Mg id top
Loading...

बॉलिवूड कलाकार घालतात “ही” महागडी घड्याळे

आजच्या डिजिटल युगामध्ये मनगटावर घड्याळे घालण्याची फॅशन लोप पावत आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने घड्याळे वापरण्याची गरज उरली नाही असे नव्या पिढीचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात घड्याळे वापरायचीच झाली, तर स्मार्ट वॉच हा पर्याय निवडला जातो.

परंतु बॉलिवूडमधील अनेक स्टार कलाकार आजही मनगटावरची घड्याळे वापरण्याला पसंती देतात. त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या आणि महागड्या घड्याळाचा समावेश आहे. पाहूया काही बॉलिवूड कलाकार आणि ते वापरत असलेल्या घड्याळांबद्दल खास माहिती…

Loading...

१) अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन :

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल अभिषेक आणि ऐश्वर्याला महागडी घड्याळे वापरण्याची आवड आहे. अभिषेक “सीमास्टर ३०० ओमेगा मास्टर” ब्रँडचे घड्याळ वापरत असून त्याची किंमत साडे सात लाख रुपये आहे. तर ऐश्वर्या Longines ब्रँडचे DolceVita हे एक लाख रुपये किमतीचे घड्याळ वापरते.

२) रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण :

मागच्या वर्षी विवाहबंधनात अडकलेले रणवीर आणि दीपिका या बॉलिवूड कपलला देखील महागडी घड्याळे वापरण्याची हौस आहे. रणवीर त्याला रोहित शेट्टीने गिफ्ट दिलेले Franck Muller Vanguard ब्रँडचे घड्याळ वापरतो, त्याची किंमत जवळपास ६ लाख रुपये आहे. तर दीपिकाला Tissot ब्रॅण्डच्या घड्याळाची आवड असून ती “क्लासिक प्रिंस डायमंड रोज गोल्ड” हे ८ लाख रुपये किमतीचे घड्याळ वापरते.

३) इम्रान हाश्मी :

महागड्या घड्याळाच्या बाबतीत इम्रान हाश्मीचा कुणीच हात धरणार नाही. इम्रान हाश्मी Audemars Piguet या ब्रँडचे घड्याळ वापरत असून त्याची किंमत तब्बल २.१ कोटी रुपये इतकी आहे.

४) शाहरुख खान :

बॉलिवुडहा किंग खान शाहरुख Rolex Cosmograph या ब्रँडचे १२ लाख रुपये किंमत असणारे घड्याळ वापरतो. शुभ्र सोनेरी रंगाची डायल असणारे हे घड्याळ शाहरुखच्या मनगटावर अनेकदा बघायला मिळते.

५) रणवीर कपूर :

कपूर फॅमिलीतील चॉकलेट बॉय रणवीर हा सर्वात महागडे कपडे आणि शूज वापरणारा बॉलिवूड अभिनेता असला तरी Tag heuer ब्रँडचे ४ लाख रुपये किमतीचे घड्याळी तो वापरतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *