अण्णासाहेब पाटील यांनी अश्या प्रकारे दिले होते मराठा आरक्षणाकरिता पहिले बलिदान..

आज विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक सर्व पक्षानी बहुमताने मान्य केले. या विधेयकामुळे मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. हा जो लढा दिसतोय तो सोपा आणि साधा नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्याला अनेक दशकांचा इतिहास आहे. मराठा आरक्षण लढा हा ज्यांनी सुरू केला त्या एका महान व्यक्ती बद्दल आपण जाणून घेणार आहोत..

1980 पासून मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात अण्णासाहेब पाटील यांनी केली. 80 च्या दशकात मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते छोटे छोटे मंडळ आपआपल्या भागात समाजाचे काम करायचे राज्यस्तरीय कोणतीही संघटना प्रभावी नव्हती. अण्णासाहेब पाटील हे कामगार व माथाडी नेते म्हणून त्याकाळात अत्यंत प्रभावीपणे कार्य करायचे. माथाडी काम करणारा हा बहुसंख्य वर्ग हा मराठा समाजातून आलेला..

अण्णासाहेब पाटील यांना माथाडीची हालाखाची स्थिती माहिती होती. एकूणच सर्व मराठा समाजाची स्थिती अत्यंत नाजूक होती. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणून घेतले. छोट्या छोट्या मंडळ आणि संघटनेला एकत्र करून त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली व महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाकरिता त्यांनी झंझावाती दौरे काढले.निर्णायक लढा लढण्यासाठी त्यांनी 22 मार्च 1982 साली मंत्रालयावर मोठा मोर्चा नेण्याचे जाहीर केले.

अण्णासाहेब पाटील हे सरळ साधे व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या समाजाचे नेतृत्व जरी ते करत असले तरी मनात त्यांच्या कोणतेही राजकारण नव्हते. समाजाप्रती भावनिक असणारे ते नेते होते. त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास होता. त्यांनी मंत्रालयावर आंदोलनाची घोषणा केल्यानंतर लाखोंच्या संख्येने लोकांनी प्रतिसाद देऊन अण्णासाहेबांच्या आंदोलनात सहभाग घेतला.

22 मार्च 1982 साली मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला त्या मोर्चाकरिता लाखो बांधव आले होते. अण्णासाहेब पाटील यांनी या लाखो लोकांच्या साक्षीने जाहीर केले की आज आपण हा भव्य मोर्चा मंत्रालयावर काढला या मोर्चाने आज जर मराठा समाजाला मी न्याय देऊ नाही शकलो तर उद्याचा सूर्य माझ्यासाठी उजडणार नाही. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार सोबत बोलणे झाले तेव्हा बाबासाहेब भोसले नावाचे मुख्यमंत्री होते त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.

अण्णासाहेब पाटील यांच्या मनाला ही गोष्ट लागली. एवढ्या मोठ्या समाजाला घेऊन मोर्चा काढला. समाजाची एकही मागणी मान्य झाली नाही. अण्णासाहेब पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांना पोटाला लावणारे नेतृत्व होते. तेव्हा त्यांच्या एका आदेशात महाराष्ट्र सुद्धा बंद झाला असता पण त्यांनी आपण दिलेला शब्द पळाला. त्यांनी 23 मार्च 1982 रोजी स्वतःच्या पिस्तूलातून गोळी झाडून आपले बलिदान दिले. आणि मराठा समाजावर प्रेम करणारे नेतृत्व हरवले..

अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाने मराठा आरक्षणाचा यज्ञ तेव्हापासून पेटला होता जो आजही सुरू आहे. अण्णासाहेब यांनी बलिदान दिले तेव्हा त्यांची मुलेबाळे ही अत्यंत छोटी होती. त्यांनी कुटुंबाचा विचार केला नाही विचार केला फक्त समाजाचा.. अण्णासाहेब पाटील यांच्यासारखे नेतृत्व मराठा समाजाला अजूनही मिळाले नाही. मराठा समाज माथाडी कामगार नेहमीच अण्णासाहेब पाटील यांच्याबद्दल कृतज्ञ असतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: