जाणून घ्या दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने होणारे मोठे फायदे 0

sugercane

उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो.उसाच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते.

उसाचा रस आरोग्यास चांगलाही मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पिशक तत्वे असतात.त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्या समस्याही कमी होतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो.

sugarcane-juice

जाणून घेऊया दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने होणारे काही मोठे फायदे-

किडनीसाठी उत्तम-

उसाच्या रसामध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे उसाचा रस हा किडनीला उत्तमरीत्या काम करण्यास मदत करतो. उसाच्या रसाच्या नियमित सेवनामुळे युरिन मध्ये होणारी जळजळ कमी करण्यास देखील मदत मिळते.

डीहायड्रेशन पासून बचाव-

उन्हात फिरल्याने बरेच वेळा आपल्याला डीहायड्रेशन होण्याची शक्यता बळावते. उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅग्नीज बऱ्याच प्रमाणात असते. त्यामुळे उसाच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्यास इलेक्टरोलाईट्स आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.

उत्तम ऊर्जेचा स्त्रोत-

उसाचा रस आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतो. उसाच्या रसामध्ये असणाऱ्या ग्लुकोजच्या अधिक प्रमाणामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. ऊसाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि इलेक्टरोलाईट्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उसाचा रस हा शरीरासाठी एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे तुम्ही नियमित उसाच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला एनर्जी मिळेल व उन्हापासून बचाव होऊन शारीरिक शांत राहण्यास ही मदत मिळेल.

स्किनसाठी उत्तम-

उसाच्या रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी आणि ग्लायकोलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक स्किनसाठी फायदेशीर असतात. अल्फा हायड्रॉक्सी आणि ग्लायकोलिक ऍसिड चेहऱ्यावरील डाग तर कमी होतातच सोबत पिंपल्सही दूर होतात. उसाचा रस पिल्याने स्किन हायड्रेटेड ठेवण्यासही मदत मिळते.

तोंडातील दुर्गंधीपासून मुक्तता मिळते-

मिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये अल्कलाईन असल्यामुळे उसाच्या रसाचा अँटी बॅक्टेरिअल प्रभाव पडतो. त्यामुळे उसाचा रस नियमितपणे पिल्यास दातांचा इन्फेक्शनपासून बचाव होतो व दात निरोगी राहण्यास मदत मिळते.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम-

उसाच्या रसात भरपुर प्रमाणात ग्लुकोज असल्यामुळे आपण तो डायबिटीज च्या पेशंटसाठी हानिकारक समजू शकतो, पण असे नाहीये. ऊसाच्या रसात कमी अधिक प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे उसाचा रस हा डायबिटिजच्या रुग्णांसाठीसुद्धा किफायतशीर ठरू शकतो.

एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट-

अभ्यासातून सिद्ध झाले आहे की उसाचा रस हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून वापरू शकतो.

कॅन्सरशी लढतो-

अँटीऑक्सिडेंटमुळे शरिरावर शक्तिशाली प्रभाव पडतो. एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे की फ्लेवोन कॅन्सरचे प्रसार आणि उत्पादन थांवण्याससाठी प्रभावी असतो.

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

उसाचा रस पिण्याचे तोटे वाचून तुम्ही थक्क व्हाल,खास करून या व्यक्तींनी राहावं सावध !

Comments

comments

Previous ArticleNext Article
विचारशील मराठा..कृतीशील मराठा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले… 0

मुंबईचे डबेवाले

आपल्याकडील चांगल्या गोष्टींची ओळख आपल्याला कधी कधी परकीयांच्या दृष्टीतुनच होते असे अनेकदा अनुभवायला मिळते. मुंबईच्या डबेवाल्यांबाबत नेमकं हेच आहे. सातासमुद्रापार जाऊन कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांबाबत आपण मात्र दृष्टिहीन झाल्यासारखे दुर्लक्ष केले. रेल्वे आणि बेस्ट सेवा यानंतरची मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी महत्वाची ही व्यवस्था आहे. मुंबई महानगरीची ती एक ओळख आहे. त्यांची दखल घेतली जावी त्यासाठी हा लेखनप्रपंच.

 

 

नोव्हेंबर २००३ मध्ये इंग्लडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्स मुंबई भेटीवर आला होता. त्याने मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल बरेच ऐकले होते. मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सने डबेवाल्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांना काही तिरकस प्रश्न विचारले. एकतर तुम्ही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहात, तरीही व्यवस्थापनाचे हे कौशल्य तुम्ही कुठे शिकलात ? डब्यांचे Coding, Time Management, Accuracy अशा गोष्टी तुम्ही कुठुन आत्मसात केल्या ? काळानुसार जसे ग्राहक बदलत जातात तसेच तुमच्यातही नवेनवे डबेवाले लोक येत राहतात, तरी सुद्धा गेली सव्वाशे वर्ष वितरण व्यवस्थेतील ही अचुकता तुम्ही कशी जोपासली आहे ? यामागची प्रेरणा नेमकी काय आहे ?

 

 

डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सला उत्तर दिले, “आम्ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन जे मावळे लढले, त्याच मावळ्यांचे आम्ही वंशज आहोत. छत्रपती शिवरायांच्या काळातील व्यवस्थापनाची शिस्त आमच्या रक्तातच आली आहे. त्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. त्याकाळी रयतेच्या संरक्षणासाठी आमचे पुर्वज लढले, आज त्याच रयतेच्या पोटात वेळेवर अन्नाचे दोन घास जावेत म्हणुन आम्ही झटत आहोत. आमचे पुर्वज गडकिल्ले, तटाबुरुजांवरती चढायचे, आम्ही मुंबईतल्या इमारतींचे मजले चढतो. घोडे गेले, सायकली-गाड्या आल्या. याच्या माध्यमातुनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होत आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती कायम आमच्या पाठीशी उभी असल्यानेच आम्ही हे करु शकतोय.”

 

 

डबेवाल्यांचे उत्तर ऐकुन प्रिन्स चार्ल्सने त्यांना सॅल्युट केला आणि त्यांच्याबद्दल “So you are Shivaji’s Maratha. You Can never be wrong. I salute you all.” अशा शब्दात गौरवोद्गार काढले. एवढेच नाही तर प्रिन्सने त्यांना स्वतःच्या लग्नासाठी विशेष पाहुणे म्हणुन इंग्लंडला निमंत्रित केले. तेथे त्यांचा जाहीर सत्कार केला. अशा डबेवाल्यांबाबत आपल्याला थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे.

 

 

डबेवाल्यांचा इतिहास :
भारतात ब्रिटिश सत्तेचा अंमल असतानाच्या काळात १८९० मध्ये ब्रिटिश तसेच पारशी कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचवुन त्यातुन आर्थिक प्रपंच उभा करावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने महादु हावजी बच्चे यांनी ही सेवा सुरु केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत ३५ डबेवाले काम करत होते. नंतर त्यांची संख्या वाढत जाऊन आज ५००० झाली आहे. पायजमा, शर्ट, गांधी टोपी आणि डब्यांसाठी चुंबळ असा त्यांचा पोशाख असतो. बहुतेकजण डबेवाले हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ते शरीराने दणकट असल्याने डोक्यावरील जाळीतुन डब्याचा भार घेऊन फिरणे, रेल्वेत चढणे-उतरणे अशी धावपळ त्यांना जमत असते. नवीन डबेवाला भरती करत असताना त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्यांच्या आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागते. दादरच्या रानडे रोड येथे ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’(डबेवाले) यांचे कार्यालय आहे. डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे यांनी “डबेवाला धर्मशाळा” काढली.

 

 

 

डबेवाल्यांची काम करण्याची पद्धत :
डबेवाले सर्वप्रथम एका भागातील डबे गोळा करतात. ते डबे ज्या ज्या भागात वितरित करायचे आहेत त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. एकाच भागात वितरित करायचे डबे एकत्रित करुन जलद लोकल रेल्वेने नियोजित जागी पाठवले जातात. डब्यांवर कलर कोडिंग स्वरुपात त्यांचा पत्ता नमुद असतो. ही एक विशिष्ट सांकेतिक ओळख असते, जी फक्त डबेवाल्यांनाच समजते. रेल्वेतुन डबे उतरुन घेतल्यानंतर स्थानिक डबेवाले त्या कोडिंग वरुन ते डबे वितरित करतात. त्यांनतर स्वतःचे भोजन उरकुन रिकामे डबे गोळा करण्याच्या कामाला लागतात आणि शेवटी ते परत घरपोच करतात. कलर कोड मुळे डब्यांची अदलाबदल होत नाही. डबे पोहोच करण्याचा कुठेही पत्ता लिहलेला नसतो. तो डोक्यात ठेवुन डबे पोहोच केले जातात. डबेवाला हा एखाद्या अभियंत्याप्रमाणे त्याचे कार्य करतो आणि डोकं संगणकाप्रमाणे माहिती साठवण्याचे काम करते. कलर कोडिंग पद्धतीने आपल्या कामात त्यांनी यांत्रिकपणा आणला आहे. त्यामुळेच ५००० डबेवाले दररोज २ लाख डबे वितरित करतात. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी करण्यास खुप अवघड गोष्ट आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता अगदी वेळेवर घरचं ताजे जेवण कोणतीही चुक न होता ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास बाळगुन प्रामाणिकपणे ते आपले काम करत असतात.

 

 

एवढी सगळी धावपळ करुन प्रतिदिन २५० ते ३००₹ वेतन घेऊन महिना साधारण ७-८ हजार वेतन मिळवतात.

डबेवाल्यांचे हे अनोखे नेटवर्क पाहुन अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कुललाही त्यांचे कौशल्य जाणुन घेण्यासाठी इथं यावे लागले. डबेवाल्यांच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. त्याच्यावर अहवाल तयार केला. आता त्या अहवालाच्या विक्रीतुन व्यवस्थापनाची कौशल्ये जगभर पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. परंतु जिथे पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपल्याला डबेवाल्यांच्या असा अहवाल करण्याची दृष्टी कधी आली नाही. दुर्दैव !

डबेवाल्यांच्या या वितरण प्रणालीचा Error Rate म्हणजेच डबा पोहोचवण्याच्या कामात चुक होण्याचे प्रमाण ६० लाख डब्यांमागे फक्त १ इतका नगण्य आहे. या अचुकतेमुळेच फॉर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस “Six Sigma Accuracy” या अत्यंत महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या वर्गात मोटोरोला, जनरल मोटर्स अशा उद्योगांच्या समवेत स्थान दिले आहे.

 

 

स्टॅनफोर्ड व जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्याकडुन तर शुन्य टक्के इंधन, शुन्य टक्के आधुनिक तंत्रज्ञान, शुन्य टक्के वादविवाद, अत्यल्प गुंतवणुक याद्वारे शंभर टक्के परिणाम आणि ग्राहकांना शंभर टक्के समाधान पुरवणारी ही संस्था आहे अशी त्यांना वाहवा मिळाली आहे.

डबेवाल्यांच्या प्रवासातील काही ठळक गोष्टी :
● छत्रपती शिवाजी महाराज हे डबेवाल्यांचे प्रेरणास्थान आहेत, तर पंढरीच्या विठोबारायावर, वारकरी संतपरंपरेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.
● डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित “मुंबईचा डबेवाला” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
● डॉ.पवन अग्रवाल यांनी मुंबईच्या डबेवाल्यांवर Ph.D. करुन त्यांच्या जीवनावर आधारित “Teena & Tiffin” या कॉमिक्सची निर्मिती केली.

 

● डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे, गंगाराम तळेकर, सुभाष तळेकर व इतरांनी ६० हुन अधिक देशात डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे दिले आहेत.
● जमाल हिराणी या भारतीयाने लंडन येथे सुरु केलेल्या “Tiffin Beats” उपहारगृहाच्या प्रमोशनसाठी डबेवाल्यांचे नेते गंगाराम तळेकर यांना निमंत्रित केले होते.
● Rohinton Mistry या इंग्रजी लेखकाने त्याच्या “Such a long journey” नावाच्या पुस्तकात डबेवाल्यांना “घामटलेली डुकरे” असे संबोधले होते. त्याला उत्तर देण्यासाठी गंगाराम तळेकरांनी इंग्रजीतच “The wonder of Dabewala unfolded” हे अप्रतिम पुस्तक लिहुन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि डबेवाले किती ग्रेट आहेत ते दाखवुन दिले.
● वेगवेगळ्या कार्यक्रमांतुन शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये आणि गरिबांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने डबेवाल्यांनी मोफत “रोटी बँक” सुरु केली आहे.

 

 

डबेवाल्यांच्या कार्याबद्दल सांगण्यासारखे बरेच आहे. अभ्यासाच्या आणि शब्दांच्या मर्यादांमुळे जितके शक्य तितके लिहण्याचा प्रयत्न केला आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला घड्याळाच्या वेळेइतकेच तंतोतंत वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य, अचुकता, वेळेचे गणित आजही कित्येकांच्या कौतुकाचा विषय आहे. तरी सुद्धा आपल्याला आपल्या मुलाबाळांना मिलियन डॉलर सक्सेस स्टोऱ्या सांगत बसतो, मात्र आठवी पास डबेवाल्यांच्या कथा सांगणे आपल्याला कधी महत्वाचे वाटत नाही. हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे. शालेय अभ्यासक्रमात डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य समाविष्ट व्हावे.

– अनिल माने.

 

Comments

comments

क्रांतीचा धगधगता अंगार क्रांतिसींह नाना पाटील… 0

क्रांतिसिंह नाना पाटील

सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.

क्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.

नाना सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना नानांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली. तुफानी सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो कि पळो करून सोडले. ब्रिटीश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वे सेवा, पोस्ट सेवा आदी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.

१९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहित ? या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच्या मातोश्रींचे निधन झाले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आईचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत. सामान्य जनतेची नानांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटीश सरकार नानांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरीत्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता. सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटीश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता.

सामाजिक कार्य

नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे. सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती.

सामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रित लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतीसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे असे प्रतीसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादि प्रवृत्तींना नानांच्या प्रतीसरकारचा चांगलाच धाक होता. गरीब शेतकऱ्यांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतीसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतीसरकार हे ‘पत्रीसरकार’ म्हणूनही ओळखले जावू लागले. आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रतीसिहांच्या कर्तुत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षापूर्वी स्वताच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरदृष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली, तर क्रांतीसिहानी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरवले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्ती नानांना तंतोतंत लागू पडतात.

राजकीय कार्य

त्याकाळी बहुजन समाजाला राजकीय नेतृत्व नव्हते. तत्कालीन कॉंग्रेसचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हातात होते. त्यांना गरीब बहुजन समाज व शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. परिणामी बहुजन समाजाची खूप उपेक्षा होत होती. कॉंग्रेसची घडण ही परंपरागत चातुर्वर्ण वर्गाच्या नावाखाली चालत होती. त्यातून बहुजन समाजाच्या आर्थिक सोयीचे व कामाचे चीज होईल असे दिसत नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधक पुढाऱ्यांनी मिटींग घेतली. या मिटींगमध्ये कॉंग्रेस अंतर्गतच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी गावोगाव सभा-मिटिंग घेवून बहुजन समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. नानांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तुफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होवू लागला. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष हे कॉंग्रेस अंतर्गतच एक संघटन होते. परंतु कॉंग्रेसच्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी ‘महाराष्ट्रात कॉंग्रेस अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष राहू शकत नाही’ असा ठराव पास करून घेतला. त्यांचे विचार व पद्धती न पटल्याने बहुजन समाजातील कार्यकर्ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

नाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना समजेल असे होते. भाषांशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

आज नानांचे कार्य बहुजन समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाल्याशिवाय त्यांच्या कार्याचे चीज होणार नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती करणे हीच क्रांतीसिहांना खरी आदरांजली ठरेल.

प्रकाश पोळ

Comments

comments

खरा हिजङा कोण…? 28

कामानिमीत्त शनिवारी मुंबईला जाण्याचा योग आला..संतोष दादा आणी मी शनिवारी रात्री मुंबईसाठी औरंगाबाद वरुन निघालो..सकाळी सकाळी सहा च्या दरम्यान आम्ही माझा बहीणीच्या सविता ताईच्या घरी पोहचलो होतो.रात्रभर झोप न झाल्यामुळे सकाळी फार झोप येत होती..पण ओम ला आणी पियुष ला पाहताच एका क्षणात झोप उङाली आणी ताजतवान वाटु लागल..ओम आणी पियुष सोबत थोङ्या वेळ मी खेळलो आणी जेवण वैगेरे करुन सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या घरुन निघालो..दुपार पर्यन्तं काम आवरुन दादा आणी मी मरिन लाईन्स वर तीन ला पोहचलो..तिथे थोङासा Enjoy करुन औरंगाबादला जाण्यासाठी सायंकाळी सहा ला CST रेल्वे स्टेशनवर आलो..

अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळाल नव्हत..जनरल ङब्यात जागा पकङण्यासाठी दादा आणी मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशन वर येवुन बसलो होतो.देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊ ला होती..साङे आठ ला गाङी प्लेटफाॅर्लमा लागली..दादा आणी मी खिङकी जवळ समोरासमोरच्या सिट पकङुन बसलो..रेल्वेच्या जनरल ङब्यात दरवाज्या जवळ खिङकीत सिंगल सिंगल सिट पकङण म्हणजे एकट्याने किल्ला लढवावा आणी तो जिंकावा अगदी तसच…दादाने आणी मी आमचा किल्ला जिंकुन सिंहासनावर बसल्या सारख ऐटीत सिट वर बसलो होतो..अपेक्षे प्रमाणेच जनरल ङब्यात गर्दी Cst लाच झाली होती..ङब्यात पाय ठेवायला ही जागा उरली नव्हती..

ईतक्यात गाङीत एक ऐन विशीतली मुलगी आली तिच्यासोबत एक एकविस-बावीस वर्षाचा धङ मिश्याही न फुटलेला मुलगा होता..मुलगी खुप सुंदर होती..पण चेहरयावर चिंता स्पष्ट कळत होती.त्यांच्या वागण्याने ते पळुन आलेले प्रेमी युगुल होते अस वाटत होत..कदाचित दुसरया राज्यातुन ते मुंबई ला पळुन आले होते.त्यांची भाषा आणी अंगा वरचा पेहरावा वरन ते तामीळनाङु-कर्नाटका कङचे वाटत होते…ते दोघेही आमच्या सिट जवळ दरवाज्यात उभे राहीले..गाङी सुरु झाली..ङब्यातल्या सर्वच जणांच्या नजरा त्यांच्याकङे विशेषः त्या मुलीकङे होत्या..गाङी दहा पंधरा मिनीटातच दादर ला आली आणी गाङीत दादर वरन सात आठ तरुणांचा घोळका आमच्या ङब्यात घुसला..शरिरांने भारदस्त असलेल्या त्या मुलांच्या दाढी मिशा वाढलेल्या,केस रंगवलेले,अंगातले फॅशन च्या नावाखाली घातलेले विचित्र कपङे,तोंङात भरलेला गुटखा पाहुन ते झोपङपट्टीचे वाटत होते..ते प्रेमी युगुल एकमेंकाशी काहीतरी बोलत होते भाषा समजत नव्हती पण पैशांवरन त्यांचा वाद चालु होता..पैसे संपले होते कदाचित त्यांचे..त्या मुलाने रागारागात तिला शिवी दिली आणी एक जोरात कानाखाली लगावली..त्या मुलीला अक्षरः रङुच कोसळल..ति त्याला काहीच न बोलता चुपचाप बसली पण तिच्या ङोळ्यातल पाणी सर्वकाही सांगुन जात होत..

गाङी दादर स्टेशन वरन निघाली.त्या मुलालाही त्याची चुक कळाली आणी त्यालाही रङु आल..तिचा हातात हात घेऊन ङोळयातले पाणी लपवत तिची समजुत तो काढु लागला..ते बोलण्यात गुंग झाले पण त्या दादर वरन चढलेल्या मुलांच्या घोळक्याची नजर त्या मुलीवर पङली..तिला रङताना पाहुन ते अश्शील विनोद करु लागले..मोठमोठ्याने घाणेरङ बोलुन हसु लागले..

ङब्यातल्या सर्व माणसांची वासनांध नजर त्या मुलीवर अगोदरच होती..त्या मुलीच्या ते केव्हाच लक्षात आल होत..त्या मुलालाही ते कळाल..मुलांच्या घोळक्यातले मुल किळसवाण्या घाणेरङ्या नजरेने त्या मुलीच्या छाती कङे एकटक पाहत होते..शरिराने नसला तरी ङोळ्यांनी ते तिच्यावर एक प्रकारे बलात्कारच करत होते…आधीच परेशानीत असलेल्या त्या प्रेमी युगुलाला अजुन त्रास देण्याचा प्रयत्न हे सर्वजण करत होते..ति बिचारी मुलगी स्वताची छाती झाकण्याचा इज्जतीला सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती..एव्हाना ठाणे आलच होत..ठाण्यात अजुन गर्दी वाढली आणी तो मुलांचा घोळका मुलीला खेटुन मुद्दाम उभा राहीला….गर्दीचा फायदा घेत त्या घोळक्यातला एक मुलगा तिला नको तिथे स्पर्श करु लागला..ती मुलगी स्वताच अंग चोरत बाजुला होत होती..मला ही ते लक्षात आलच होत..मी दादाला खुणावल आणी सांगितल ते पोर तिला छेङताय दादा..पण दादा ही काहीच न करता मला बोला तु चुपचाप बस,तुला काही देण घेण नाही..दादाच बोलण ऐकताच मन सुन्न पङल..मी दादाला बोलो “दादा तिच्या जागी आपली बहीण असती तर…?”

दादाने हिम्मत करुन त्या मुलाला सांगितल भाऊ जरा माग उभा रहा,लेङीज उभी आहे,त्यावर तो मुलगा बोला “ओय आयघाल्या तुही बहीण हाय का ती..,मंग शांत रहाय..कामाशी काम ठेव”
दादा त्याला काहीच बोलु शकत नव्हता..कारण घोळक्यातले सर्वच शरिराने भारदस्त आणी पट्टीचे असल्याने भांङणाला आमंत्रण देण्यासारखच..

दादा ने काहीच न बोलता त्या मुलीला दोघांच्या सिट मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभ रहायला सांगितल..ति तिथे उभी राहीली आणी तिच्या बाजुला तिच्या सोबत असणारा मुलगा उभा राहीला..ङब्यात असणारे बाकीचे प्रवासी हा निर्लज्ज प्रकार ङोळ्याने पाहुन त्या मुलांना घाबरुन शांत बसले होते..मला ही आज पहिल्यांदा शरिरयष्ठीने कमकुवत असण्याची लाज वाटत होती..मी एका मुलीच रक्षण ईच्छा असताना सुध्दा करु शकत नव्हतो..महाराजांच्या भुमीत हा किळसवाणा प्रकार मला ङोळयासमोर पहावा लागत होता..रेल्वे अता कसारा घाट जवळ जवळ आली होती..त्या घोळक्यातील मुल तोंङातला गुटखा त्या मुली सोबतच्या असणारया मुलाच्या अंगावर थुकत होते..त्या मुलाच त्याषमुलीच्या पाठी मागे स्पर्श करण चालुच होत..गाङी अता कसारा घाटात पोहचली होती..

कसारयाचे बोगदे सुरु झाले होते..अंधाराचा फायदा घेत घोळक्यातला मुलगा त्या मुलीच्या छाती वरण हात फिरवत होता..गाङी बोगद्यात गेल्यावर गाङीत अंधार होयचा अधीच पाऊस आणी वरन कालच झालेली अमावस्या ह्यामुळे आजची रात्र फारच अंधारी वाटत होती..अंधाराचा फायदा घेत तो मुलगा तिच्या पाठीमागे उभा राहुन तिला मिठी मारण्याचा तिची छाती दाबण्याचा घाणेरङा प्रकार करु लागला..आणी त्याचे मित्र हसुन अजुन त्याला प्रोत्साहन देत होते..तिच्यासोबतचा मुलगा त्याला हात पाय जोङुन मागे उभा राहीला सांगत होता पण तो ते ऐकुन न ऐकल्यासारख करत होता..दादा लाही ते पाहुन कस तरी होत होत पण गर्दी मुळे तो काहीच करु शकत नव्हता..ती मुलगी नाईलाजाने सर्व सहन करत उभी होती..मी तीच्यासोबत असलेल्या मुलाला आर.पी.एफ वाल्यांना बोलवायला सांगितल..पण तो बोला..”भया हमने टिकट नही निकाला..वो हम को ही तकलीफ देगा..पहलेही पैसा नही है” अस बोलुन तो ही नाईलाजाने तिच रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता..ङब्यातल कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हत..त्या पोरांचा घोळका तिची अता व्हीङीओ शुटींग करत होता..ते पाहुन त्या बैलाला अता चांगलच स्फुरण चढला होता त्याने हद्द पार करत काही वेगळाच करण्याचा प्रयत्न करु लागला..

ती मुलगी जोरात ओरङली आणी रङुच लागली..माझ मन ही तिच्या सोबत रङु लागल..
गाङी ईगतपुरी ला पोहचली..आणी गाङीत तृतीयपंथी ज्याला साधारण भाषेत हिजङा,किन्नर म्हणतो तो पैसे मागण्याकरता आला..ऐरवी हिजङा म्हणल की प्रवाश्यांना पैसे मागुन लुटणारा,नाही दिले तर शिव्या देऊन टाळ्या वाजवणारा अशी माझी समजुत..हिजङ्यांच नाव ऐकल्यावर नाक मुरङणारे,किळसवाण्या नजरेने पाहणारे भरपुर प्रवासी मीही पाहीलेत..मी ही तसच करायचो..मला फार भिती वाटायंची त्यांची..

ईगतपुरीत ङब्यात आलेला हिजङा सर्वांना पैसे मागत मागत आमचा सिट पर्यंन्त आला..त्या हिजङ्याने त्या मुलीला रङताना पाहील..आणी तिला रङण्याच कारण विचारु लागला..हुंदके देत देत ती मुलगी तोङक्या मोङक्या हिंदीत त्या हिजङ्याला सर्व सांगु लागली..तिच्यासोबत असणारया मुलांने घङलेली सर्व हकिकत त्या हिजङ्याला सांगितली…त्या हिजङयाने एका मिनीटाचाही उशीर न करता कोण होता तो मुलगा त्या मुलीला विचारल…तिने बोट दाखवताच त्या हिजङ्याने त्या मुलाच्या थोबाङीत टेकवली…त्याचा हात पिरगळुन त्या पोराला तो हिजङा मारु लागला…घोळक्यातल्या पोरांची हिजङयाच ते रुप पाहुन चांगलीच फाटली होती..ङब्यातले माणस अता त्या हिजङ्याला त्या पोराना मारतानाचा व्हिङीओ घेऊ लागले..पण अजुनही मदतीला कोणी येत नव्हत..अता नाशिक आलच होत.

.नाशिक ला येताच त्या मुलांच्या घोळक्याला हिजङ्याने खाली उतरावुन दिल…त्या मुलीने आणी तिच्यासोबतच्या मुलाने त्या हिजङयाचे आभार मानले…मुलगी अक्षरः त्या हिजङ्याच्या गळ्यात पङुन रङु लागली..हिजङयाने ही त्यांची विचारपुस केली..पैसे संपले होते म्हणुन त्या हिजङयाने त्यांना मदत म्हणुन पैसे देऊ केले..त्याने त्या हिजङ्याने प्रेमी युगुलाला चहा पाजुन धिर दिला..आणी ङब्यातुन उतरुन पुढच्या ङब्यात चालल्या गेला..पुढचा ङब्यात तो परत पैसे मागु लागला.

 

मनात सहज विचार आला..एक हिजङयांने त्या मुलांना थांबवल होत मी तर पुरूष होतो..दादा,ङब्यातले प्रवासी ही पण भरपुर पुरुष होते.पण कोणीच पुरुषार्थ दाखवु शकल नव्हत..बाईच्या शरिरावर पुरुषार्थ दाखवणारे पुरुष समाजात आपला पुरुषार्थ का दाखवत नाही..का मुलींना संकटात मदत करत नाही…हा प्रश्न मनात घर करुन गेला..
हिजङ्यांचा तिरस्कार करणारा मी मात्र..त्या हिजङ्यांचा अभिमान बाळगु लागलो होतो..
माझा नजरेत मुलींची ईज्जतीवर हात टाकणारा तो मुलगा पुरुष हिजङा झाला होता आणी मुलीची ईज्जत वाचवणारा तो हिजङ्याचा पुरुषार्थ मनाला भावला होता..

माणुस जे करु शकला नव्हता ते हिजङा म्हणजेच अर्धनारीनटेश्वर करुन गेला होता..उगाच नाही देवानेही अर्धनारीनटेश्वराच रुप घेतल होत…

साभार – अमोलराज.

Comments

comments