Mg id top
Loading...

भाजप आमदाराच्या दोन पत्नी समोरासमोर रस्त्यावर तुफान हाणामारी

पहिली पत्नी असताना दुसरी सोबत संसार थाटला आणि त्यानंतर दोन्ही पत्नी काही दिवसाने समोरा समोर आल्या आणि जो काही प्रकार घडला तो बघ्यांची गर्दी खेचणारा होता.

यवतमाळमधील आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये वाद उफाळला.पंढरकवड्यातील एका कार्यक्रमादरम्यान तोडसाम यांच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला चांगलाच चोप दिला. पहिली पत्नी असूनही राजू तोडसाम हे गेल्या काही वर्षांपासून प्रिया नावाच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत. तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरा विवाह करुन तिच्याशी संसार थाटला.

Loading...

प्रिया या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे एकत्र सहभागी होत असत. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या घडामोडींमुळे त्यांची पहिली पत्नी त्रस्त होती. या विषयावरुन काल दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हाणामारी झाल्याची माहिती आहे. पहिली पत्नी नातेवाईकांसह कार्यक्रम ठिकाणी धडकली आणि मग दोघींमध्ये हाणामारी झाली.

राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा इथल्या वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. मात्र पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत असल्याच्या कारणावरुन दोघींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. पुढे हे प्रकरण पोलिसात गेलं. पण पुढे काय कारवाई झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

बघा व्हिडीओ

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *