Mg id top
Loading...

क्रिकेटर शिवनारायण चंद्रपॉलच्या डोळ्याखाली दोन काळे पट्टे का असायचे ?

वेस्टइंडीजच्या क्रिकेट इतिहासात शिवनारायण चंद्रपॉल हे कधीही विसरता येणार नाही, असे नाव आहे. मूळ भारतीय वंशाचा शिवनारायण वेस्टइंडीज कडून सलामीला खेळत असताना त्याला बाद करणे म्हणजे समोरच्या संघाला आव्हानात्मक असायचे. शिवनारायण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र ज्यावेळी तो क्रिकेट खेळायचा, तेव्हा त्याची एक स्टाईल लोकांसाठी औत्सुक्याचा विषय असायची. शिवनारायण ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग किंवा फिल्डिंग करत असायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यांसखाली दोन काळे पट्टे लावलेलं असायचे. काय आहे त्याचे रहस्य

भारतीय वंशाचे खेळाडू वेस्ट इंडिजकडून कसे खेळायला लागले ?

Loading...

शिवनारायण चंद्रपॉल किंवा रामनरेश सारवान यासारखी भारतीय नावे असणारे खेळाडू वेस्टइंडीज संघात कसे हा प्रश्न आपल्याला पडत असेल. या खेळाडूंचे पूर्वज ब्रिटिशकाळातच वेस्ट इंडिजला गेले होते. शिवनारायण चंद्रपॉलचे पूर्वज भारतातील बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आहेत. शिवनारायचे पूर्वज पवन कुमार १८७३ मध्ये भारतातून वेस्टइंडीजच्या गुयानामध्ये जाऊन वसले होते. २०११ साली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिनारायण चंद्रपॉलला “दशकातील सर्वोत्तम बिहारी क्रिकेटर” पुरस्कार दिला होता.

या कारणामुळं शिवनारायणच्या डोळ्यांखाली असायचे काळे पट्टे

आपल्याला वाटायचे जसे भारतातील खेळाडू तिरंग्याचे स्टिकर्स गालावर, कपाळावर, गळ्यावर लावतात, तसेच शिवनारायणही वेस्टइंडीजच्या ध्वजाचा स्टिकर आपल्या डोळ्यांखाली लावत असेल. परंतु चंद्रपॉल त्याच्या डोळ्यांखाली वेस्टइंडीजच्या ध्वजाचा स्टिकर लावत नसून काळ्या रंगाचे पट्टे लावायचा. ते यासाठी की मैदानावर सूर्याची किरणे सरळ डोळ्यांवर पडू नयेत. या पट्ट्यांना अँटी ग्लेयर म्हणतात, जे उन्हात खेळतानाडोळ्यांना लागणाऱ्या झालंच प्रमाण कमी करतात. एका अर्थाने सनग्लास किंवा गॉगल घालण्याऐवजी शिवनारायण हे काळे पट्टे वापरायचा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *