Loading...
Loading...

भारत पाक सामन्यापूर्वी आलेली हि बातमी तुमचा मूड खराब करू शकते!

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केली. पण काल न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं भारत आणि न्यूझीलंड संघास एक एक गुण वाटून देण्यात आले. न्यूझीलंड आणि भारत स्पर्धेत अपराजित राहिले आहेत.

Loading...

वर्ल्डकपमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक सामने रद्द करण्याची नामुष्की आयसीसीवर ओढावली आहे. १६ तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान महामुकाबला होणार आहे. या सामन्याची प्रतीक्षा नेहमीच क्रिकेटप्रेमींना असते. पण या सामन्यापूर्वी एक बॅड न्यूज चाहत्यांसाठी आली आहे.

Loading...

काल नॉटिंघममध्ये भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना एकही बॉल न खेळता रद्द झाला. तीन दिवसापासून नॉटिंघममध्ये पाऊस पडत आहे. भारताचा पाकिस्तानसोबत सामना मँचेस्टरमध्ये होणार आहे. पण या सामन्यात देखील पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार इंग्लंडमध्ये हा संपूर्ण आठवडा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्याची फॅन्स ४ वर्षांपासून वाट बघत आहेत. वर्ल्ड कपमधला हा हाय वोल्टेज सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी ट्रैफोर्डच्या मैदानावर पावसाची शक्यता आहे. जर रविवारी पाऊस पडला तर, चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Loading...

भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीटं अगदी ४८ तासांत विकल्या गेल्या होत्या. आतापर्यंत सहावेळा भारत पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडले आहेत, याच एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.

बघा १६ तारखेचा मँचेस्टरमधील पावसाचा अंदाज-

Loading...

पावसामुळे रद्द झाले अनेक सामने-

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळं टॉस न होता रद्द झाला. पावसामुळं गुणतालिकेत संघांना फटका बसत आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ७ जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला. या सामन्याचे केवळ ७.३ ओव्हर खेळले गेले. आता मंगळवारी पुन्हा एकदा पावसामुळं सामना रद्द झाला. श्रीलंका संघाचे यंदाच्यावर्ल्ड कपमधले ४ सामन्यांपैकी २ सामने पावसामुळं रद्द झाले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *