रॉडक्ट्सची निर्मिती करणारी एक कंपनी आहे. त्यांनी आपल्या ब्रॅण्डची विक्री वाढवण्यासाठी अहमद शाहला आपल्या दुधाच्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत काम दिले आहे. काही म्हणा, पण सोशल मीडियाने मात्र अहमदला रातोरात स्टार केले आहे !

८ वर्षांच्या अहमदने जाहिरात केली

अहमदचा जन्म २०११ मध्ये झाला असून त्याने वयाच्या ८ व्य वर्षीच जाहिरातीत आपले डायलॉग न अडखळता बोलून दाखवले. दुधाच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीत अहमदचा डायलॉग असा आहे : “हाय फ्रेंड्स ! कैसे हो ? ठीक हो ? हां मैं ठीक हूँ ! क्यूँ की मैं प्युअरलेट का दूध पिता हुं इसलिये क्युट हुं ! प्युअरलेत दूध मेरी गाय का हैं ! प्युअरलेत दूध पियो और मेरी तरह हेल्दी हो जाओ !”

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *