Mg id top
Loading...

गुगल आणि युट्युबच्या मदतीने तो बनला IAS टॉपर..

एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांमध्ये रात्रंदिवस अभ्यास करुन अनेकांना यश मिळत नाही. भरपूर अभ्यास करूनही कधी कधी यश थोडक्यात हुलकावणी देते. तर काहीना आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. आपल्या यशाचे श्रेय यशस्वी विद्यार्थी नेहमीच आपल्या आईवडिलांना आणि शिक्षकांना देतात. पण आता काळ बदलला आहे. आजच्या या डिजिटल युगात विद्यार्थी आता आपल्या यशाचे श्रेय हे गुगल आणि युट्युबला देताना दिसत आहेत. असंच काहीसं हैदराबाद येथील इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेल्या अनुदिप दुरीशेट्टीच्या बाबतीत घडले आहे. त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात IAS परीक्षेत यश मिळवले आहे. त्याने 2015 आणि 2016 मध्ये देखील यश मिळवले होते पण त्याला त्याच्या मनासारखी रँक मिळाली नव्हती.

आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समज हाच बनला आहे की चांगले क्लासेस हे यश मिळवण्यासाठी महत्वाचे आहेत. पण अनुदिपने ही गोष्ट खोटी ठरवत अभ्यासात क्लासेसला तेवढं महत्व नसल्याचे सिद्ध केले आहे. अनुदिपने अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा सहारा घेतला. त्याने गुगल आणि युट्युबचा योग्य वापर केल्याने त्याला हे यश मिळाल्याचे तो सांगतो. त्याला यापूर्वी दिलेल्या परीक्षेत इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस मिळाले होते. पण त्याला IAS बनायचे असल्याने त्याने आपले प्रयत्न चालू ठेवले. अनुदिपनर नौकरी करत हे यश मिळवले आहे. नोकरीमुळे रोज अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने तो विकेंडला अभ्यास करायचा.

Loading...

अनुदिपने इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही दिवस गुगलमध्ये देखील काम केले होते. IRS च्या ट्रेनिंग दरम्यान त्याला सर्वश्रेष्ठ ट्रेनी ऑफिसरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. अनुदिपच्या मते आजकाल ट्युशन साठी कोचिंग क्लासेस मध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असल्याने अभ्यास करताना कुठलीही अडचण येणार नाही. एवढे सारे सोर्स आणि वेबसाईट उपलब्ध आहेत की तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथे होऊ शकते.

IRS सोडून IAS बनलेल्या अनुदिपला माहिती होते की IRSच्या कामाच्या सीमा मर्यादित आहेत. त्यामुळे त्याने IRS सोडून IAS बनण्यासाठी आपला संघर्ष चालू ठेवला. यश मिळवल्यानंतर अनुदिपची आता तेलंगणा मध्ये काम करण्याची इच्छा आहे. तो राज्यातील आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सुधारणा करू इच्छितो.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *