प्रेमी युगलास मुलीच्या घरच्या कडून मारहाण, व्हिडीओ बघून तळपायाची आग मस्तकात जाईल..

बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील नांदूर बसस्थानकावर घडली आहे. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

मंगळवारी नांदुरा बस स्थानकात घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण झाली असली, तरी या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही काहीही कारवाई केलेली नाही.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात. यातील एक विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी आपल्या प्रियकरासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती. याची माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली. चिडलेल्या कुटुंबीयांनी बस स्थानक गाठून दोघांना गप्पा मारताना रंगेहाथ पकडले आणि तिथेच त्यांना बेदम मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओ उपस्थित बघ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड झाला.

बघा मारहाणीचा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *